प्रायवसी पॉलीसी (गोपनीयता नीति)

धम्म.ऑर्ग(Dhamma.org) आपल्या गोपनीयतेची काळजी घेते. युरोपियन युनियनमध्ये जीडीपीआर सहित जगभरात नवीन डेटा संरक्षण नियम लागू होतात, म्हणून आम्ही सर्व धम्म.ऑर्ग(Dhamma.org) वापरकर्त्यांच्या फायद्यासाठी सुधारणा करण्याची संधी घेतली आहे. विशेषतः, आम्ही 25 मे, 2018 पर्यंत आमचे गोपनीयता धोरण अद्ययावत केले आहे. भाषांतर अद्ययावत करण्याचे कार्य करत असताना आपल्या सहनशिलतेची आम्ही कदर करतो. दरम्यानच्या काळात नवीनतम आवृत्तीसाठी कृपया इंग्रजीमधील गोपनीयता धोरणांचा सल्ला घ्या. धन्यवाद

विपश्यना साधनेच्या वेबसाईटला भेट दिल्याबद्दल आपले आभारी आहोत. आमच्या संस्थेसाठी आपली गोपनीयता महत्वपूर्ण आहे. आपल्या गोपनीयतेला चांगल्या प्रकारे सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला आमची माहिती पध्दत व गोष्टींबद्दल माहित असले पाहिजे की कशा प्रकारे आपली माहिती संग्रहित केली जाते आणि त्याचा उपयोग या साईटवर तसेच सामान्यपणे जगभरांतील आमच्या संलग्न संस्था कशा प्रकारे त्याचा उपयोग करतात हे आपल्याला अवगत असले पाहिजे. तथापि,कृपया हे लक्षांत घ्या की विश्वभरातील आमच्या संलग्न संस्थेच्या गोपनीयता नीतिचे तपशील भिन्न देशामध्ये भिन्न असू शकतात. आपल्या माहितीची गोपनीयता नीति त्या स्थानी काय आहे ते जाणण्यासाठी विपश्यना शिबीर रजिस्ट्रार किंवा विपश्यना शिबीर स्थानी आल्यानंतर गोपनीय नीतिची मूळ प्रत पहायला मिळू शकेल. धम्म.ऑर्गच्या(Dhamm.org) गोपनियता नितीची पीडिएफ(PDF)कॉपी डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.  

आम्ही ही माहिती एकत्र करतो

जर आपण कोणत्याही विपश्यना शिबीरासाठी ऑनलाईन अथवा आवेदन पत्र भरुन नाव नोंदविल्यास आपली व्यक्तिगत ओळख दर्शविणारी सर्व प्रकारची माहिती जमा केली जाते त्यामध्ये नांव, पत्ता, ईमेल पत्ता, दुरध्वनी क्रमांक, फॅक्स नंबर, तसेच आवेदन पत्रांत आणि शिबीर नोंदणी नमून्यात मागविलेली इतर अतिशय व्यक्तिगत माहिती असते. आपली शिबीर आवेदन पत्रांतील व शिबीर नोंदणी नमुन्यातील व्यक्तिगत माहिती आमच्याकडील सुविधेनुसार सुरक्षितरित्या साठविली जाते आणि ज्याना विशिष्ट माहिती जाणुन घ्यायची आहे अशानाच, जसे की शिबीर रजिस्ट्रार, केन्द्र/शिबीर व्यवस्थापक आणि ज्या शिबीराला तुम्ही प्रवेश मागितला आहे त्या शिबीराचे संचालन करणाऱ्या सहाय्यक आचार्यानाच दिली जाते.

