विपश्यना
सत्यनारायण गोएंका द्वारा जशी शिकविली जाते
साधना
आचार्य गोयन्काजी द्वारा शिकविली जाणारी विपश्यना साधना
विपश्यना साधना
सत्यनारायण गोएंका द्वारा जशी शिकविली जाते
आचार्य गोयन्काजी द्वारा शिकविली जाणारी विपश्यना साधना
पाचव्या दिवसाचे प्रवचन
चार आर्य सत्य: दुःख, दुःखाचे कारण, दुःखाचे निर्मूलन, दुःखाच्या निर्मूलनाचा मार्ग - स्थिती उत्पन्न करणारी श्रृंखला
पांच दिवस समाप्त झाले; आता काम करण्यासाठी आणखी पांच दिवस बाकी आहेत. कडक मेहनत करून विद्येस चांगल्या प्रकारे समजावून घेऊन बाकीच्या दिवसांचा चांगला उपयोग करा.
एका सीमित क्षेत्रामधील श्वासाच्या अवलोकनाने, आपण पूर्ण शरीरावरील संवेदनेचे अवलोकन करणे चालू केले. जेव्हा कुणी ह्याचा अभ्यास सुरु करतो तेव्हा हे संभवनीय आहे की प्रथम त्याला स्थूल,घनीभूत,तीव्र अप्रिय संवेदना जसे की पीडा,दबाव इत्यादीचा सामना करावा लागू शकेल. भूतकाळात देखील आपणास ह्या प्रकारच्या अनुभवाचा सामना केला असणार, परंतू आपल्या मनाच्या संवयीच्या ढाच्यानुसार त्यावेळेस प्रतिक्रिया करत होता,आनंदात रहाण्याची आणि दुःखात गुरफटण्याची आणि कायम अशांत रहाण्याची होती. आता आपण प्रतिक्रिया न करता निरिक्षण कसे करावे,त्यांना वस्तुनिष्ठ दृष्टीने ओळख न दाखवता संवेदनेचे परिक्षण करणे शिकत आहात.
पीडा सुरु आहे,दुःख देखील सुरु आहे. रडत बसण्याने कुणालाही दुःखापासून मुक्ति मिळणार नाही. कसे काय कुणी ह्यातून बाहेर येईल? ह्याच्या बरोबरच कसे जीवन जगावे?
आजारी व्यक्तिच्या उपचारासाठी त्याला कोणता आजार आहे आणि आजाराचे मूलभूत कारण कोणते आहे हे एका डॉक्टरला माहीत असले पाहिजे. जर कारण असेल,तर तेथील कारण दूर करुन बाहेर येण्याचा रस्ता देखील असला पाहिजे. एकदा जर कारण काढून टाकले तर आजारपण आपोआपच निघून जाइल. म्हणूनच कारण काढून टाकण्यासाठी पाऊल उचलले पाहिजे.
सर्वात आधी एकाने दुःखाच्या ह्या तथ्याचा स्विकार केला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी दुःखाचे अस्तित्व आहे; हे एक विश्वव्यापी सत्य आहे. परंतू जेव्हा कुणी कोणतिही प्रतिक्रिया न करता त्याचे अवलोकन करतो, कारण असे करण्याने तो एक महान,संत व्यक्ति होतोच होतो हे आर्य सत्य आहे .
जेव्हा कुणी एक, दुःखाच्या सत्याचे पहिले आर्य म्हणजे सत्याचे अवलोकन सुरु करतो, तेव्हा लवकरच त्याला दुःखाचे कारण स्पष्ट होऊन जाते, आणि त्याचे अवलोकन सुध्दा सुरु करतो; हे दुसरे आर्य सत्य आहे. जर कारण नष्ट झाले, तर दुःख देखील नष्ट होईल; दुःखाचे निर्मूलन – हे तिसरे आर्य सत्य आहे. त्याचे निर्मूलन संपादन करण्यासाठी पाऊल उचलले पाहिजे; कारण काढून टाकणे हा दुःखाचा अंत करणारा रस्ता – हे चौथे आर्य सत्य आहे.
