तिसऱ्या दिवसाचे प्रवचन

आर्य अष्टांगिक मार्ग: प्रज्ञा- ज्ञान प्राप्त झाले, बौद्धिक ज्ञान, अनुभवात्मक ज्ञान - कलापा - चार घटक - तीन लक्षण: अनित्य, अहंकाराचा भ्रामक जातिस्वभाव, दुःख – दिखावू सत्याने भेदन 

तिसरा दिवस समाप्त झाला.उद्या दुपारी तुम्ही पन्ना,च्या क्षेत्रामध्ये प्रवेश कराल, प्रज्ञा - आर्य अष्टांगिक मार्गाचा तिसरा खंड. प्रज्ञेशिवाय, मार्ग अपुराच रहातो.

कुणीही शीलपालन करुन धर्माच्या मार्गावर चालणे सुरु करतो, म्हणजेच तो दुसऱ्याला अहितकारक होतील अशी कृत्ये, क्रिया या पासून दूर रहातो; परतू जरी तो दुसऱ्यांचे नुकसान करीत नसला,तरीही आतासुध्दा आपल्या मनामध्ये दुषितता उत्पन्न करुन स्वतःला हानी पोहोचवत असतो. जी दुषितता मनामध्ये उत्पन्न झाली आहे त्याचे दमन करण्यासाठी, व मनावर नियंत्रण मिळविण्यासाठी आपण Samādhi(समाधि) चे प्रशिक्षण घेणे सुरु करतो. तरीसुध्दा दुषितता दाबून ठेवून त्यांना संपवू शकत नाही. त्या तेथे सुप्तावस्थेत रहातात आणि वृध्दिंगत होतात आणि आपल्यास नुकसान होणे सुरुच रहाते.ह्या साठीच धम्मचा तिसरा टप्पाpaññā(प्रज्ञा): दुषितताना पूर्ण सूट नाही किंवा त्याना दाबून ठेवणे ,परंतू त्या ऐवजी त्याना उत्पन्न होऊ देऊन नष्ट होऊ देतो.जेव्हा दुषितताना नष्ट करीत असतो त्याच वेळी मन विकारांपासून मुक्त होत रहाते. आणि जेव्हा मन शुध्द होते तेव्हा ज्या कृत्यामुळे दुसऱ्याचे नुकसान होते अशापासुन आपण दूर रहातो, कारण की शुध्द मनाचा मुळ स्वभाव हा दुसऱ्या प्रति सद्भावना आणि करुणेने भरलेला असतो. अशाप्रकारे, कोणत्याही प्रयासा शिवाय स्वतःला नुकसान करणाऱ्या अशा कामांपासून दुर ठेवतो. एकजण सुखी आणि स्वस्थ जिवन जगतो. अशाप्रकारे ह्या मार्गावरील प्रत्येक टप्पा आपणास पुढे घेईन जातो. म्हणजेच Sīla(शील)ही खऱ्या एकाग्रतेच्या Samādhi(समाधि) विकासाकडे घेऊन जातो; Samādhi(समाधि) ही  जे मनाला शुध्द करणाऱ्या paññā(प्रज्ञा) चा विकास करते; paññā(प्रज्ञा) ही सर्व विकारांपासून मुक्ति,म्हणजे संपूर्ण ज्ञान nibbāna(निब्बाण) पर्यंत घेऊन जातो.

paññā(प्रज्ञा)च्या अंतर्गत आर्य अष्टांगीक मार्गाचे अधिक दोन भाग येतात.

(7) Sammā-saṅkappa सम्मा-संकल्प - विवेक. ज्ञानाचा विकास सुरु करण्यापूर्वी पूर्ण विचार प्रक्रिया बंद करणे आवश्यक नाही. विचार चालूच रहातात,परंतू विचार करण्याच्या स्वरुपामध्ये परिवर्तन येते. श्वासाच्या बद्दल सजगतेच्या अभ्यासामुळे मनाच्या वरच्या स्तरावरील विकार नष्ट होण्यास सुरुवात होते. राग,द्वेष,आणि मोह यांच्या विचारा ऐवजी, निरोगी विचार,धम्माचा विचार,आपल्या मुक्तिच्या मार्गा बद्दल व्यक्ती विचार करणे सुरु करते.