जर तुम्हाला आमच्या “ विपश्यनेबद्दल मित्राला सांगणे”(“Tell A Friend About Vipassana”) ह्या सेवेचा वापर करायचा असेल तर इलेक्ट्रॉनिक भेटकार्ड व आमच्या वेब साईटचा पत्ता त्याला पाठवण्यासाठी तुमचा आणि त्या व्यक्तिचा ईमेल पत्ता तुम्ही देणे आवश्यक आहे. त्या सेवेकडून जमा करण्यात आलेल्या आपल्या सर्व प्रकारच्या व्यक्तिगत ओळखीबद्दलच्या महितीमध्ये आपला ईमेल पत्ता असेल आणि ह्या पानावर जमा करण्यात आलेल्या दुसऱ्या लोकांची सर्व प्रकारच्या व्यक्तिगत ओळखीबद्दलच्या महितीमध्ये ती सेवा घेणाऱ्या व्यक्तीचा ईमेल पत्ता अंतर्भूत असणार आहे. जेव्हा तुम्ही आमची वेबसाईट पेज पहाल तेव्हा आम्ही अव्यक्तिगत ओळखीची माहिती सुध्दा घेऊ जसे की तुम्ही कोणत्या प्रकारचा ब्राऊजर वापरत आहात ( फायरफॉक्स, नेटस्केप, ऑपेरा किंवा इंटरनेट एक्स्प्लोरर वगैरे ), कोणत्या प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टिमचा तुम्ही वापर करीत आहात ( विन्डोज, मँक ओएस किंवा लिनक्स ) आणि तुमच्या क्षेत्रांत इंटरनेट सर्विस देणाऱ्याचे नाव ( जसे अमेरिका ऑनलाइन, अर्थलिंक ).

आपली माहिती आम्ही कशी वापरतो.

 आपल्या अर्जामध्ये आपण आपल्याबद्दल पुरविलेली माहिती आणि नोंदणी फॉर्म आपण शिबीर प्रवेशाकरिता जिथे अर्ज केला आहे, त्या स्थानिक किंवा क्षेत्रीय  विपश्यना संस्थेस शिबीर प्रवेशाकरिता आपल्या अर्जाचे मूल्यांकन करण्यास सक्षम करण्यासाठी केला जातो. याव्यतिरिक्त, आम्हाला असे आढळले आहे की जे लोक विपश्यना शिबीर करतात ते त्यांच्या  जीवनकाळात इतरही  शिबिरांकरीता  वारंवार उपस्थित राहतात. त्यानंतरच्या शिबिरांकरीता त्यांची ही उपस्थिती सुलभ करण्यासाठी तसेच त्या इतिहासाची नोंद ठेवण्यासाठी, जर काही अधिकारक्षेत्रात तशी कायदेशीर बंदी नसेल तर स्थानिक किंवा क्षेत्रीय विपश्यना संस्था प्रत्येक साधकाची माहिती अनिश्चित काळापर्यंत राखू शकतात.  काही प्रकरणांमध्ये, स्थानिक किंवा क्षेत्रीय विपश्यना संस्था विपश्यनेशी संबंधित कार्यक्रम तसेच सुविधांबद्दल माहिती पाठविण्यासाठी आपले नाव, पोस्टल पत्ता आणि / किंवा ईमेल पत्ता वापरू शकते, जर आपण असा संपर्क न करण्याची निवड केली नसेल तर. आमच्या "टेल अ फ्रेंड" सेवेमध्ये इतरांबद्दल आपण प्रदान केलेली माहिती आम्ही त्यांना आपले अभिवादन आणि आमचा वेबसाइट पत्ता पाठविण्यासाठी वापरतो. आमच्या साइटची डिझाइन आणि सामग्री सुधारण्यास तसेच आमच्या साइटवर कोण प्रवेश करीत आहे हे समजून घेण्यास आम्हाला सक्षम करण्यासाठी आम्ही कधी कधी वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य नसलेली माहिती वापरतो ज्यायोगे ते साइटमध्ये कोणत्या फायलींमध्ये प्रवेश करीत आहेत हे समजण्यासाठी, अर्थात साइटच्या वापराचे विश्लेषण करण्यासाठी संकुल माहिती. ही विपश्यना वेबसाइट आपली वैयक्तिकरित्या निगडीत माहिती तृतीय पक्षाला कधीही व्यावसायिक किंवा इतर कोणत्याही कारणास्तव उपलब्ध करून देत नाही. तथापि, काही क्षेत्रीय विपश्यना वेबसाइट्स क्रेडिट कार्ड आधारित देणगी स्वीकारत असतात, अशा वेळी त्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित वैयक्तिक माहितीवर सामान्य पद्धतीने प्रक्रिया केली जाते. अन्यथा, आम्ही आपली वैयक्तिक माहिती स्थानिक किंवा क्षेत्रीय  विपश्यना संघटनांच्या सुविधांच्या बाहेर कायद्याने तसे करणे आवश्यक नसल्यास उघड करत नाही, उदाहरणार्थ, कोर्टाच्या आदेशान्वये किंवा उप-व्यक्तीच्या जबाबाकरीता प्रतिसाद म्हणून. कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या एजन्सीच्या विनंतीनुसार किंवा अन्य कायदेशीर आवश्यकतानुसार आम्ही अशी माहिती उघड करू शकतो.

