नवव्या दिवसाचे प्रवचन

दैनिक जीवना मध्ये तंत्राचा((विद्येचा) प्रयोग – दहा पारमिता

नऊ दिवस समाप्त झाले. दैनिक जीवनामध्ये ह्या विद्येचा कसा उपयोग करावा ह्याची चर्चा करण्याची वेळ आता आली आहे. हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. धम्म ही जीवन जगण्याची कला आहे. जर आपण दैनिक जीवनामध्ये ह्याचा उपयोग करु शकला नाहीत, तर शिबीरामध्ये येणे हे कोणत्याही कर्मकांड किंवा समारंभ करण्यासारखेच आहे.

प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये नको असलेल्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. जेव्हा काही नको असलेले घडते, तेव्हा एकजण मनाची समता हरवून बसतो, आणि नकारात्मकता उत्पन्न करणे सुरु करतो. आणि जेव्हा नकारात्मकता मनामध्ये उठते तेव्हा एकजण दुःखी होऊन जातो. कशी काय नकारात्मकता उत्पन्न होऊच नये, तणाव कसा उत्पन्न होऊ नये? कसे एखाद्याने शांतिपूर्ण व मिळून मिसळून रहावे?

ज्या ज्ञानी लोकांनी आपल्यामधील मन व शरीर यांच्यामधील सत्याचा शोध सुरु केला त्यांना ह्या समस्येचा उलगडा झालाः जेव्हा कोणत्याही कारणामुळे मनामध्ये नकारात्मकता येते, तेव्हा एकाने कुठेतरी दुसरीकडे ध्यान दिले पाहिजे. उदाहरणार्थ,एकजण उठतो,काही पाणी पितो, गणती सुरु करतो, किंवा एखाद्या देवतेची किंवा ज्या व्यक्तिबद्दल भक्ती आहे त्याचे नामस्मरण सुरु करतो. असे ध्यान दुसरीकडे हटविल्यानंतर एकजण नकारात्मकते मधून बाहेर येतो.

एक व्यावहारिक उपाय. परंतु दुसरे संशोधक परम सत्यासाठी आंतील सत्याच्या खोलापर्यंत शोधत पुढे गेले. ह्या ज्ञानी लोकांनी जाणले की ध्यान दुसरीकडे हटवून सचेत स्तरावर शांती व सद्भाव यांचा एक थर तयार होतो, परंतू जी नकारात्मकता उत्पन्न झाली आहे ती नष्ट होत नाही. एकजण त्यास फक्त दाबून ठेवतो. बेशुध्दिच्या स्तरावर त्याची वृध्दि होते आणि बलवान होणे सुरुच रहाते.आता किंवा नंतर, नकारात्मकतेचा हा निद्रित ज्वालामुखी फुटणार आणि मनावर स्वार होणार((मनावर ताबा मिळवेल). जोपर्यंत बेहोशीमध्ये देखील नकारात्मकता राहील, तोपर्यंत समाधान केवळ आंशिक,तात्पुरते असेल.

संपूर्ण ज्ञानी व्यक्ति खरे सत्य शोधून काढतोः समस्येपासून दूर पळू नका; त्याला तोंड द्या. जी काही दुषितता मनामध्ये येते त्याचे निरिक्षण करा. पहाण्याने तिला कुणी दाबत नाही, न ही तिला हानिकारक मौखिक किंवा शारिरीक क्रिया व्यक्त करण्यासाठी खुली परवानगी देत आहे. ह्या दोन अंतिम टोका दरम्यान मध्यम मार्ग आहेः फक्त अवलोकन. जेव्हा कुणी ह्याचे अवलोकन करणे सुरु करतो, नकारात्मकता दुर्बळ होते आणि मनावर काबू मिळविण्यापूर्वी नष्ट होते. इतकेच नाही तर त्या प्रकारच्या जुना दुषिततेचा काही संग्रह देखील निघून जातो. जेव्हा काही मलिनता((विकार) सचेत स्तरावर सुरु होते, विकाराचा त्याच प्रकारचा जुना संग्रह बेहोशीच्या स्तरामधुन वर येतो, वर्तमान विकाराशी जोडला जातो आणि त्याची वाढ सुरु होते. जर एखाद्याने फक्त अवलोकन केले, तर फक्त चालू दुषितताच नाही तर जुन्या संग्रहाचा काही भाग देखील निघून जाईल. ह्याच प्रकारे, हळू हळू सर्व दुषितता(विकार) नष्ट होतात आणि एकजण दुःखातून मुक्त होतो.

