विपश्यना
सत्यनारायण गोएंका द्वारा जशी शिकविली जाते
साधना
आचार्य गोयन्काजी द्वारा शिकविली जाणारी विपश्यना साधना
विपश्यना साधना
सत्यनारायण गोएंका द्वारा जशी शिकविली जाते
आचार्य गोयन्काजी द्वारा शिकविली जाणारी विपश्यना साधना
सहाव्या दिवसाचे प्रवचन
सजगताविकास आणि संवेदने प्रति समतेचे महत्व – चार तत्वे आणि संवेदनेशी त्यांचा संबंध – घन पदार्थ उत्पन्न होण्याची चार कारणे – पांच अडथळेः राग(आसक्ति), द्वेष, मानसिक आणि शारीरिक आळस, अशांती, संदेह
सहा दिवस संपून गेले; आता काम करण्यास फक्त चार दिवस उरले आहेत. चार दिवसामध्ये आपण काही प्रमाणात मानसिक दुषिततेचे निर्मूलन करु शकतो,आणि जीवनभर ह्याचा उपयोग करण्यासाठी ह्या विद्येचे ग्रहण करु शकतो. जर आपण योग्य प्रकारे समजून काम केले आणि दैनिक जीवनामध्ये ह्या विद्येचा कसा उपयोग करावा हे शिकलात,तर निश्चितच आपल्यास फायदा होईल. म्हणूनच ह्या विद्येस चांगल्या प्रकारे समजून घ्यावे.
हा निराशावादाचा मार्ग नाही. धम्म दुःखाचे कडवे सत्य स्विकार करण्यासाठी आपणास शिकवितो,तसेच दुःखातून बाहेर पडण्याचा मार्गदेखील दाखवितो. म्हणूनच हा एक आशावादाचा मार्ग,सत्याशी जोडला गेला आहे,आणि तसेच “कर्तृत्वाचा” देखील आहे – ज्यावर प्रत्येक व्यक्ति, पुरुष किंवा महिलेस स्वतःच्या मुक्तिसाठी स्वतःच काम केले पाहिजे.
काही शब्दांतच, पूर्ण मार्ग विस्ताराने समजावून सांगितला होताः
सर्व Sakhara(संस्कार) अनित्य आहेत. जेव्हा कुणी एक हे सत्य अंतर्दृष्टि ने समजतो, तेव्हा तो दुःखापासून विलग होऊन जातो; हा एक शुद्धीचा मार्ग आहे
- येथे saṅkhārā(संस्कार) चा अर्थ केवळ मानसिक प्रतिक्रिया नाही,तर त्या प्रतिक्रियांचे परिणामसुध्दा आहेत. प्रत्येक मानसिक प्रतिक्रिया एक बीज आहे जे एक फळ देते, आणि आयुष्यात जे काही एखादा अनुभव करतो ते फळ असते, आपण केलेल्या कर्माचे, म्हणजेच ते एकाचे भूतकाळ किंवा वर्तमानातील सेझखिर्द(संस्कार) असते. म्हणूनच त्याचा अर्थ “सर्व काही जे उत्पन्न होते, शांत होऊन जाते,निघून जाईल,विघटन होऊन जाईल” हा आहे. केवळ भावनेत्मकतेतून, किंवा त्यावरील भक्तितून,किंवा बौध्दिकतेने ह्या वास्तविकतेचा स्वीकार करुन,मन शुध्द होणार नाही. आपल्या आंत उत्पन्न आणि नष्ट होणाऱ्या प्रक्रियेचा वास्तविक अनुभव करुनच ह्याचा स्वीकार केला पाहिजे. जेव्हा कुणी शारिरीक संवेदनेला पाहात सरळ नश्वरतेचा अनुभव करतो, तेव्हा जी समजूत विकसित होते ते सत्य ज्ञान आहे, आपले स्वतःचे ज्ञान आहे. आणि ह्या ज्ञानामुळे तो दुःखमुक्त होऊन जातो. जरी अजून पीडा असली तरी आता ती तो भोगत नाही. त्याऐवजी त्यावर तो स्मित करतो,कारण की तो त्याचे निरीक्षण करु शकतो.