आपले शिबीर आवेदन पत्र पंजीकरण नमुन्यात दिलेली आपली माहिती विपश्यनेचे सर्व आचार्य आणि सहाय्यक आचार्य तसेच साधनाकेंन्द्रातील कर्मचारी आणि धम्मसेवक यांनाचजेव्हढी महिती हवीतेव्हढीच उपलब्ध असेल. गोपनीयतेच्या करार आणि इतर दस्तऐवजांद्वारे आम्ही हे सुनिश्चित करण्यासाठी सर्वतोपरी पावले उचलतो की ती माहिती एकदा केंन्द्र किंवा अस्थायी केंन्द्राच्या रजिस्ट्रारला ज्या शिबीरासाठी दिली असेल तेथे प्रकटीकरणापासून किंवा तिसऱ्या व्यक्तिच्या शिरकावापासून दूर अशी विश्वासपूर्वक सूरक्षित ठेवली जाते. तथापी ज्या विशिष्ट शिबीरासाठी आपण नांव नोंदविले आहे त्या देशांतील व्यवहारिक गोपनियता कायद्यातील पध्दतीनुसार आपली माहिती सांभाळली, साठवली वापरली जाईल. जेव्हा आपण उघडपणे ईंटरनेटव्दारे इमेल मधून आवेदन पत्र दिल्यास असावधपणे आपली माहिती प्रकट होण्याचा धोका असतो, कारण काही परिस्थितिमध्ये आमची इ मेल आवेदन संधि सुरक्षित  नसते. जर हा धोका पत्करायचा नसेल तर ह्या वेबसाइटवरील इमेल आवेदन पत्राचा उपयोग कृपया करु नका.