(8) Sammā-diṭṭhi सम्मा-दिठ्ठी -समंजस विचार. हीच खरी paññā पन्ना(प्रज्ञा)आहे.सत्याला जसे आहे तसेच समजणे,जसे बाह्यस्वरुप वाटते तसे नाही.

येथे paññā(प्रज्ञा) ज्ञानाच्या विकासाचे तीन टप्पे आहेत.प्रथमsuta-mayā paññā(श्रृतमय प्रज्ञा) हे ज्ञान, दुसऱ्यांचे शब्द ऐकून किंवा वाचून मिळवलेले ज्ञान आहे.हे प्राप्त केलेले ज्ञान योग्य दिशा देण्यास उपयोगी आहे. तथापि,हे आपल्यास मुक्त करु शकत नाही,कारण की हे ज्ञान उसने घेतलेले असते. एकादा कदाचित अंध विश्वासाने,किंवा न मानल्यास नरकात जाण्याच्या भितीमुळे, किंवा कदाचित मानण्यामुळे स्वर्गामध्ये जाण्याच्या लालसेपोटी ह्या सत्याचा स्विकार करीत असतो. परंतू कोणत्याही परिस्थिती मध्ये, कुणाचेही हे आपले स्वतःचे ज्ञान नाही.

मिळालेल्या ज्ञानाचे काम पुढील टप्प्यावर घेऊन जाणे आहेः cintā-mayā paññā(चिंतनमय प्रज्ञा), बौद्धिक समज. काय ऐकले किंवा वाचले आहे त्याची कुणीही तर्काने परिक्षण करतो,आणि पहातो की काय हे सर्व तार्किक,व्यावहारिक,फायदेशीर आहे; ते असे असेल तरच त्याचा स्विकार करतो. ही तर्कसंगत समजदारी सुध्दा महत्वपूर्ण आहे, परंतू ह्यालाच शेवट असे मानले तर तो मोठा धोका होऊ शकतो. एकजण आपले बौध्दिक ज्ञान विकसित करतो,आणि निर्णय करतो ह्यामुळे ती एक अतिशय बुध्दिमान व्यक्ति आहे. जे काही आपण शिकलो आहोत त्यामुळे त्याचा केवळ अहंकार वाढण्यास मदत होते;तो आता देखील मुक्तिपासून दूर आहे.

पुढच्या टप्प्यावर घेऊन जाणे हेच बौध्दिक समजुतीचे योग्य कार्य आहे; bhāvanā-mayā paññā(भावनामय प्रज्ञा),म्हणजे आपल्या अनुभवाच्या आधारावर आपल्यामध्ये प्रकट झालेले ज्ञान. हेच खरे ज्ञान आहे. जर पुढचे पाऊल उचलण्यासाठी प्रेरणा आणि मार्गदर्शन जर कुणापासून मिळत असेल तर असे ज्ञान आणि बौध्दिक समज पुष्कळच उपयोगी आहे. तथापि, हेच केवळ अनुभवात्मक ज्ञान मुक्ति देऊ शकते, कारण की स्वतःच्या अनुभवावरील आपले ज्ञान आहे.

तीन प्रकारच्या ज्ञानाचे एक उदाहरणःएक डॉक्टर रोगी माणसास औषधांची यादी देतो.मनुष्य घरी येतो,आणि आपल्या डॉक्टरावरील मोठ्या विश्वासामुळे रोज त्या उपचार सूचीचे पठण करतो; ही आहे suta-mayā paññā(श्रृतमय प्रज्ञा).त्याने संतुष्ट न झाल्यामुळे तो डॉक्टर कडे परत येतो,आणि त्या उपचार सूचीचे स्पष्टीकरण मागतो आणि मिळवितो की हेच का जरुरी आहे आणि हे कसे काम करेल; ही आहे cintā-mayā paññā(चिंतनमय प्रज्ञा). शेवटी मनुष्य औषध घेतो;त्यानंतरच त्याच्या रोगाचे निर्मूलन होते. खरा लाभ हे तिसरे पाऊल, bhāvanā-mayā paññā (भावनामय प्रज्ञा)उचलल्यामुळेच होतो.