पीडा देणाऱ्या संवेदनेला धक्का देऊन दूर लोटणे व सुखद संवेदनेला खेचून घेणे ही जुनी मानसिक संवय आहे.जोपर्यंत एकजण दुःख व सुखाबरोबरचा हा खेळ, ढकलणे व खेचणे यात गुरफटून राहातो, तोपर्यंत मन अशांतच राहते,आणि स्वतःच्या दुःखाची वाढ करतो. परंतू संवेदनेस न ओळखता कुणी एक जेव्हा निष्पक्ष निरिक्षण करण्यास शिकतो तेव्हा शुध्दिकरणाची प्रक्रिया सुरु होते,आणि अंध प्रतिक्रिया करण्याची व स्वतःचे दुःख वाढवण्याची जुनी संवय हळू हळू कमजोर होते आणि तुटून जाते. फक्त निरिक्षण कसे करावे हे एकास शिकले पाहिजे.
ह्याचा अर्थ हा नाही की विपश्यनेच्या अभ्यासामुळे कुणी एक “वनस्पती” होऊन जातो, निष्क्रियतेने दुसऱ्यास आपले नुकसान करण्याची अनुमती देतो. खरे तर, कुणी प्रतिक्रिया करण्याऐवजी काम कसे करावे हे शिकतो. ह्याआधी आपण प्रतिक्रिया करण्याचे जीवन जगत होतो,आणि प्रतिक्रिया तर नेहमीच नकारात्मक असते. आता आपण ठीक प्रकारे कसे जगावे,जेणेकरुन सत्य कार्याचे स्वस्थ जीवन कसे जगता येईल हे शिकत आहोत. आतादेखील जीवनामध्ये कठीण परिस्थिती उत्पन्न होते, तेव्हा जो कुणी संवेदनेचे निरिक्षण करण्यास शिकला आहे तो आंधळी प्रतिक्रिया करणार नाही.ह्याऐवजी तो संवेदनेला जाणून घेत काही क्षण समतेमध्ये थांबेल आणि नंतर निर्णय घेईल की कोणती कार्यवाही करावी. हा एक संतुलित मनाने घेतलेला निर्णय असल्यामुळे सकारात्मक असणे निश्चित आहे; हे एक रचनात्मक कार्य असेल, आपल्यासाठी व दुसऱ्यासाठी देखील उपयोगी असेल.
हळू हळू एकजण आपल्यामधील मन व शरीर यांचा प्रपंच कसा चालतो हे बघण्यास शिकतो,आणि प्रतिक्रिया करणे थांबवितो,कारण की आता तो अज्ञानातून बाहेर येतो. प्रतिक्रिया करण्याची संवय अज्ञान/अविद्या वर आधारित आहे. ज्यानी कधी आपल्या आतील सत्याला पाहिलेच नाही त्याला आपल्या आत खोलवर काय होत आहे त्याचा पत्ताच नाही,कशी राग व द्वेषा बरोबर प्रतिक्रिया करत आहे, तणाव उत्पन्न करुन राहिला आहे, जो त्याला दुःखी बनवत आहे.