कोणतिही प्रतिक्रिया न करता निरिक्षण करण्यास शिकणे एकजण सुरु करतो. आपल्याला होत असलेल्या पीडेचे, जसे काय ही पीडा दुसऱ्या कुणाची आहे असे समजून निष्पक्षपणे परिक्षण करा. वैज्ञानिक आपल्या प्रयोगशाळेमध्ये जसा एक प्रयोग पहातो त्याच प्रमाणे आपण त्याचे निरिक्षण करावे. जेव्हा आपण असफल व्हाल,तेव्हा पुन्हा पुन्हा प्रयत्न करा. प्रयत्न करत राहा, आणि आपल्यास दिसून येईल की हळू हळू आपण दुःखातून बाहेर पडत आहोत.
प्रत्येक जिवंत प्राण्यास दुःख भोगावे लागते. जीवनच रडण्याने सुरु होते; जन्म देखील मोठे दुःख आहे. आणि जो कुणी जन्म घेतो त्याला आजारपण व म्हातारपण या दुःखामधून जावेच लागते. परंतू जीवन कितीही दुःखी असो,कुणालाही मरण नको असते, कारण मृत्यू देखील महान दुःख आहे.
जीवनाच्या कालावधीत, एखाद्यास जी गोष्ट आवडत नाही त्याला तोंड द्यावे लागते,आणि ज्या गोष्टी आवडतात त्या वेगळे व्हावे लागते. नावडणाऱ्या घटना होतच रहातात,आवडणाऱ्या घटना होत नाहीत,आणि मग त्यास अत्यंत दुःख वाटू लागते.
फक्त बौध्दिक स्तरावर ह्या सत्यास समजण्याने कोणीही मुक्त होऊ शकत नाही.सत्याचा अनुभव करण्यासाठी आणि दुःखातून बाहेर येण्याचा मार्ग शोधण्यासाठी, आपल्या अंतर्मनात पहाण्यासाठी हे केवळ प्रेरणा देऊ शकते. हेच सर्व बुध्द होण्यासाठी सिध्दार्थ गौतम यांनी केलेः त्यांनी एका संशोधक वैज्ञानिका प्रमाणे आपल्या शरीराच्या चौकटीच्या आंत स्थूल सत्यापासून सुरुवात करीत भासमान सत्यापासून सुक्ष्म,सुक्ष्मतम सत्यापर्यंत पहाणे सुरु केले. त्यांनी पाहिले की एकतर सुखद संवेदना कायम राखण्यासाठी किंवा दुःखद संवेदने पासून सुटका करून घेण्याची जेव्हा एखाद्याला आसक्ति निर्माण होते, आणि जेव्हा ती आसक्ति पुर्ण होत नाही, तेव्हा तो दुःखी होतो. सुक्ष्मतम स्तरावर पुढे जाताना, त्यांनी पाहिले की जेव्हा आपण स्थिरचित्ताने पहातो,तेव्हा हे स्पष्ट होते की पांच संग्रहाची आसक्ति म्हणजेच दुःख आहे. बुध्दिद्वारे समजू शकतो की संपूर्ण शरीर “मी” नाही,”माझे” नाही,परंतू हे केवळ अव्यक्तिगत,बदलत रहाणे हा त्याचा स्वभाव कुणाच्याही नियंत्रणाबाहेर आहे; खरे तर प्रत्येक जण शरीरामुळे ओळखला जातो,आणि त्याप्रती फारच आसक्ति निर्माण करतो. ह्या प्रकारेच कुणीही चार मानसिक संग्रह चेतना,बोध,संवेदना,प्रतिक्रिया याना त्यांच्या बदलणाऱ्या प्रकृतीला समजून देखील “मी” आणि “माझे” यांना आसक्त रहातो (कवटाळतो). व्यवहारासाठी एकजणास “मी” आणि “माझे” बोलावेच लागते, परंतू जेव्हा कुणीही ह्या पाच संग्रहाप्रती आसक्ति उत्पन्न करतो तेव्हा तो आपल्यासाठी दुःख निर्माण करतो. जेथे कुठे आसक्ति आहे, तेथे दुःख असणे स्वाभाविक आहे, आणि जितकी अधिक आसक्ति तितकेच अधिक दुःख आहे.
