विपश्यना
सत्यनारायण गोएंका द्वारा जशी शिकविली जाते
साधना
आचार्य गोयन्काजी द्वारा शिकविली जाणारी विपश्यना साधना
विपश्यना साधना
सत्यनारायण गोएंका द्वारा जशी शिकविली जाते
आचार्य गोयन्काजी द्वारा शिकविली जाणारी विपश्यना साधना
दिवस अकराचे प्रवचन
शिबीर संपल्यानंतर अभ्यास कसा सुरु ठेवावा
एका पाठोपाठ एक दिवस काम करीत, आपण ह्या धम्म शिबीराच्या समाप्तिपर्यंत आलो.जेव्हा आपण काम सुरु केले, तेव्हा आपणास तंत्र आणि शिबीराच्या अनुशासनासाठी पूर्णपणे आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते. ह्या आत्मसमर्पणाशिवाय, आपण तंत्रास योग्य न्याय देऊ शकला नसता.आता दहा दिवस पूर्ण झाले; आपण स्वतंत्र आहात. जेव्हा आपण आपल्या घरी जाल,आपण शांतपणे समीक्षा करा की येथे आपण काय केले. आपल्याला वाटले की आपण येथे जे शिकले आहे, ते व्यावहारिक,तार्किक,आणि आपल्यास आणि इतरांना फायदेशीर आहे,तर त्याचा स्विकार करा --–ह्यासाठी नाही की कुणीतरी असे करण्यास सांगितले आहे म्हणून,परंतू स्वेच्छेने, स्वतः राजीखुशीने; फक्त दहा दिवसासाठी नाही,तर आपल्या पूर्ण जीवनभरासाठी.
मात्र ही स्विकृति केवळ बौद्धिक किंवा भावनात्मक स्तरावर नसली पाहिजे. जीवनाचा एक अविभाज्य अंग बनवून वास्तविक स्तरावर धम्माचा स्वीकार केला गेला पाहिजे, कारण की फक्त धम्माचा वास्तविक अभ्यासच दैनिक जीवना मध्ये स्पष्ट लाभ देईल.
कसा अभ्यास करावा---नैतिकतेचे जीवन कसे जगावे,कसा आपल्या मनावर ताबा मिळवावा, मन शुध्द कसे करावे हे शिकण्यासाठी ह्या शिबीरामध्ये सामिल झाला आहात. रोज संध्याकाळी, धम्म प्रवचन अभ्यासाची स्पष्टता करण्यासाठी होते. हे समजण्यासाठी की काय करत आहात आणि का करत आहात, कारण कुणीही चुकीच्या पध्दतीने किंवा गोंधळून जाउन काम करु नये यासाठी हे आवश्यक होते. तथापि, अभ्यासाच्या स्पष्टीकरणामध्ये सिध्दांताच्या काही गोष्टी सांगणे अनिवार्य होते, आणि वेगळ्या पार्श्र्वभूमीमधून वेगवेगळे लोक शिबीरासाठी येण्याच्या कारणामुळे, हे संभव आहे की सिध्दांताचा काही भाग काही लोकांना अस्विकार्य होऊ शकतो. जर असेल तर ठीक आहे, हा भाग बाजूला ठेवा. अधिक महत्वाचे म्हणजे धम्माचा अभ्यास आहे. असे एक जीवन जे दुसऱ्यांचे नुकसान करीत नाही, मनाचे नियंत्रण विकसित करते,मनाला विकारमुक्त करते अणि प्रेम व सद्भावना निर्माण करते असे जीवन जगण्यासाठी कुणाचाही आक्षेप नसेल. अभ्यास सार्वत्रिकपणे स्विकारार्ह आहे आणि हेच धम्माचे एक महत्वपूर्ण अंग आहे, ह्यामुळेच जो काही लाभ धम्म जीवनामध्ये उतारण्यामुळे मिळतो, तो सिध्दांतामुळे नाही तर तो अभ्यासामुळेच होतो.