अडचण ही आहे कि मन हे घनपदार्थ(शरीर) यापेक्षा अधिक अस्थायी आहे.मानसिक प्रतिक्रिया एवढ्या जलद होतात की कुणीही त्याचे अनुसरण करु शकत नाही, जोपर्यंत तो असे करण्यासाठी प्रशिक्षित झाला असेल. सत्यास न ओळखल्याने एखादा भ्रमामध्ये राहतो आणि बाह्य गोष्टींकडे जसे की दृष्टी,आवाज,स्वाद इत्यादिच्या प्रति प्रतिक्रिया करतो. हे तर स्पष्ट आहे, परंतू जो कुणी स्वतःचे निरिक्षण करण्यास शिकेल त्याला सुक्ष्म स्तरावरील सत्य वेगळेच आहे असे समजून येईल. बाह्य ब्रह्मांडाचे अस्तित्व एखाद्या व्यक्तिसाठी तेव्हाच असते, जेव्हा ते त्याच्या अनुभवाच्या कक्षेत येते, म्हणजेच, जेव्हा संवेदी विषय त्याच्या संवेदी इंद्रियाच्या दरवाज्याचा संपर्कात येतो. संपर्क होताक्षणीच,तेथे एक कंपन,एक संवेदना उत्पन्न होइल. संवेदना ही चांगली की वाईट ह्याचे मूल्यांकन एखाद्याच्या पूर्व अनुभवावर आणि संस्कारावर,भूतकालीन saṅkhārā(संस्कार) वर आधारित असते. ह्या रंगीत मूल्यांकनाच्या अनुरुपतेनुसार संवेदना सुखद किंवा दुःखद वाटू लागते,आणि संवेदनेच्या प्रकारानुसार, एखादा पसंती किंवा नापसंतीची, राग व द्वेषासह प्रतिक्रिया सुरु करतो. बाह्य विषय आणि प्रतिक्रिया यांच्या दरम्यान संवेदना ही एक विस्मरणात गेलेली कडी आहे. पूर्ण प्रक्रिया एवढी जलद होते की आपण त्यापासून अनभिज्ञ असतोः जोपर्यंत प्रतिक्रिया चेतन स्तरावर पोहोचत नाही तोपर्यंत त्याची पुनरावृत्ती होत रहाते, ती अब्जावधि वेळा तीव्र होते, आणि इतकी मजबूत होते की सहजपणे मनावर ताबा मिळविते.
सिध्दार्थ गौतम यांनी राग आणि द्वेष यांचे मूळ कारण शोधून काढून आणि त्यांना संवेदनेच्या स्तरावर जेथे त्या उत्पन्न होतात तेथे त्याचे निर्मूलन केले आणि त्याद्वारे आत्मज्ञान प्राप्त केले. त्यांनी स्वतः जे केले होते ते त्यांनी दुसऱ्याना शिकविले. एखाद्यास राग आणि द्वेष यापासून बाहेर येणे शिकविणारे ते एकटेच नव्हते; त्यांच्या आधी देखील भारतामध्ये हे शिकविले गेले होते. बुध्दाची शिकवण नैतिकता, आणि एकाद्याच्या मनाच्या नियंत्रणाचा विकास करणे असे सांगणारी एकमात्र शिकवण नाही. तसेच बौध्दिक,भावनिक,किंवा भक्ति या स्तरावरील ज्ञान बुध्दाच्या आधीदेखील अस्तित्वात होते. त्यांच्या शिकवणीचे अद्वितिय तत्व दुसऱ्या ठिकाणी आहे, जेथे शरीरिक संवेदनेला ज्या विशेष जागी जेथे राग व द्वेष उत्पन्न होतात ते ओळखून त्याच जागी त्या नष्ट करणे हे आहे. कुणीही संवेदनेशी जोपर्यंत जोडला जात नाही, तोपर्यंत तो मनाच्या वरवरच्या स्तरावरच काम करीत राहील,त्याचवेळी आतमध्ये खोलवर प्रतिक्रिया करण्याची जुनी संवय चालूच राहील. आपल्या आतील सर्व संवेदनांना ओळखणे शिकण्यामुळे आणि त्याप्रती समता ठेवण्याने एकजण जेथे प्रतिक्रिया सुरु होतात तेथेच थांबवितोः एकजण दुःखातून बाहेर येतो.
हा एक सिध्दांत विश्वासपूर्वक स्वीकार करण्यासाठी नाही, न हे तत्वज्ञान बौध्दिक रुपाने स्वीकार करावा म्हणून आहे. आपण सत्याच्या शोधासाठी स्वतःस तपासून पहा. ह्या सत्याचा केवळ आपल्यास अनुभव आल्यानंतर स्वीकार करावा.सत्याबद्दल ऐकणे महत्वाचे आहे, परंतू ह्यातून वास्तविक अभ्यासाची कृती प्रत्यक्ष घडायला हवी. बुध्दाच्या सर्व शिकवणींचा अभ्यास केला पाहिजे आपण स्वतः इतका अनुभव घेतला पाहिजे की आपण दुःखातून बाहेर पडू शकू.
