विपश्यना
सत्यनारायण गोएंका द्वारा जशी शिकविली जाते
साधना
आचार्य गोयन्काजी द्वारा शिकविली जाणारी विपश्यना साधना
विपश्यना साधना
सत्यनारायण गोएंका द्वारा जशी शिकविली जाते
आचार्य गोयन्काजी द्वारा शिकविली जाणारी विपश्यना साधना
धम्मसेवा
एका शिबीरात धम्म सेवा देणे किंवा अन्य प्रकारे धम्माच्या प्रसार करण्या मध्ये मदत करण्यासाठी, हा एक सर्वांत मूल्यवान अनुभव विपश्यनेच्या साधकास होऊ शकतो. हा धम्माचा अमृत स्वाद चाखण्यास दुसऱ्याना मदत केल्याचा पुरस्कार हे समजणे इतकेच नाही तर हा सुध्दा आपल्या ध्यानाच्या अभ्यासाच्या विकासाचा एक चांगला स्रोत आहे.
शिबीरांसाठी विश्वभरा मध्ये मागणी वाढल्याने धम्म सेवा देण्यासाठी अधिक अधिक आवश्यकता आहे. 2003 मध्ये विश्वभरा मध्ये जवळ जवळ 1400 विपश्यना केंद्रा मध्ये जवळ जवळ1,00,000 साधकांनी आयोजित शिबीरामध्ये भाग घेतला.ज्यांनी ह्या शिबीरांचे आयोजन आणि सेवा, स्थायी व अस्थायी केंद्राना तयार करणे आणि व्यवस्थापन व त्याना चालविण्याचा प्रबंध केला अशा जुन्या शेकडो साधकांच्या अमूल्य सहाय्याशिवाय ह्या शिबीरांचे आयोजन करणे असंभवनिय होते.
विपश्यना शिबीरात भाग घेण्यामुळे त्याना जे काही मिळाले आहे ते थोडेफार दुसऱ्याना देण्याची इच्छा होणाऱ्या जुन्या साधकांच्या स्वैच्छिक सहाय्याशिवाय, शिबीरांची व्यवस्था आणि संचालन करणे शक्य नव्हते.
गोएंकाजीनी नेहमीच धम्म सेवेचा उद्देश्य ह्या बद्दल सांगितले आहे आणि शिकविले आहे कि हा एक जुन्या साधकांना पुढे जाण्यासाठी व ह्या मार्गावरच्या विकासाचा एक अविभाज्य भाग आहे. धम्म सेवकांसाठी आचार संहिता अनुसार धम्म सेवा देणे एका विपश्यना साधकासाठी बाह्य जगामध्ये धम्म जीवन जगण्यासाठी मजबूत बनवते. धम्म सेवा देणाऱ्या जुन्या साधकांसाठी गोयन्काजी द्वारा प्रश्न आणि उत्तरे उपलब्ध आहे.
जर आपण आपला वेळ एक किंवा एकापेक्षा जास्त पूर्ण 10 दिवशीय शिबीरा मध्ये सेवा देण्यासाठी अथवा केवळ काही तास सेवेसाठी देऊ शकत असाल तर कृपया मधील पृष्ठ येथे जावे. अधिकांश केंद्राच्या अनुसूची पृष्ठावर एक स्तंभ आहे, " जुन्या साधक सेवकांची आवश्यकता आहे?" (पृष्ठाच्या उजव्या बाजूस),धम्म सेवेच्या आवेदनाच्या नमुन्यासाठी ह्या लिंकवर क्लिक करा.ज्या केंद्रावर आपण सेवा देऊ इच्छिता तेथे ही सुविधा उपलब्ध नसेल तर, कृपया धम्म सेवा कशी द्यावी ह्यासाठी केंद्राशी प्रत्यक्ष संपर्क करावा.
सर्व जुन्या साधकांना यामध्ये भाग घेणे आणि धम्म सेवेचा अदभुत लाभ मिळविण्याची एक संधी उपलब्ध होते.