आपण स्वतःच औषध घेण्यासाठी, आपले ज्ञान विकसित करण्यासाठी ह्या शिबीरामध्ये आला आहात. हे करण्यासाठी, आपल्याला अनुभवाच्या स्तरावर सत्य समजून घेतले पाहिजे.भ्रम इतका आहे की ज्या प्रकारची वस्तुस्थिती दिसते त्या पेक्षा वास्तविकता पूर्ण प्रकारे वेगळीच असते.हा भ्रम दूर करण्यासाठी आपल्या अनुभवात्मक ज्ञान विकसित करावे लागेल.आणि शरिराच्या चौकटी बाहेर सत्याचा अनुभव घेतला जाऊ शकत नाही;तो केवळ बुध्दिजीवी असेल. ह्यासाठी आपल्यास स्थूल पासून सूक्ष्मतम स्तरापर्यंत आपल्या शरीरांतील सत्याचा अनुभव करुन,सर्व भ्रम,सर्व बंधनापासून बाहेर येण्यासाठी आपली क्षमता विकसित करावी लागेल.

प्रत्येक जण जाणतो की ब्रह्मांड सतत बदलत रहाते,परंतू ह्या सत्यास बौध्दिक स्तरावर समजण्याने काहीही मदत होणार नाही;कुणालाही आपल्या आंतील सत्याचा अनुभव करायला पाहिजे.कदाचित एक दुःखद घटना जसे की जवळच्या किंवा प्रिय व्यक्तिचा मृत्यू झाल्यास नश्वरतेच्या तथ्याला तोंड देण्यासाठी प्रतिबद्ध होतो आणि प्रपंचासाठीचे प्रयत्न आणि दुसऱ्याबरोबर भांडण्याच्या निरर्थकतेचे ज्ञान विकसित करतो.परंतू लवकरच अहंकाराची जुनी संवय पुनर्स्थापित होते,आणि ज्ञान लयास जाते, कारण की हे प्रत्यक्ष व्यक्तिगत अनुभवावर आधारित नव्हते. कुणालाही आपल्यातील नश्वरतेच्या सत्याचा अनुभव नाही.

सर्व काही क्षणभंगूर आहे,क्षणोक्षणी उत्पन्न होते आणि नष्ट होत रहाते-- aniccā (अनिच्च);परंतू ती प्रक्रिया इतकी जलद आणि निरंतर होत असल्याने ती टिकावू असल्याचा भ्रम उत्पन होतो.मेणबत्तीची ज्वाला आणि विजेच्या दिव्याचा प्रकाश हे दोन्ही सतत बदलत असतात.एकादा जर भानावर आला तर त्याला परिवर्तनाची प्रक्रिया समजून येईल की जसे मेणबत्तीच्या बाबतीत होते,तेव्हा तो ह्या भ्रमातून बाहेर येईल. परंतू जेव्हा विजेच्या प्रकाशा बाबतीत परिवर्तन इतके जलद आणि निरंतर होते की कुणालाही ह्याची जाणीव होत नाही,त्यामुळे ह्या भ्रमातून बाहेर पडणे मुश्किल होते. कुणालाही वाहत्या नदीच्या सतत बदलणाऱ्या प्रवाहाचे परिवर्तन समजू शकते,परंतू हे कसे समजणार की जो माणूस त्या मध्ये स्नान करीत आहे तो देखील प्रत्येक क्षणी बदलत आहे?