बुध्दानी समजावून सांगितले की शरीराची संपूर्ण संरचना, ही छोट्या छोट्या परमाणूंच्या कणांनी बनलेली आहे -- kalāpa(कलाप) -- ज्यात चार मुलभूत तत्वे त्यांच्या अंगभूत विशेषतेसहित समाविष्ट आहेत. बाहेर जगामध्ये आणि त्याचबरोबर आतमध्ये(शरिरांत) देखील, हे सहजतेने पाहू शकतो की काही वस्तू घनीभूत आहेत – पृथ्वी तत्व; काही द्रवरुप आहेत – जल तत्व; काही वायुरुप आहेत– वायु तत्व; आणि प्रत्येक बाबतीत, तापमान हजर असते – अग्नि तत्व. जो कुणी स्वतःच्या आतमध्ये सत्याचा शोध घेतो तो सूक्ष्म स्तरावर चार तत्वांना समजू शकतो. वजनदारपणा पासून हलकेपणा हा वजनाचा पूर्ण पल्ला पृथ्वी तत्वाचे क्षेत्र आहे.अग्नि तत्व तापमानाचे क्षेत्र, अत्यंत थंडी पासून अत्यंत उष्णतेपर्यंत आहे. वायु तत्व बाह्यात्कारी स्थिर पासून मोठ्या हालचालीपर्यंत गती देण्याचे काम करतो. जल तत्व एकमेकांस बांधून ठेवण्याचे,चिकटून राहाण्याच्या गुणवत्तेशी संबंधित आहे. एक किंवा अधिक तत्वांच्या विषेशते सहित कण उत्पन्न होतात;आणि दुसरे गुप्त रहातात. त्या कणाच्या प्रमुख तत्वाच्या गुणवत्तेनुसार संवेदना प्रकट होतात. जर kalāpa(कलाप) अग्नि तत्वाच्या विशेषतेसहित उत्पन्न झाली तर संवेदना उष्णतेची किंवा थंडपणाची होईल. ह्याचप्रकारे अन्य तत्वांचे होते. ह्या प्रकारेच संवेदना शारीरिक संरचनेच्या आंत उत्पन्न होतात.जर एखादा अज्ञानी असेल तर तो ह्याचे मुल्यांकन करतो आणि संवेदने प्रति प्रतिक्रिया करतो,आणि आपल्यासाठी नवीन दुःख उत्पन्न करतो. परंतु जेव्हा ज्ञान मिळते तेव्हा त्यास समजते की हे लहान परमाणू एक किंवा दुसऱ्या तत्वाच्या प्रबळ विशेषतेबरोबर उत्पन्न होत आहेत आणि हे सर्व सामान्य, बदलता प्रपंच आहे आणि नष्ट होण्यासाठीच त्या उत्पन्न झाल्या आहेत. ह्या समझदारी सहित, एकजण संवेदनेचा सामना करीत असताना आपल्या मनाचे संतुलन घालवत नाही.