परंतु एका साधारण व्यक्तिसाठी, हे मानसिक मलिनतेचे निरिक्षण करणे सोपे नाही. एखाद्यास हेच समजत नाही की केव्हा ही सुरु झाली आणि कसा तिने मनावर ताबा मिळवला. जोपर्यंत ती सचेत स्तरावर पोहोचते तोपर्यंत इतकी मजबूत होते की प्रतिक्रिये शिवाय निरिक्षण करु शकत नाही. जर आपण असे करण्याचा प्रयत्न केला तरी ह्या मनाच्या अमूर्त विकाराचे अवलोकन करणे पुष्कळच कठीण आहे – अमूर्त कोध,भय, किंवा वासना. ह्याऐवजी एखाद्याचे ध्यान दुषिततेच्या बाह्य प्रेरणेकडे जाते, जे केवळ त्याला वाढविण्यासाठीचे एक कारण बनेल.

तथापि, ज्ञानी व्यक्तिंनी शोधून काढले की जेव्हा मनामध्ये विकार उत्पन्न होतो, त्याच वेळी दोन घटना शारिरीक स्तरावर सुरु होतातः श्वास आपली स्वाभाविकता सोडतो, आणि शरीरामध्ये एक रासायनिक प्रक्रिया,संवेदना सुरु होतात. हे एक व्यावहारिक उत्तर मिळाले. ह्या मनाच्या अमूर्त विकारांचे अवलोकन करणे पुष्कळच कठीण आहे, परंतु प्रशिक्षणा नंतर लवकरच श्वास व संवेदना यांचे शरीरावर होणाऱ्या प्रकटीकरणाद्वारे त्याचे निरिक्षण करण्यास तो शिकतो. विकारांचे शारिरीक स्तरावरील निरिक्षण करत त्याना वर येऊ देतो आणि कोणत्याही नुकसानीशिवाय नष्ट होऊ देतो. एकजण विकारांपासून मुक्त होतो.

ह्या विद्येवर प्रभुत्व मिळविण्यास वेळ लागतो, परंतू एकजण जसजसा ह्याचा अभ्यास करतो, हळूहळू तो अधिक वेळ बाहेरच्या स्थितीप्रती, ज्यावर आधी नकारात्मकतेची प्रतिक्रिया करत होता आता संतुलित राहू शकतो. येथपर्यंत की जर प्रतिक्रिया झालीच तरी प्रतिक्रिया इतकी तीव्र किंवा पुष्कळ वेळ रहात नाही जी पूर्वी होत असे. एक वेळ अशी येईल की सर्वात चिथविणाऱ्या परिस्थितीमध्ये सुध्दा, एकजण श्वास व संवेदनाद्वारे दिल्या गेलेल्या इशाऱ्यावर लक्ष देण्यास सक्षम होइल,आणि काही क्षणापुरते त्यांच्याकडे लक्ष देण्यास सुरुवात करेल. आत्म-अवलोकनाचे हे क्षण बाह्य प्रेरणा व कुणाची प्रतिक्रिया ह्या दोन्ही दरम्यान एक धक्कारोधक म्हणून कार्य करतील. आंधळी प्रतिक्रिया करण्याऐवजी मन आता संतुलित रहाते,आणि आपल्यासाठी व इतरांसाठी उपयोगी अशी सकारात्मक कारवाई करण्यासाठी एकजण सक्षम होतो.

आपण आपल्या मधील संवेदना पाहात आपल्या विकारांचे निर्मूलन आणि मनाच्या सवयीच्या तऱ्हेमध्ये बदल करण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलले आहे.

