स्पष्टीकरणकोश

सामान्य

द्विभाषी शिबीर अशी शिबीरे असतात जी दोन भाषांमध्ये शिकवली जातात. सर्व साधक दैनंदिन साधनेच्या सूचना दोन भाषांमध्ये ऐकतील. संध्याकाळचे प्रवचन वेगळे ऐकवले जाईल.

जुने साधक म्हणजे ते, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर किमान एक १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे.

जुन्या साधकांना खाली दिलेल्या शिबीरांमध्ये धम्मसेवेची संधी प्राप्त होऊ शकते.

सर्व शिबीरे पूर्णतः दानाच्या आधारे चालतात. सर्व खर्च त्यांच्या दानाने पूर्ण होतात, जे शिबीर पूर्ण करून विपश्यनेचा लाभ अनुभव केल्यानंतर दुसर्‍यांना ही संधी देऊ इच्छितात. आचार्य अथवा सहायक आचार्याना काहीही मानधन मिळत नाही; ते आणि शिबीरामध्ये सेवा देणारे आपला वेळ स्वेच्छेने देतात. अशा प्रकारे विपश्यना व्यावसायिकरणापासून मुक्त स्वरूपामध्ये दिली जाते.

ध्यान शिबीरे दोन्ही केंद्र आणि केंद्राव्यतिरिक्त स्थळांवर आयोजित केली जातात. ध्यान केंद्रे शिबिरांचे वर्षभर नियमित रूपाने आयोजन करण्यांस समर्पित आहेत. ह्या परंपरेप्रमाणे ध्यान केंद्रे स्थापित करण्याआधी सर्व शिबीरे कँप, धार्मिक स्थान, चर्च व अशा प्रकारे तात्पुरत्या जागी आयोजित केली जात असत. आज, जिकडे विपश्यना क्षेत्रामध्ये स्थित साधकां द्वारा केंद्र स्थापना अजून झाली नाही, अशा क्षेत्रांमधे १० दिवसीय ध्यान शिबीरे केंद्र-व्यतिरीक्त स्थळांवर आयोजित केली जातात.


शिबीराचा प्रकार

जुन्या साधकांचे संक्षिप्त शिबीर (१ - ३ दिवसीय) अशा सर्व साधकांसाठी आहे, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे. शिबीराला उपस्थित राहण्यासाठी सर्व जुन्या साधकांच्या आवेदनाचे स्वागत आहे. ह्यात असे जुने साधकही अंतर्भूत आहेत, ज्यांना आधीचे शिबीर करून काही काळ झाला आहे.

१० दिवसीय शिबीरे विपश्यना साधनेची परिचयात्मक शिबीरे आहेत जिथे ही साधना पद्धती दररोज क्रमशः शिकवली जाते. ही शिबिरे सायंकाळी २ - ४ नोंदणी आणि सूचनांनंतर आरंभ होतात. त्यानंतर १० पूर्ण दिवस साधना होते. शिबीरे ११व्या दिवशी सकाळी ७.३० ला समाप्त होतात.

अधिकार्‍यांसाठी १० दिवसीय शिबीर केवळ कार्यकारी आणि प्रशासकीय अधिकार्‍यांसाठी विपश्यना साधनेचे परिचयात्मक शिबीर आहे, जिथे ही साधना दररोज क्रमशः शिकवली जाते. अधिक माहितीसाठी कृपया अधिकार्‍यांच्या शिबीरांची वेबसाइट. पहा. ही शिबिरे सायंकाळी २ - ४ नोंदणी आणि सूचनांनंतर आरंभ होतात. त्यानंतर १० पूर्ण दिवस साधना होते. शिबीर ११व्या दिवशी सकाळी ७.३० ला समाप्त होते.

 जुन्या साधकांच्या 10-दिवशीय शिबीरासाठी १० दिवशीय शिबीरासारखेच वेळापत्रक आणि आचारसंहिता आहे. कमीतकमी तीन १० दिवशीय शिबीरे आणि एक सतिपठ्ठान सुत्त शिबीर तसेच गेल्या १० दिवशीय शिबीरा नंतर कोणतीही अन्य साधना न करणाऱ्या तसेच कमीतकमी एक वर्षभर विपश्यना करणाऱ्या व दैनंदिन अभ्यास करणाऱ्या व दैनंदिन जीवनामध्ये पाच शीलांचे पालन करणाऱ्या गंभीर जुन्या साधकांसाठीच आहेत.