आमचे आवेदन प्रपत्र आणि त्यामधील वैयक्तिक डेटा संगणकावर साठवण आणि प्रक्रियेद्वारे हाताळला जातो. याव्यतिरिक्त, जगातील विविध देशांमध्ये विभिन्न विपश्यना संस्थांचे संगणक आहेत. आमच्या शिबिरांस उपस्थित राहण्यासाठी आपला अर्ज सादर करणे, म्हणजे संगणकावरील आपल्या अर्जाच्या डेटाच्या साठवण आणि प्रक्रियेस, तसेच अर्जात असलेल्या आपल्या वैयक्तिक माहितीच्या सीमापार हस्तांतरण आणि हाताळणीस दिलेली आपली स्पष्ट सहमती असेल. याव्यतिरिक्त, काही बाबतींत ज्या केंद्राकडे आवेदन सादर केले जाते अशा एखाद्या केंद्राची ईमेल सेवा Google अॅप्सद्वारे प्रदान केली जाऊ शकते. परिणामी त्या केंद्रावर आपल्या आवेदनातील डेटा हाताळणी ही Google च्या गोपनीयता आणि सुरक्षितता धोरणांच्या अधीन आहे, जी त्यांच्या वेबसाइटवर प्रसारित आहे.  शिबीरार्थीच्या हितासाठी, स्थानिक किंवा क्षेत्रीय विपश्यना संस्था ह्या शिबिराशी संबंधित एखाद्या शिबिरार्थीची आरोग्यविषयक समस्या किंवा अनुशासन संहितेशी विसंगत असलेल्या वर्तणूक वा असे सूचित होत असेल की, प्रस्तुत शिबिरार्थी भविष्यातील शिबिरास प्रवेश करण्यास प्रतिबंधित असावा किंवा त्यास भविष्यातील शिबीरादरम्यान अतिरिक्त साहाय्याची आवश्यकता असेल अशा  कोणत्याही नोट्स घेणे आणि त्या जतन करून ठेवणे आवश्यक ठरवू शकते. अशा प्रकारच्या दुर्मिळ प्रसंगी, आमची अशी समजूत आहे की स्थानिक आणि क्षेत्रीय विपश्यना संस्था अशा नोट्स संगणकावर प्रविष्ट करतील आणि भविष्यातील शिबीराचे साहाय्यक आचार्य आणि अधिकृत शिबीर रजिस्ट्रार यांनादेखील दिल्या जातील. शिबीरामध्ये आपली उपस्थिती अशा नोट्स हाताळण्याला आणि संचयित करण्याला तसेच लागू असलेल्या संबंधित कायद्यांच्या अधीन क्रॉस-बॉर्डर ट्रान्सफरला स्पष्टपणे संमती देईल, ज्यात खाली नमूद ("विशिष्ट गोपनीयता आवश्यकता") समाविष्ट आहे. अशा नोट्स कशा ठेवल्या जातात याबद्दल आपल्याला अधिक जाणून घ्यायचे असल्यास आपण अशा नोट्स आणि अन्य वैयक्तिक डेटासंबंधी गोपनीयता धोरण काय आहे हे जाणण्यासाठी आपण स्थानिक किंवा क्षेत्रीय विपश्यना संस्थेशी संपर्क साधावा.

तिसऱ्या व्यक्ति स्थानाकडून मागविली जाणारी माहिती

ही गोपनीयता नीति आम्ही प्राप्त केलेल्या आपल्या माहितीच्या केवळ मात्र प्रसार तथा उपयोगापुरता सीमित आहे. आमच्या वेबसाईटमध्ये अन्य साईटांची लिंक असण्याची शक्यता आहे, ज्यांच्या माहितीविषयक  प्रथा आमच्या प्रथांपासून  निराळ्या असू शकतात. अभ्यागतांनी त्या अन्य साईटांच्या  गोपनीयता नोटिसींचा परामर्श घ्यावा, कारण ही माहिती जी ह्या तिसऱ्या पक्षांना सादर केली असेल, किंवा त्यांनी गोळा केली असेल, त्यावर आमचे काही  नियंत्रण नाही.  विविध विपश्यना संस्थांचे ह्या तिसऱ्या पक्षाच्या  गोपनीयता नीतिंवर नियंत्रण नसल्याने आपण त्या तिसऱ्या पक्षाच्या गोपनीयता प्रथा जर असतील तर, त्याच्या अधीन आहात आणि  विपश्यना संस्था त्या तिसऱ्या  पक्षाद्वारा केल्या गेलेल्या आपल्या व्यक्तिगत माहितीचा उपयोग तथा प्रसारासाठी जबाबदार नाही. म्हणून आपण आपली व्यक्तिगत माहिती इतरांना देण्याअगोदर आम्ही आपणांस प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित करतो.