जन्मापासूनच, एकजण नेहमीच बाहेर पहाण्यासाठीच प्रशिक्षित केला जातो. कुणिही कधीही आपल्या स्वतःचे निरिक्षण करीत नाही, आणि म्हणूनच आपल्या समस्येच्या खोलवर जाण्यालायक रहात नाही. ह्याऐवजी एकजण दुःखाचे कारण बाहेर शोधत असतो, नेहमीच तो आपल्या दुःखासाठी दुसऱ्यांना दोष देतो. तो घटनेस एकाच कोनातून बघतो, हे आंशिक दृष्य आहे, जे विकृत असणे स्वाभाविक आहे; आणि तरीसुध्दा त्या दृष्यास पूर्ण सत्य आहे असे स्विकारतो. ह्या अपुऱ्या माहितीच्या आधारावर घेतलेला निर्णय केवळ स्वतःसच नाही तर दुसऱ्याना देखील हानिकारक होईल. सत्याची गोळाबेरीज पहाण्यासाठी, ह्यास एकापेक्षा अधिक कोनातून पाहिले पाहिजे. हे विपश्यनेच्या अभ्यासाद्वारे कुणीही शिकू शकतोः सत्यास न केवळ बाहेरुन तर आंतून सुध्दा.

केवळ एकाच कोनातून पाहिल्यामुळे, एखादा कल्पना करतो की त्याचे दुःख अन्य लोकांमुळे, बाहेरील परिस्थितीमुळे आले आहे. म्हणूनच तो आपली सारी ऊर्जा दुसऱ्याना बदलणे, तसेच बाहेरील स्थिती बदलण्यामध्ये घालवितो. वास्तवामध्ये, हा एक व्यर्थ प्रयत्न असतो. जो कुणी आपल्या आतील सत्यास पाहण्यास शिकतो, त्याला लवकरच समजते की तो स्वतःच आपले दुःख किंवा सुख यासाठी जबाबदार आहे. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीस कुणी अन्य अपशब्द उच्चारल्यास तो   दुःखी होऊन जातो. ज्या व्यक्तिने त्याला दुःखी करण्यासाठी अपशब्द उच्चारले आहेत त्यालाच तो दोषी मानतो. खरे तर अपशब्द ऐकावे लागणारी व्यक्तीच आपल्या मनाला अशुद्ध् करुन आपल्यासाठी दुःखाचा डोंगर उभा करते. ज्याला अपशब्द बोलले गेले आहेत तो त्याबद्दल प्रतिक्रिया करुन आपल्यासाठी तेव्हा दुःख   उत्पन्न करतो , जेव्हा तो आपल्या मनाला  दुषित करणे सुरू  करतो. प्रत्येक व्यक्ती तो किंवा ती आपल्या दुःखास स्वतःच जबाबदार आहे,दुसरे कुणीही नाही. जेव्हा एखादा ह्या सत्याचा अनुभव घेतो, तेव्हा दुसऱ्यांच्या चुका काढण्याचा मुर्खपणा तो कधीही करीत नाही.

एकजण कशाप्रती प्रतिक्रिया करतो? आपली स्वतःची आपण बनवलेली एक प्रतिमा, बाहेरील सत्य नव्हे. जेव्हा एखादा कुणाला तरी पहातो, त्या व्यक्तिची प्रतिमा त्याने बनवलेल्या एका पूर्व रंगाच्या स्थितीची असते. जुन्या (saṅkhārā) संस्काराचा प्रभाव कोणत्याही नवीन स्थितीच्या समजूतीवर पडतो. त्यामुळेच, ह्या पूर्वस्थापित धारणेमुळे, शारीरिक संवेदना सुखद किंवा दुःखद होऊन जातात. आणि संवेदनेच्या प्रकारानुसार एकजण नवीन प्रतिक्रिया उत्पन्न करतो.ह्या मधील प्रत्येक प्रक्रिया जुन्या (saṅkhārā) संस्कारामुळे प्रभावित आहे. परंतु जर एखाद्याने संवेदनेप्रति सजगता व समता ठेवली, तर त्याची आंधळी प्रतिक्रिया करण्याची संवय दुर्बळ होऊन जाते,आणि सत्य हे जसे आहे तसेच एकजण पहाण्यास शिकतो.