एकजण स्वतःचे निरिक्षण करीत असतो, तेव्हा हे स्पष्ट होते की kalāpa(कलापा) का तयार होतातः एखादा आपला जीवन प्रवाह, शरीर व मनाच्या प्रवाहासाठी जो आहार देतो त्यामुळे ते तयार होतात. शरीराच्या प्रवाहासाठी भौतिक आहाराची आवश्यकता असते, ज्यामध्ये दोन प्रकार आहेतःजो आहार आपण घेतो आणि ते वातावरण ज्यामध्ये आपण राहातो. मनाच्या प्रवाहासाठी चैतिक आहार पाहिजे,जे दोन प्रकारचे असतातःएकतर वर्तमान किंवा भूतकाळातील saṅkhārā(संस्कार), जर कुणी वर्तमान काळात क्रोधाचे इनपुट देत असेल तर, लगेच ते शरीरावर प्रभाव टाकते व जे कलाप वर येतील त्यावर अग्नि धातूचा प्रभाव असेल, ज्यामुळे एखाद्यास गरम वाटू लागेल. जर भितीचा आहार देत असाल तर, kalāpa(कलाप) त्यावेळी उत्पन्न झालेल्यावर वायु तत्वाचा प्रभाव असेल,आणि थरथरण्याची संवेदना होईल;आणि तसेच पुढे चालू राहील. मानसिक खाद्याचा दुसरा प्रकार भूतकालीन saṅkhārā(संस्कार) आहेत. प्रत्येकsaṅkhārā(संस्कार)एक बीज आहे ज्याचे काही काळानंतर परिणाम दिसून येतील. जी संवेदना बीज पेरताना अनुभवास येईल त्याच प्रकारची संवेदना जेव्हा त्या प्रकारच्या saṅkhārā(संस्कार) चे फळ मिळेल व ते मनाच्या वरच्या स्तरावर उत्पन्न होईल.
जी विशेष संवेदना उत्पन्न होते आहे त्यामागे ह्या चार कारणापैकी कोणते कारण असेल ते निवडण्याचा प्रयत्न करु नये. जी काही संवेदना होत असेल त्याचा स्वीकार केला पाहिजे. नवीन saṅkhārā(संस्कार) उत्पन्न न करता केवळ निरिक्षण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कुणी मनासाठी नवीन प्रतिक्रियेचा इनपुट(आहार) देत नसेल, तर आपोआपच जुनी प्रतिक्रिया संवेदनेच्या रुपामध्ये प्रकट होत त्याचे फळ देईल. कुणी ध्यान देऊन पाहातो,तेव्हा ती समाप्त होऊन जाते. पुन्हा तो प्रतिक्रिया करत नाही; म्हणून आणखी एखादा जुना संस्कार(संखारा) त्याचे फळ देतो. ह्या प्रकारे, सजगता व समतेमध्ये राहाण्याने, जुने saṅkhārā(संस्कार) एकामागून एक उत्पन्न होऊन नष्ट होण्यास तो अनुमती देतोः आपल्या दुःखातून बाहेर येतो.
नवीन प्रतिक्रिया उत्पन्न करण्याची जुनी सवय समाप्त केली पाहिजे, आणि हे केवळ हळू हळू, पुन्हा पुन्हा निरंतर अभ्यास करण्यानेच होऊ शकेल.
निश्चितच अडचणी, अडथळे तेथे मार्गामध्ये आहेतचः पाच प्रबळ शत्रू आहेत जे आपल्यास व आपल्या प्रगतीला रोखण्यासाठी, दाबण्याचा प्रयत्न करतील. पहिले दोन शत्रू राग(आसक्ति) आणि द्वेष आहेत. विपश्यनेचा अभ्यास करण्याचा उद्देश हा आहे की ते दोन मूलभूत मानसिक दोष नष्ट करणे, तरीसुध्दा आपण ध्यान करीत असताना त्या उत्पन्न होऊ शकतात, आणि त्यांनी जर मनावर ताबा मिळवला, तर शुध्दिकरणाची प्रक्रिया बंद होऊन जाईल. आपण सूक्ष्म संवेदनेची किंवा nibbāna (निब्बाण/निर्वाण) साठी देखील हांव(आसक्ति) करु शकता,; त्याने कोणताही फरक पडत नाही. हांव सुटणे म्हणजे एक अग्नि आहे, मग इंधन कोणतेही असो; ते मुक्तिच्या विरुध्द दिशेस घेऊन जाईल. ह्या प्रकारे, आपण पीडेच्या अनुभवामुळे द्वेष उत्पन्न करु शकाल,आणि पुन्हाआपण मार्गापासून दुर व्हाल.