विशेष १० दिवसीय शिबीर केवळ गंभीर जुन्या आणि ह्या साधनेमध्ये कटिबद्ध साधकांसाठी आहे, ज्यांनी कमीत कमी ५ दहा दिवसीय शिबीरे आणि एक सतिपट्ठान सुत्त शिबीर केले आहे; कमीत कमी एक १० दिवसीय धम्मसेवा दिली आहे आणि किमान २ वर्षांपासून नियमीत प्रकारे साधनेचा अभ्यास करत आहेत.

The 14-Day Gratitude Course was previously called the Teacher's Self Course. One of the qualities we develop as we meditate is gratitude - gratitude towards one’s teachers, Goenkaji and Mataji, and towards the long tradition of Vipassana teachers, right back to the Buddha.

The course is open to old students who are active in giving service. Requirements include 3 x 10day courses plus one Satipaṭṭhāna course, being active in Dhamma service, trying to maintain two-hour daily practice since last 10-Day course, and trying to maintain the five precepts to the best of one's ability. Local teacher’s recommendation is required. The course follows the usual format of 3x group sittings with instructions in the day, but students work more independently and the teaching materials are drawn from the 20-day course. This is a half-way step to help students mature for long courses, and serves to inspire students to work more deeply in Dhamma.

२० दिवसीय शिबीर केवळ गंभीर जुन्या आणि ह्या साधनेमध्ये कटिबद्ध साधकांसाठी आहे, ज्यांनी कमीत कमी ५ दहा दिवसीय शिबीरे आणि एक सतिपट्ठान सुत्त शिबीर केले आहे; कमीत कमी एक १० दिवसीय धम्मसेवा दिली आहे आणि किमान २ वर्षांपासून नियमीत प्रकारे साधनेचा अभ्यास करत आहेत.

३० दिवसीय शिबीर केवळ गंभीर जुन्या आणि ह्या साधनामध्ये कटिबद्ध साधकांसाठी आहे, ज्यानी कमीतकमी ६ दहा दिवसीय शिबीरे (२०-दिवसीय शिबीरानंतर एक), एक २० दिवसीय शिबीर आणि एक सतिपट्ठान सुत्त शिबीर केले आहे आणि किमान २ वर्षांपासून नियमीत प्रकारे साधनेचा अभ्यास करत आहेत.

४५ दिवसीय शिबीर केवळ धम्मसेवेशी संबंधित साधकांसाठी आणि सहाय्यक आचार्यांसाठी आहे, ज्यानी कमीत कमी ७ दहा दिवसीय शिबीरे (३०-दिवसीय शिबीरानंतर एक), दोन ३० दिवसीय शिबीरे आणि एक सतिपट्ठान सुत्त शिबीर केले आहे आणि किमान ३ वर्षांपासून नियमीत प्रकारे साधनेचा अभ्यास करत आहेत.

६० दिवसीय शिबीर केवळ धम्मसेवेशी संबंधित साधकांसाठी आणि सहाय्यक आचार्यांसाठी आहे, ज्यांनी किमान दोन ४५ दिवसीय शिबीरे केली आहेत; आणि किमान ५ वर्षांपासून दैनिक साधनेचा अभ्यास (प्रतिदिन २ तास) करत आहेत; जीवहत्येपासून विरत आहेत; अब्रम्हचर्यापासून विरत आहेत; नशिल्या पदार्थांच्या सेवनापासून विरत आहेत; आणि बाकीच्या शीलांचे पालन आपल्या क्षमतेनुसार किमान १ वर्ष करत आहेत तसेच; मागील दीर्घ शिबीरानंतर ६ महिन्यांचा अवधी गेला आहे; मोठे शिबीर आणि अन्य कुठल्याही शिबीरामध्ये १० दिवसाचा अवधी आहे. हे शिबीर केवळ सहाय्यक आचार्य आणि धम्मसेवेशी कटिबद्ध साधकांसाठीच आहे.