जर कुणिही वेगळ्या कोनातून गोष्टी पहाण्याची क्षमता जागृत केली,तर जेव्हा कुणी शिवी किंवा दुर्व्यवहार केला तरी समज येते की ही व्यक्ति दुर्व्यवहार करत आहे कारण की ती दुःखी आहे. ह्या समजुतीमुळे कुणिही नकारात्मकतेची प्रतिक्रिया करु शकत नाही, परंतू त्या व्यक्तिसाठी फक्त प्रेम व करुणा वाटू लागते, जशी एका आईला आपल्या आजारी मुलाबद्दल वाटते. त्या व्यक्तिला आपल्या दुःखातून बाहेर येण्यासाठी मदत करण्याची इच्छा उत्पन्न होते. ह्या प्रकारे एकजण शांतिपूर्ण व सुखी रहातो, आणि दुसऱ्याना देखील शांतिपूर्ण व सुखी बनण्यास मदत करतो. जीवन जगण्याच्या कलेचा अभ्यास करणे, म्हणजेच मानसिक दोष काढून टाकणे आणि आपल्या तसेच दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी चांगले गुण आपल्यात आणणे हाच धम्म चा उद्देश आहे.

दहा चांगले मानसिक गुण असतात - parami पुण्य- ज्यामध्ये अंतिम लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी एखाद्याने पारंगत व्हावे. पुर्ण अहंभावहीन स्थिती हे लक्ष्य पाहिजे. ह्या दहा parami पुण्यामध्ये हे गुण असतात ज्यामुळे हळू हळू अहंकार विरघळून जातो, आणि त्यामुळे एखाद्यास मुक्तिच्या जवळ आणले जाते. कुणालाही विपश्यनेच्या शिबीरामध्ये ह्या सर्व दहा गुणांचा विकास करण्याची संधी मिळते.

पहिले parami पुण्य आहे nekkhamma-- त्याग. जो कुणी संन्यासी किंवा नन होते त्याला गृहस्थ जीवनाचा त्याग आणि स्वतःची संपत्ति सोडून रहावे लागते, येथपर्यंत की आपल्या दैनिक भोजनासाठी त्याला किंवा तिला भिक्षांदेही करावी लागते. हे सर्व अहंकाराचा भंग व्हावा ह्या उद्देशाने केले जाते. सामान्य गृहस्थाला हे गुण कसे काय मिळविता येतील? ह्या प्रकारच्या एका शिबीरामध्ये असे करण्याची सुसंधी मिळते, कारण की एकजण दुसऱ्याच्या दानावर येथे रहातो. जे काही भोजन,निवासस्थान,किंवा अन्य सुविधा मिळतात त्याचा स्विकार करुन हळू हळू त्यागाची गुणवत्ता वाढवितो. जे काही एखादा येथे प्राप्त करतो, ते केवळ आपल्या चांगल्यासाठीच नाही, तर अज्ञात व्यक्तिसाठी ज्यांनी हे दान दिले आहे त्यांच्या चांगल्यासाठी कठोरपणे काम करुन मनाला शुध्द करण्यासाठी, ह्याचा सर्वात चांगला उपयोग करतो.

पुढील (parami)पुण्य आहे (sīla)शील-- नैतिकता. एकजण, सदासर्वदा आणि शिबीरादरम्यान व दैनिक जीवन ह्या दोन्हीमध्ये ह्या पाच शीलांचे पालन करुन ही पारमी वाढविण्याचा प्रयत्न करतो. सांसारिक जीवनामध्ये पुष्कळच अडचणी येतात ज्यामुळे(sīla) शीलाचा अभ्यास करणे मुश्किल होऊन जाते. तरीसुध्दा, येथे ध्यान शिबीरामध्ये, व्यस्त कार्यक्रम आणि कडक अनुशासन यामुळे शीलांचा भंग होण्यास संधीच मिळत नाही. सदाचाराचे शिस्तीने पालन करण्यामध्ये केवळ बोलण्यामुळे एखादा विचलित होण्याचा संभव असतो. ह्या कारणामुळेच शिबीरामध्ये पहिले नऊ दिवस मौनव्रत पाळण्याची एकजण प्रतिज्ञा करतो. ह्या प्रकारे, कमीत कमी शिबिरा दरम्यान, (sīla) शीलांचे पूर्ण प्रकारे पालन केले जाते.

एक आणखी( parami) पुण्य(पारमी) आहे (vīriya) वीर्य---परिश्रम. उदाहरणार्थ दैनिक जीवनासाठी एकजण आपल्या भरण पोषणासाठी कमावण्याचा परिश्रम करतो. तथापी ,येथे, परिश्रम हा सजगता आणि समता ठेवून मनाला शुध्द करणे आहे. हाच खरा परिश्रम आहे, जो मुक्तिकडे घेऊन जातो.