आपल्या आंतरिकतेचा शोध घेण्यास शरीरस्कंध व चित्तस्कंधाच्या सत्याचा अनुभव घेण्यास शिकणे हाच ह्या भ्रमातून बाहेर येण्याचा एक मार्ग आहे.सिध्दार्थ गौतमानी बुध्द होण्यासाठी हेच केले. पुर्वग्रह बाजूस ठेवून शरीरस्कंध आणि चित्तस्कंधाच्या सत्य जातिस्वभावाचा शोध घेण्यासाठी स्वतःला जाणुन घेतले.वरवरच्या भासमान सत्यापासून सुरु करुन त्यांनी शोधून काढले की पुर्ण शरीरस्कंधाची रचना,पूर्ण भौतिक विश्व सुक्ष्म अणूरेणूने बनला आहे ज्याला पाली भाषेमध्ये म्हटले जाते attha Kalāpa(अष्टकलापा ).त्यांनी हे देखील शोधले की हा प्रत्येक सूक्ष्म परमाणू मध्ये चार मूलतत्वे पृथ्वी,जल,अग्नि,वायू त्यांच्या पुरक स्वभावविषेशा सहित सामावली आहेत-. त्यांनी पाहिले की हे कण(अणू) घन पदार्थ होण्यासाठी आधारभूत आहेत,आणि अतिशय शीघ्रपणे ते उत्पन्न होतात आणि नष्ट होत असतात—एका सेकंदा मध्ये दशलक्ष दशलक्ष(एकावर बारा शून्ये) वेळा. सत्य तर हे आहे की भौतिक विश्वा मध्ये कोणतेही घनत्व नाही;तेथे फक्त ज्वलन आणि कंपन आहे.

आधुनिक शास्रज्ञांनी बुध्दाच्या शोधाची पुष्टी केली, आणि प्रयोगाद्वारे सिध्द केले कि पुर्ण भौतिक विश्व हे लहान लहान परमाणू मुळे बनले जे शीघ्र गतीने उत्पन्न होतात आणि नष्ट देखील होतात.तथापि हे शास्रज्ञ सर्व दुःखापासून मुक्त होऊ शकले नाहीत, कारण की त्यांचे ज्ञान फक्त बौध्दिक स्तरावरचेच होते. बुध्दासारखा त्यांनी आपल्या आंतील सत्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला नव्हता.जेव्हा कुणीही स्वतःच्या नश्वरतेच्या सत्याचा अनुभव करतो,त्या नंतरच तो आपल्या दुःखातून बाहेर पडणे सुरु करतो.

जस जशी aniccā(अनिच्च) ज्ञान आपल्या मध्ये विकसित होत जाईल, ज्ञानाचा दुसरा पैलू वर यायला सुरुवात होईलः anattā(अनत्ता),“मी” नाही, “माझे” नाही.शरीर आणि मनाच्या रचने मध्ये,एक क्षणा पेक्षा वेळ जास्त काहीही टिकत नाही, ज्याला आपण ओळखू शकू असा न बदलणारा “मी” किंवा अंतरात्मा नाही. जर खरे तर “माझे” म्हणण्यासारखे काही असलेच तर त्यावर त्याचा अधिकार असला पाहिजे,त्यावर त्याचे नियंत्रण असले पाहिजे,परंतू खरे तर आपल्या शरीरावर कुणाचेही स्वामित्व नाही,आपल्या इच्छेविरुध्द ते बदलत रहाते त्याचा नाश होत रहातो.

तेव्हा ज्ञानाचा तिसरा पैलू विकसित होतोः dukkha पीड़ा.जेव्हा कुणीही जे आपल्या नियंत्रणा बाहेर बदलत रहाते त्यास प्राप्त करुन आपल्या कडे धरुन ठेवण्याचा प्रयत्न करतो,तेव्हा तो आपल्यासाठी दुःख निर्माण करीत असतो. सर्वसाधारण पणे,एखादा अप्रिय संवेदनेच्या अनुभवाद्वारे दुःखाला ओळखू शकतो,परंतू सुखद संवेदना देखील जर त्याच्याबद्दल आसक्ति निर्माण झाली तर ती देखील तितकीच दुःखाचे कारण बनू शकते,कारण की ती देखील अनित्यच आहे.जे क्षणभंगुर आहे त्यासाठी आसक्ति ठेवणे निश्चितच दुःख उत्पन्न करते.