दहा दिवसामध्ये ह्या तंत्राची आपण साधारणशी रुपरेखा प्राप्त करु शकतो; कुणीही इतक्या लवकर त्यामध्ये निष्णात होण्याची अपेक्षा करु नये. परंतू तरीसुध्दा ह्या सांक्षिप्त अनुभवाचे मूल्य कमी नाहीःआपण पहिले पाऊल उचलले आहे,एक अतिशय महत्वपूर्ण पाऊल आहे, खरे तर हा रस्ता खूपच लांबचा आहे- वास्तविक हे जीवनभराचे काम आहे.
धम्माचे एक बी पेरले आहे,आणि त्यापासून अंकूर फुटणे चालू झाले आहे. एक चांगला माळी छोट्याशा रोपट्याकडे विशेष लक्ष देतो, आणि अशी सेवा केल्यामुळे त्या छोट्याशा झाडाचे हळू हळू मोठ्या बांध्याच्या खोलवरील मुळांचा विशाल वृक्ष होतो, त्यानंतर सेवा घेण्याऐवजी आयुष्यभर आपली सेवा करतो.
धम्माच्या ह्या लहान रोपट्याला आता सेवेची आवश्यकता आहे. सिध्दांत, ज्याला काही लोकांचा विरोध होऊ शकतो आणि अभ्यास जो सर्वाना स्विकारार्ह आहे ह्यामध्ये भेदभाव करणाऱ्या दुसऱ्या लोकांच्या दोषारोपांपासून सुरक्षित ठेवा. अशा टीकेमुळे आपल्या अभ्यासात व्यत्यय येऊ देऊ नका. सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास ध्यान करा. नियमितपणे दैनिक अभ्यास आवश्यक आहे. सुरुवातीला हे दोन तास ध्यानासाठी काढण्यास एक दिवस घालविणे म्ह्णजे ओझे वाटू शकते, परंतू लवकरच लक्षांत येइल की जास्त वेळ जो पूर्वी फुकट घालवित होतो तो वाचला आहे. सर्वात आधी, आपल्याला झोपण्यासाठी कमी वेळेची आवश्यकता लागेल. दुसरे आपण जलद गतीने आपले काम करण्यास सक्षम व्हाल, कारण की काम करण्याची आपली क्षमता वाढेल.जेव्हा एखादी समस्या उत्पन्न होईल तेव्हा आपण संतुलित राहाल, आणि लगेच योग्य समाधान शोधू शकाल. जेव्हा आपण तंत्रामध्ये स्थापित व्हाल, तेव्हा सकाळी ध्यान करण्यामुळे दिवसभर कोणत्याही अशांतीशिवाय ऊर्जा भरुन राहिलेली असेल.
जेव्हा आपण बिछान्यावर झोपण्यासाठी पडाल तेव्हा, पाच मिनीटासाठी आपण गाढ झोप येण्यापूर्वी शरीरावर कुठेही होणाऱ्या संवेदने बद्दल सजग रहा.पुन्हा सकाळी, जेव्हा जाग येईल तेव्हा पाच मिनिटे शरीरावर होणाऱ्या संवेदनेचे निरिक्षण करा. झोपण्याआधी आणि जाग आल्यानंतर ध्यानाची काही मिनिटे पुष्कळच फायदेशीर असल्याचे सिध्द करतील.