कूकीज ( Cookies )

  “ कूकीज “ ही एक छोटी माहिती असलेली टेक्स्ट फाईल आहे. जेव्हा तुम्ही आमची वेबसाइट पहाता तेव्हा तुमच्या स्वतःच्या कॉम्पुटर ही माहिती आमच्या सर्वर वरुन डाऊनलोड केली जाते. कोणत्या कॉम्पुटरने संपर्क साधला आहे ते आमच्या सर्वरने जाणण्यासाठी ह्या फाईलमध्ये एकमात्र अंक दिला आहे. आपण कोर्सकरिता नोंदणी करण्यासाठी आमच्या ऑनलाइन आवेदन फॉर्मचा वापर करता तेव्हा आम्ही सेशन कुकी तयार करतो. आपण जुने विद्यार्थी म्हणून लॉग इन केले आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आम्ही एक सेशन कुकी देखील वापरतो. काही कुकीज आपल्या PC वर केवळ आपल्या वेबसाइटला भेट दिल्याच्या कालावधीसाठी दिल्या जातात , आणि त्यांना सेशन आधारित कुकीज म्हटले जाते. जेव्हा आपण आपला ब्राउझर बंद कराल तेव्हा हे आपोआप काढून टाकले जातात. काही इतर "प्रादेशिक" विपश्यना संकेतस्थळ कुकीज वापरू शकतात.     

मुलांची प्रायवसी (गोपनियता)

यु.एस.चिल्ड्रेन्स ऑनलाइन प्रायवसी पॉलिसी प्रोटेक्शन एक्ट १९९८(आणि GDPR सहित दुसऱ्या देशांच्या समतोल कायदे) नुसार आम्ही जाणुनबुजून १३ वर्षाखालील मुलांची व्यक्तिगत ओळखीची माहिती त्यांच्या पालकाच्या सहमतीशिवाय घेत नाही. जर अशी माहिती पालकांच्या अनुमतीशिवाय घेतली आहे असे निदर्शनास आले तर ती माहिती त्वरीत आमच्या डेटाबेसमधून काढून टाकू.

 विशिष्ट गोपनिय आवश्यकता

एखाद्या प्रदेशाची विशिष्ट गोपनियता कायद्याची आवश्यकता असू शकते ह्याची कृपया नोंद घ्यावी. विश्वभरांतील आमच्या विपश्यना संघटनानी ह्या आवश्यकतेनुसार  विशिष्ट गोपनीय धोरणे विकसित केली आहेत ज्यामध्ये वर वर्णन केलेल्या सर्वसाधारण धोरणापासून फरक असू शकतो. विशिष्ट आवश्यकतेची प्रत तुम्ही ज्या शिबीर केंद्रावर  आवेदन पत्र/नोंदणी फॉर्म दिला आहे त्या ठिकाणी किंवा  तुम्ही शिबीरस्थानी आल्यानंतर त्या शिबीर स्थानाच्या रजिस्ट्रारशी संपर्क करुन घेऊ शकता.

धम्म.ऑर्ग(Dhamma.org) अशा व्यक्तींच्या "हक्क आणि स्वातंत्र्या" ची सुरक्षा करण्यासाठी वचनबद्ध आहे ज्यांची माहिती धम्म.ऑर्ग(Dhamma.org) अशा कायद्यांनुसार एकत्रित करते ज्यात सामान्य डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन (जीडीपीआर) समाविष्ट आहे परंतु त्यापुरताच मर्यादित नाही.