जेव्हा aniccā(अनिच्च), anattā(अनत्ता),आणि dukkha(दुःख)ची समजूत मजबूत होईल,तेव्हा हे दैनिक जीवनामध्ये ज्ञान प्रकट होईल.कुणीही आपल्या आंतील प्रत्यक्ष सत्याला भेदण्यास शिकतो,तेव्हा बाह्य परिस्थितीचे भासमान सत्य आणि तसेच अंतिम सत्य पहाण्यास सक्षम होतो.एकादा भ्रमातून बाहेर येतो आणि सुखपुर्वक, स्वस्थ जीवन जगतो.

पुष्कळ्से भ्रम भासमान,एकत्रित,संकलित सत्याद्वारे तयार झाले आहेत—उदाहरणार्थ,शारीरिक सौंदर्याचा भ्रम.जो पर्यंत देह एकसंघ आहे तो पर्यंत शरीर सुंदर दिसते. त्याचा कोणताही भाग वेगळा केला तर (आकर्षणा शिवाय,रुपा शिवाय) तर asubha(अशुभ) अशुभ आहे. शारीरिक सौदर्य वरवरचे भासमान सत्य, परंतू परम सत्य नाही.

तथापि,शारीरिक सौंदर्याच्या प्रकृतीला भ्रामक समजण्याने दुसऱ्यां प्रति घृणे कडे घेऊन जाणार नाही.जसे ज्ञान प्राप्त करु लागतो, तसे स्वाभाविक पणेच मन संतुलित, अनासक्त, शुद्ध, सर्वां प्रति सदिच्छा पूर्ण होऊन जाते.आपल्या आंतील सत्याच्या अनुभवा नंतर,कुणीही भ्रम,राग(आसक्ति),आणि द्वेष या मधून बाहेर येऊ शकतो,आणि शांती व सुखमय जीवन जगू शकतो.

उद्या दुपारी, जेव्हा आपण विपश्यनेचा अभ्यास सुरु करु तेव्हा paññā(प्रज्ञा) च्या क्षेत्रामध्ये आपण पहिले पाऊल ठेवणार आहोत . आपण सुरु करता क्षणीच आपल्यास सर्व सुक्ष्म अणूंचे शरीरभर उत्पन्न होणे आणि नष्ट होणे आपण पाहू अशी आशा करु नका. कुणीही व्यक्ति स्थूल,भासमान सत्यापासून सुरु करते,आणि समता ठेवूनच हळू हळू सूक्ष्म सत्याचा, मन व शरीराच्या अंतिम सत्याचा,मानसिक खंडाचा आणि शेवटी जे शरीर आणि मनाच्या पलिकडे आहे अशा अंतिम सत्याचे आकलन करते.

हे लक्ष्य गांठण्यासाठी,स्वतःच हे काम केले पाहिजे. म्हणूनच sīla(शील) मजबूत ठेवा,कारण की हीच आपल्या ध्यानाची आधारशीला आहे, आणि उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत आनापानचा अभ्यास सुरु ठेवा व नाकाच्या क्षेत्राजवळील सत्यास पहात रहा. आपल्या मनास तीक्ष्ण करीत रहा, कारण की जेव्हा आपण उद्या विपश्यनेचा अभ्यास सुरु करु,तेव्हा खोलवरच्या स्तरावर जाऊ शकाल आणि तेथे लपून असलेल्या दोषाना काढू शकाल. आपल्या भल्यासाठी,आपल्या स्वतःच्या मुक्तिसाठी धीराने,दृढतेने,निरंतर काम करीत रहा.

आपण सर्व मुक्तिच्या मार्गावर पहिले पाऊल ठेवण्यात सफल व्हा.

सर्वांचे मंगल होवो !