जर आपण अशा जागी राहात आहात की जेथे अन्य विपश्यना साधक राहत आहेत, तर आठवड्यातून एकदा एक तास सर्वानी मिळून ध्यान करा आणि वर्षातून एकदा दहा दिवसांचे शिबीर अवश्य करा. दैनिक अभ्यास करण्याने आपण येथे जे मिळविले आहे ते टिकून राहील, परंतु खोलवर जाण्यासाठी दहा दिवसांचे शिबीर आवश्यक आहे; अद्याप लांबचा रस्ता पार करायचा आहे.जर आपण हया प्रकारच्या संघटित शिबीरामध्ये याल तर पुष्कळच चांगले. जर नाही जमले, नसेल तरीसुद्धा स्वतःही हे करू शकता. दहा दिवसांसाठी जेथे कुणीतरी आपणासाठी जेवण बनवू शकेल, तेथे आपण दुसऱ्यांपासून एकांतात स्वयंशिबीर करू शकाल. आपणास तंत्र, वेळापत्रक, अनुशासनाबद्दल माहिती आहे, आता आपणास हे सर्व स्वतःवर लादून घ्यायचे आहे. आपण स्वयंशिबीर चालू करण्याआधी आपल्या आचार्यांना कळविले तर मी तुमची आठवण काढून मैत्री, चांगले धर्माचे तरंग पाठवेन ज्यामुळे आपण चांगले काम करू शकाल असे पोषक वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. तथापि,जर आपण आपल्या आचार्याना सूचना देऊ शकला नाहीत, तरी आपण दुर्बळ आहात असे समजू नका. धम्मच आपले रक्षण करील.हळूहळू आपल्याला स्वयंनिर्भरतेच्या स्थितीपर्यंत पोहोचले पाहिजे. आचार्य केवळ एक मार्गदर्शक आहेत;आपल्याला स्वतःच स्वतःचे मालक बनले पाहिजे. प्रत्येक वेळी जर दुसऱ्यावर अवलंबून राहिलात तर कोणतीही मुक्ती संभव नाही.
दिवसा दोन तासाचे ध्यान आणि वर्षातून एकदा दहा दिवसांचे शिबीर हे फक्त न्युनतम आवश्यक अभ्यास सुरु ठेवण्यासाठीच करीत आहात. जर आपल्यास अधिक मोकळा वेळ असेल तर त्याचा ध्यानासाठी उपयोग करावा. आपण एक आठवड्याचे लघु शिबीर, किंवा काही दिवसांचे, येथपर्यंत की एका दिवसाचे शिबीर करु शकता. ह्या प्रकारच्या लघु शिबीरामध्ये एक तृतीयांश वेळ आनापानासाठी आणि बाकीचा वेळ विपश्यनेसाठी द्यावा.
आपल्या ध्यानाच्या दैनिक अभ्यासाच्या वेळी विपश्यनेसाठीच जास्त वेळ द्यावा. केवळ आपले मन अशांत,किंवा सुस्त असेल किंवा कोणत्याही कारणामुळे संवेदना जाणवणे आणि समतेचे पालन करण्यास जड जात असेल, तर जोपर्यंत आवश्यकता असेल तोपर्यंत आनापानचा अभ्यास करावा.
जेव्हा जेव्हा विपश्यनेचा अभ्यास कराल, तेव्हा संवेदनेचा खेळ खेळू नका, प्रिय संवेदनेसाठी आनंद आणि अप्रिय साठी उदासी नको. प्रत्येक संवेदनेला यथार्थपणे पाहा. पूर्ण शरीराला क्रमाने पहात रहा, कुठेही कोणत्याही एका अंगावर जास्त वेळ थांबू नका.कोणत्याही एका भागासाठी अधिकतर दोन मिनिटे पुरेशी आहेत,किंवा दुर्लभ उदाहरणामध्ये पाच मिनिटापर्यंत,परंतू त्या पेक्षा अधिक कधीच नाही. हे लक्षांत असू द्या की शरीराच्या प्रत्येक भागाच्या संवेदनेबद्दल सजगता असली पाहिजे. जर आपणास अभ्यासामध्ये यांत्रिकता आली आहे असे वाटले तर ध्यान करण्याचा क्रम बदला. प्रत्येक परिस्थितीमध्ये सजगता आणि समता असली पाहिजे, आपल्यास विपश्यनेच्या अद्भुत लाभांचा अनुभव येइल.