आपण आपल्याशी संबंधित असलेली जी माहिती आम्ही संकलित करतो किंवा राखून ठेवतो, त्यासंबंधित गोपनीयतेच्या लागू नियमांनुसार आपल्यास इतर अधिकारांसोबत खालील अधिकार असू शकतात: प्रवेशाचा अधिकार, म्हणजे. वैयक्तिक डेटावर प्रक्रिया केली जात आहे किंवा नाही याबद्दल पुष्टी मिळवण्याचा अधिकार आणि ती जेथे उपलब्ध आहे तेथे प्रवेश मिळवण्याचा अधिकार; सुधारणे आणि काढून टाकण्याचा अधिकार, म्हणजे अयोग्य डेटा सुधारित करणे आणि / किंवा अपूर्ण डेटा पूर्ण करण्याचा अधिकार आणि कायदेशीर कारणास्तव वैयक्तिक डेटा काढून टाकण्याचा अधिकार; वैयक्तिक डेटाच्या प्रक्रियेवर प्रतिबंध लादण्याचा अधिकार म्हणजे, उदा. कायदेशीर कारणास्तव डेटा प्रोसेसिंगच्या निलंबनाची विनंती करण्याचा अधिकार; डेटा पोर्टेबिलिटीचा(वहनाचा) अधिकार, म्हणजे संरचित(बांधीव), सर्वसाधारणपणे वापरण्यायोग्य  आणि सहज वाचण्यायोग्य स्वरूपात डेटा प्राप्त करण्याचा अधिकार तसेच सदरहू डेटाला अन्य डेटा नियंत्रकाला प्रसारित करण्यास विरोध करण्याचा अधिकार, म्हणजे जेथे यासाठी वैध कारणे अस्तित्वात आहेत तेथे डेटाची प्रक्रिया करण्यास विरोध करण्याचा अधिकार, ज्यात मार्केटिंग(बाजारी) आणि प्रोफाइलिंग उद्देशांसाठी संस्कारित केलेला डेटा समाविष्ट आहे, जर त्याची पूर्वकल्पना केली असेल तर; बेकायदेशीर डेटा प्रोसेसिंगच्या प्रसंगामध्ये सक्षम डेटा संरक्षण प्राधिकरणाशी संपर्क साधण्याचा अधिकार.

आपण [email protected] वर जाऊन dhamma.org वर लिहून वरील सूचीबद्ध अधिकारांचा वापर करू शकता. पूर्वगामी हक्कांव्यतिरिक्त, विपश्यना साधना शिबिरासाठी नोंदणी करण्यासाठी किंवा किंवा संबंधित क्रियाकलापांच्या नोंदी करण्यासाठी प्रत्येक अर्जाच्या नमुन्यामध्ये अनेक खुलासे आणि संमतीची श्रृंखला समाविष्ट आहेत, ज्या आपल्या अधिकारांचे रक्षण करण्याचा हेतूने देखील आहेत.

ऑप्ट-आउट/ ऑप्ट-इन

स्थानिक किंवा प्रादेशिक विपश्यना संघटना आपल्याला त्यांना आपल्याला त्यांच्या सेवांबद्दल किंवा विपश्यनाशी संबंधित इतर माहितीबद्दल ई-मेल किंवा पोस्टल मेल पाठविण्याची "निवड रद्द" करण्याची संधी देतात. इतर प्रकरणांमध्ये, आपल्यासाठी काही स्थानिक किंवा प्रादेशिक माहिती वितरण सूचीवर "निवड करणे" शक्य आहे. जर आपण आपले नाव, ईमेल पत्ता किंवा इतर वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहिती त्यापैकी कोणत्याही डेटाबेसमधून काढून टाकली असेल तर आपण आपल्या स्थानिक किंवा प्रादेशिक विपश्यना संस्थेशी संपर्क साधून काढून टाकण्याची विनंती करू शकता.

आमच्याशी कसे संपर्क साधाल

जर आपल्याला गोपनियते बद्दल किंवा विपश्यना वेबसाइटच्या धोरणाबद्दल किंवा त्याच्या अंमलबजावणी बाबत काही प्रश्न किंवा शंका वाटल्यास आपण *[email protected]* या साइटवर संपर्क साधू शकता.

प्रभावाची तारिख

ही गोपनियता निती २५ मे २०१८ पासून अस्तित्वांत आहे.आम्ही कोणत्याही वेळी आणि आमच्या विवेकबुद्धीनुसार या पॉलिसीच्या अटींमध्ये सुधारणा करण्याचा अधिकार राखून ठेवतो. ह्या वेबसाइटचा आपण करीत असलेला उपयोग म्हणजे वरील उल्लेख केलेल्या नितीला आपण स्विकारले असे स्थापित होते.