दुसरा शत्रू आळस,सुस्ती आहे. संपूर्ण रात्र आपण गाढ झोपलात, तरीसुध्दा आता आपण ध्यानासाठी बसल्यावर आपल्यास झोप येऊ लागते. हा झोपाळूपणा आपली मानसिक दुषितता आहे, जी विपश्यनेच्या अभ्यासाने निघून जाईल, आणि म्हणूनच ती आपल्यास ध्यानापासून रोखण्याचा प्रयत्न करते. ह्या शत्रूला आपल्यास दाबून टाकण्यापासून रोखण्यासाठी लढले पाहिजे. थोडा जोराने श्वास घ्या, किंवा उठा, आपल्या डोळ्यांवर थंड पाण्याचा शिडकावा करा,किंवा थोडे चाला,आणि त्यानंतर पुन्हा ध्यानासाठी बसा.
पर्यायाने आपल्यास मोठी अशांती वाटू लागेल,दूषितता इतर प्रकारे, आपल्यास विपश्यनेच्या अभ्यासापासून रोखण्याचा प्रयत्न करते. पूर्ण दिवस आपण इथे तेथे ध्यान सोडून इतर गोष्टी करीत फिरत असतो. त्यानंतर,आपल्यास समजले की आपण वेळ फुकट घालविला आहे, आणि मग आपण रडणे व पश्चाताप करणे सुरु करतो. परंतू धम्माच्या मार्गावर रडण्यासाठी कोणतीही जागा नाही. जर आपण चुक केली तर त्याबद्दल कोणत्याही, ज्यावर आपला विश्वास आहे अशा ज्येष्ठासमोर त्याचा स्वीकार करावा, आणि भविष्यामध्ये ही चूक पुन्हा न करण्याचा निश्चय करावा.
शेवटी, एकतर आचार्यांबद्दल, किंवा साधनातंत्रा बद्दल,किंवा एखाद्याच्या अभ्यास करण्याच्या क्षमतेबद्दल शंका ठेवणे हा मोठा शत्रू आहे. डोळे झाकून स्विकृती करण्यात काहीही फायदा नाही,तसेच ती अंतहीन निरर्थक शंकेतही नाही. जितका वेळ आपण शंकाकुशंकेमध्ये डुंबत रहाल, आपण ह्या मार्गावर एक पाऊल देखील चालू शकणार नाहीत. जर आपणास काही स्पष्ट समजत नसेल तर आपल्या मार्गदर्शकासमोर येण्यास संकोच करु नका. त्यांच्या बरोबर ह्या बाबतीत चर्चा करा, आणि ते चांगल्या प्रकारे समजून घ्या. आपल्यास सांगितले जाते तसाच अभ्यास जर केलात तर परिणाम येण्यास बांधील आहे.
ही तंत्र/विद्या कोणत्याही जादू किंवा चमत्काराने नाही, परंतू निसर्गाच्या नियमानुसार काम करते. जो कुणीही निसर्गाच्या नियमानुसार काम करतो, तो दुःखातून बाहेर येण्यास बांधील आहे; हाच सर्वात मोठा संभवनीय चमत्कार आहे.
ह्या तंत्राच्या लाभाचा अनुभव मोठ्या संख्येने लोकांनी घेतला आहे फक्त बुध्दाच्या जवळ येत होते त्यांनीच नव्हे. तर त्या नंतर ही काही शतकापर्यंत, आणि आता वर्तमान काळात देखील. जर एखाद्याने ठीक प्रयत्न करुन सजगता आणि समतेमध्ये राहून ह्याचा अभ्यास केला तर दुषिततेचे पडद्यावर पडदे मनाच्या वरील स्तरावर उमटून नष्ट होण्यासाठी बांधील आहेत. धम्माचे येथे आणि आता अद्भुत परिणाम येतात जर कुणी व्यवस्थित काम केले तरच. म्हणूनच पुर्ण विश्वासाने आणि समजदारीने काम करावे. सर्व दुःखातून बाहेर येण्यासाठी आणि खऱ्या शांतीचा आनंद घेण्यासाठी ह्या संधीचा सर्वात चांगला उपयोग करा.
आपणा सर्वास खऱ्या सुखाचा आनंद मिळो.
सर्वांचे मंगल होवो!