सक्रिय जीवनामध्ये सुध्दा ह्या तंत्राचा उपयोग करा,न केवळ डोळे बंद करुन बसाल तेव्हाच नव्हे. जेव्हा आपण कोणतेही काम करत असाल तेव्हा सर्व ध्यान कामावर असले पाहिजे; ह्या वेळी आपण ध्यान करत आहात असाच विचार करा.जर मोकळा वेळ असेल तर, पाच किंवा दहा मिनिटे असली तरी, संवेदनेबद्दल सजग राहा; जेव्हा आपण पुन्हा काम सुरु कराल तेव्हा आपणास ताजे तवाने झाल्याचे वाटेल. सावध रहा,तथापि, जेव्हा आपण सार्वजनिक ठिकाणी गैर साधकाच्या समोर ध्यान कराल तेव्हा आपले डोळे उघडे ठेवा; ध्यानाच्या अभ्यासाचा कधीही देखावा बनवू नका.
जर आपण विपश्यनेचा ठीक प्रकारे अभ्यास करत असाल, तर आपले जीवन सुधारणारे एक परिवर्तन आलेच पाहिजे.आपल्या दैनिक व्यवहारामध्ये आपले, आपली वर्तणूक आणि अन्य लोकांबरोबरील व्यवहाराने ह्या पथावरील आपल्या प्रगतीचा मापदंड मोजला पाहिजे. दुसऱ्यांना इजा करण्या ऐवजी,आपण त्याना मदत करणे चालू केले आहे का? जेव्हा मनाविरुध्द परिस्थिती उत्पन्न होते तेव्हा आपण समतेमध्ये राहाता का? जर मनामध्ये नकारात्मकता चालू झाली, तर किती लवकर ह्या बाबतीत सजगता येते? नकारात्मकतेमुळे जी संवेदना उत्पन्न होते ती आपणास किती लवकर समजते? आपण किती लवकर मानसिक समता परत मिळवितो, आणि करुणा व प्रेम उत्पन्न करतो? ह्या प्रकारे स्वतःचे परिक्षण करा,आणि ह्या मार्गावरील प्रगती चालू ठेवा.
येथे आपण जे प्राप्त केले आहे, केवळ जमवून ठेवू नका, तर त्यात वाढ करा. आपल्या जीवनामध्ये धम्म स्थापित करा. ह्या तंत्राचा सर्वाना लाभ होऊन आनंद मिळो, आणि एक खुशीचा,शांतीपूर्ण,सामंजस्यपूर्ण जीवनाचा आनंद आपल्यास आणि इतर सर्वांना मिळो.
ताकीदीसाठी एक शब्दः आपण येथे काय शिकलो हे दुसऱ्याना सांगितले तर त्याचे स्वागत आहे. धम्माची काहीही गोपननियता नाही. परंतू ह्या टप्प्यावर, तंत्र शिकविण्याचा प्रयत्नदेखील करु नका. हे करण्याअगोदर स्वतः अभ्यासामध्ये परिपक्व व्हायला पाहिजे, आणि शिकविण्यासाठी प्रशिक्षित व्हायला हवे, नाहीतर दुसऱ्यांना मदत करण्या ऐवजी नुकसान पोहोचविण्याचा धोका असतो. कुणाला तरी आपण विपश्यनेबद्दल सांगितले आणि त्याची अभ्यास करण्याची इच्छा झाली, तर त्याला ह्या प्रकारच्या योग्य मार्गदर्शकाच्या नेतृत्वाखालील एका संगठित शिबीरामध्ये सामिल होण्यासाठी प्रोत्साहित करा. आतासाठी, आपण धम्मामध्ये स्थापित होण्यासाठी काम करा. धम्मामध्ये पक्वता येऊ द्या, आणि आपण पाहाल की आपल्या जीवनाच्या उदाहरणाने, आपण दुसऱ्यांना ह्या मार्गासाठी आकर्षित करत आहात.
धम्म अनेक चांगल्यासाठी आणि फायद्यासाठी जगभरामध्ये पसरावा.
सर्व प्राणी सुखी होवोत, शांत होवोत, मुक्त होवोत.