लहान मुलांची शिबीरे ८ - १२ वर्षांच्या सर्व मुलांसाठी खुली आहेत, जे साधना शिकू इच्छितात. त्यांचे आई-वडील / पालक साधक असणे जरूरी नाही.

जुन्या साधकांचे कार्यक्रम सेवा कालावधि सारखेच असतात, ज्यांमध्ये केंद्राची देखरेख, निर्माण, घरगुती आणि बागकामासारखे विविध परंतु अधिक पूर्ण आणि संरचित कार्यक्रम असतात. ह्यांमध्ये सहाय्यक आचार्यांना भेटण्याची संधी प्राप्त होते, आणि समिती तसेच विश्वस्त बैठकांना उपस्थित राहण्यास मिळण्याची शक्यता असते. सर्व जुन्या साधकांचे भाग घेण्यासाठी स्वागत आहे. दैनिक कार्यक्रमात ३ सामूहिक साधना आणि सकाळी - दुपारी कामकाजाचा कालावधी समाविष्ट असेल. संध्याकाळी विशेष प्रवचने लावली जातील, जी स. ना. गोयंकाजीनी जुन्या साधकांसाठी दिली आहेत.

खुले दिवस साधना शिबीरादरम्यान असतात. ह्यावेळेस विपश्यना साधना व केन्द्राच्या माहितीसाठी आपल्या सर्वांचे स्वागत आहे.

सतिपठ्ठान सुत्त शिबीरे १० दिवसीय शिबीरांसारखीच समय-सारिणी आणि अनुशासन-संहिता पालन करतात. त्यामध्ये हा फरक आहे की टेप केलेल्या संध्याकाळच्या प्रवचनांमध्ये सतिपठ्ठान सुत्ताचा बारकाईने अभ्यास केला जातो. सतिपठ्ठान सुत्त हा प्रमुख पाठ आहे, ज्यामध्ये विपश्यना साधनापद्धती सुव्यवस्थित स्वरूपात समजावली आहे. हे शिबीर अशा जुन्या साधकांसाठी आहे ज्यानी किमान तीन १०-दिवसीय शिबीरे पूर्ण केली आहेत, शेवटच्या १०-दिवसीय शिबीरानंतर अन्य कुठल्याही साधना पद्धतीचा अभ्यास केला नाही, विपश्यना साधनापद्धतीचा किमान १ वर्ष अभ्यास केला आहे आणि जे दैनीक जीवनामध्ये पंचशील पालन करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

जुन्या साधकांसाठी स्वयं-शिबीरे १० दिवसीय शिबीरांसारखीच समय-सारिणी आणि अनुशासन-संहिता पालन करतात. त्यामध्ये हा फरक आहे की स्वयं-शिबीरामध्ये आचार्य उपस्थित नसतात. ही शिबीरे जुन्या गंभीर साधकांसाठी खुली असतात ज्यानी किमान तीन १०-दिवसीय शिबीरे केली आहेत, शेवटच्या १०-दिवसीय शिबीरानंतर दुसर्‍या कुठल्याही साधनापद्धतीचा अभ्यास करत नाहीत, विपश्यना साधनापद्धतीचा किमान १ वर्ष अभ्यास करत आहेत आणि जे दैनिक जीवनात पंचशील पालन करण्याचा प्रयत्न करत आहेत.

 केंद्राची देखरेख, निर्माण, घरगुती आणि बागकामासारख्या विविध कार्यक्रमांसाठी सेवा कालावधि वेगळे असतात. सर्व जुन्या साधकांचे भाग घेण्यासाठी स्वागत आहे. दैनिक कार्यक्रमात ३ सामुहिक साधना आणि सकाळी - दुपारी कामकाजाचा कालावधी समाविष्ट असेल. संध्याकाळी निवडक विशेष प्रवचने लावली जातील, जी स. ना. गोयंकाजीनी जुन्या साधकांसाठी दिली आहेत.

युवकांची आनापान शिबीरे १३ वर्ष ते १८ वर्ष वयाच्या युवकांसाठी खुली आहेत. त्यांचे आई-वडील / पालक विपश्यना साधक असणे जरूरी नाही.