एक आणखी (parami)पुण्य आहे (paññā) प्रज्ञा--ज्ञान. बाह्य जगामध्ये, एखाद्यास ज्ञान असू शकते, परंतू हे ज्ञान पुस्तके वाचण्यामुळे, दुसऱ्यांकडून ऐकून, किंवा केवळ बौध्दिक समजुतीने असू शकते. खऱ्या ज्ञानाचे (parami)पुण्य आपल्या मधील समजदारी, जे ध्यानाच्या आपल्या अनुभवाने तयार होते. प्रत्यक्षरीत्या आत्म-अवलोकनाने एकजण अनित्यता, दुःख, आणि अहंकारविहिनता या तथ्यांचा अनुभव घेतो. सत्याच्या ह्या प्रत्यक्ष अनुभवामुळे एकजण दुःखातून बाहेर येतो.

एक आणखी (parami)पुण्य आहे (khantī) -- सहिष्णुता. ह्या प्रकारच्या शिबीरामध्ये, काम करताना व एकत्र रहाताना कुणा दुसऱ्या व्यक्तिच्या कृतीमुळे एखाद्यास त्रास आणि चिडचिडेपणा येऊ शकतो. परंतु लवकरच त्याला समजते की ही व्यक्ति, जी अशांती उत्पन्न करीत आहे तिला ती काय करीत आहे त्याचे ज्ञान नाही, किंवा ती व्यक्ति आजारी आहे. आता क्षोभ दूर होऊन जातो, आणि त्या व्यक्तिबद्दल फक्त प्रेम व करुणा वाटू लागते. त्याचा सहिष्णुतेचा गुण वृध्दींगत होणे सुरु होते.

एक आणखी paramiपुण्य आहे sacca --सत्य. sacca सत्यचा अभ्यास करुन एकजण वाणीने सत्यनिष्ठता ठेवण्याचे वचन देतो. तथापि,saccaसत्याचे खोल भावनेने अभ्यास केला गेला पाहिजे. ह्या मार्गावरील प्रत्येक पाऊल स्थूल पासून प्रकट, सूक्ष्म सत्य, आणि परम सत्यासाठी असले पाहिजे. कल्पनेसाठी कोणतीही जागा नाही. कुणालाही सदासर्वदा वर्तमान काळात अनुभव होणाऱ्या सत्याबरोबरच राहिले पाहिजे.

दुसरे (parami) पुण्य आहे (adhiṭṭhāna)अधिष्ठान -- दृढ संकल्प. जेव्हा एकजण विपश्यना शिबीर सुरु करतो, तेव्हा तो एक दृढ संकल्प करतो की शिबीराच्या पूर्ण अवधीपर्यंत तेथे राहील. एकजण नीतिवचन, मौनाचे पालन, व शिबीराचे सर्व अनुशासन यांचे पालन करण्याचा निश्चय करतो. विपश्यना तंत्राच्या परिचयानंतर आपले डोळे, हात किंवा पाय न उघडता प्रत्येक सामुहिक साधनेमध्ये पूर्ण एका तासासाठी ध्यान करण्याचा दृढ संकल्प करतो. काही काळानंतर ह्या मार्गावर अशी स्थिती येईल की हे (parami) पुण्य पुष्कळच महत्वपूर्ण होईल; जेव्हा अंतिम लक्ष्याजवळ पोहोचत असाल तर एखाद्यास मुक्तिपर्यंत पोहोचेपर्यंत विरामाशिवाय बसण्याची तयारी ठेवली पाहिजे. ह्यासाठी दृढ संकल्पाला अधिक वाढविले पाहिजे.

दुसरी एक (parami) पुण्य आहे (mettā) मैत्री-- शुध्द, निःस्वार्थ प्रेम. पूर्वी एखाद्याने दुसऱ्यांसाठी प्रेम आणि सद्भावना वाटावी यासाठी प्रयत्न केला, परंतु ही सजगता केवळ मनाच्या वरच्या स्तरावरचीच होती. बेसावधावस्थेच्या स्तरावर जुने तणाव चालूच रहातात. जेव्हा संपूर्ण मन शुध्द होते, तेव्हा मनाच्या अंतर्भागापासून एकजण दुसऱ्याच्या सुखाची इच्छा करु शकतो. हे खरे प्रेम आहे, जे दुसऱ्याला मदत करते आणि आपल्या स्वतःलादेखील त्याची मदत होते.

आता आणखी एक (parami) पुण्य आहे (upekkhā) उपेक्षा-- समता. एकजण स्थूल,अप्रिय संवेदना किंवा मुर्च्छित भागाचा अनुभव घेतानाच नाही तर सूक्ष्म,सुखद,संवेदनेला तोंड देताना मनाची समता ठेवण्यास शिकतो. प्रत्येक स्थितीमध्ये एकजण समजून असतो की त्या क्षणाचा अनुभव अनित्य आहे, नष्ट होणारच आहे. ह्या समजूतीमुळे तो अलिप्त, समतेमध्ये रहातो.

सर्वात शेवटचे (parami) पुण्य आहे (dāna) दान-- परोपकार बुध्दी, दान. सामान्य व्यक्तिसाठी, हे धम्माचे पहिले आवश्यक पाऊल आहे. एखाद्यास आपल्या आणि त्याच्यावर अवलंबून असणाऱ्याच्या उपजिविकेसाठी योग्य प्रकारे पैसे कमावण्याची जबाबदारी आहे. परंतु जेव्हा तो पैसे कमावतो व त्याप्रति आसक्ति उत्पन्न करतो, तेव्हा तो अहंकार वाढवित असतो. ह्याच कारणामुळे एकजण जे कमावतो त्यातील एक हिस्सा दुसऱ्यांच्या हितासाठी दिला गेला पाहिजे. जर त्याने असे केले तर त्याचा अहंकार वाढणार नाही, कारण की त्याला समजते की जे काही तो मिळवितो त्यामध्ये त्याचाच नाही तर दुसऱ्यांचा देखील फायदा आहे. कोणत्याही प्रकारे दुसऱ्यांना मदत करण्याची इच्छा एखाद्यास उत्पन्न होते. आणि एखाद्यास वाटू लागते की त्यांना दुःखातून बाहेर पडण्याचा रस्ता दाखविण्यास मदत करणे यापेक्षा दुसरी कुठलीही मोठी मदत होऊ शकत नाही.

ह्या प्रकारच्या एका शिबीरामध्ये एकास ही parami(पुण्य) वाढविण्यासाठी एक अद्भुत सुसंधी मिळते. येथे जे काही मिळते ते दुसऱ्या अन्य व्यक्तिकडून दान रुपात मिळालेले असते; येथे शिकविण्यासाठी खोली व दैनिक भोजन यासाठी निश्चितच कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. त्याबदल्यात, कुणा आणखी दुसऱ्याच्या लाभासाठी एकजण दान देऊ शकतो. दानराशी कुणा एकाच्या कमाईप्रमाणे तो देतो. स्वाभाविकपणे धनवान व्यक्तिला अधिक दान देण्याची इच्छा होईल, तरी सुध्दा लहानात लहान दान सुध्दा चांगल्या इच्छेने देण्यामुळे ही parami पुण्य वाढविण्यात पुष्कळच मुल्यवान आहे. ह्या बदल्यात काहीही मिळण्याची अपेक्षा न ठेवता एकजण दान देतो अशासाठी की दुसऱ्यानी धम्मामुळे मिळणाऱ्या लाभाचा अनुभव घ्यावा व आपल्या दुःखातून बाहेर यावे.

येथे आपणास सर्व दहा parami पुण्याना वाढवण्याची संधी मिळते. ह्या सर्व चांगल्या गुणांनी जेव्हा आपण संपन्न व्हाल तेव्हा अंतीम लक्ष्यापर्यंत पोहोचाल.

त्यांना थोडे थोडे वाढविण्यासाठी अभ्यास चालुच ठेवा. धम्माच्या मार्गावर प्रगती करत रहा, फक्त आपल्या फायद्यासाठी आणि मुक्तिसाठी नाही तर पुष्कळांच्या फायद्यासाठी व मुक्तिसाठीसुध्दा.

सर्व दुःखी प्राण्याना शुध्द धम्म मिळो, आणि मुक्त होवोत.

सर्वांचे मंगल होवो!