कुणीही एकजण आपल्या जिवनामध्ये चार प्रकारच्या आसक्ति उत्पन्न करतो. तृष्णेच्या संवयीपर्यंत आपल्या आकांक्षे प्रति आसक्ति पहीली आहे. जेव्हा तृष्णा मनामध्ये उठते, तेव्हा ती शारिरीक संवेदनेला बरोबर घेऊनच येते. जरी खोलवरील भागात अशांति चे तुफान सुरु झाले असले तरी वरच्या स्तरावरील संवेदना आवडतात आणि त्या सुरुच रहाण्याची इच्छा होते. ह्याची तुलना एका व्रणाला खाजविण्याशी केली जाऊ शकतेः असे करण्याने ती वाढत जाते तरीसुध्दा आपण खाजविण्याचा आनंद घेत असतो. ह्या प्रकारे, जशी एक इच्छा पुर्ण होते,तशीच त्या इच्छेबरोबर आलेली संवेदना देखील निघून जाते, आणि म्हणूनच संवेदना सुरु रहाण्यासाठी कुणीही नवीन इच्छा उत्पन्न करतो. मग तो तृष्णेच्या आधीन होऊन जातो आणि आपल्या दुःखाची वाढ करीत असतो.
ह्या “मी” च्या वास्तविकतेस ओळखल्याशिवाय एक आणखी आसक्ति “मी”,”माझा” ह्याना कवटाळून रहाणे आहे. कुणीही “मी” ची निंदा किंवा त्याला दुखवणे सहन करु शकत नाही. आणि ही आसक्ति जे काही “मी”, जे काही “माझे” या अंतर्गत येते तेथपर्यंत पसरते. ही आसक्ति शाश्वत काळापर्यंत सुरु रहाते, तोपर्यंत ती दुःख घेऊन येत नाही, आणि “मी’ सुध्दा ह्या नित्यतेचा आनंद घेऊ शकतो, परंतू आता किंवा नंतर एक किंवा दुसरा निसर्गाच्या नियमानुसार नष्ट होतच असतो. जे नश्वर आहे त्याच्यासाठी आसक्ति बाळगणे हे दुःख आणणारेच आहे.
ह्या प्रकारे, कुणीही आपले विचार आणि विश्वास याबद्दल आसक्ति निर्माण करतो, आणि त्याची कोणत्याही प्रकारची निंदा सहन करु शकत नाही, किंवा दुसऱ्याचे विचार वेगळे असू शकतात हे देखील स्विकारु शकत नाही. प्रत्येकाने रंगीत चष्मा,प्रत्येक व्यक्तिने वेगळ्या रंगाचा चष्मा लावला आहे हे कुणीही समजून घेत नाही. चष्मा काढून, कुणीही सत्य पाहू शकतो,कारण ते रंगरहित आहे, परंतू त्याऐवजी एखादा आपल्या आपल्या पूर्वग्रह आणि विश्वासासाठी चष्म्याच्या रंगाशी चिकटून रहतो.
कुणाचेही संस्कार,रीति-रिवाज आणि धार्मिक प्रथे प्रति आणखी एक आसक्ति असते. कुणी हे समजूनच घेत नाही की हा सर्व बाह्य दिखावा आहे, ह्या मध्ये कोणत्याही सत्याच्या साराचा समावेश नाही. जर एखाद्यास आतील सत्याचा अनुभव घेण्याचा सरळ सोपा मार्ग दाखवला, तरीसुध्दा तो निरर्थक बाह्य स्वरुपाला कवटाळतो, आणि हीच आसक्ति ओढाताण उत्पन्न करते,परिणामस्वरुप दुःख उत्पन्न उत्पन्न करते.
जर अगदी जवळून जीवनांतील साऱ्या दुःखांचे, निरिक्षण केले तर ह्या चार आसक्ति मधून एकाचा किंवा दुसऱ्याचा उदय होत असल्याचे दिसेल. सत्याच्या आपल्या शोधामध्ये सिध्दार्थ गौतम यांनी ह्याचाच अनुभव घेतला. पुढे सुध्दा आपल्या दुःखाचे कारण खोलवर शोधण्यासाठी आणि पूर्ण प्रपंच कसे काम करतो व त्याचा उगम कुठे होतो हे समजण्यासाठी आपल्या अंतर्मनाचा शोध सुरुच ठेवला.
जन्म झाल्याचा अपरिहार्य परिणाम म्हणजे रोग, म्हातारपण, मृत्यु, शारीरिक आणि मानसिक दुःख – जिवनातील कष्ट हे आहे. मग जन्म होण्याचे कारण काय? अर्थात माता-पित्याचे शारीरिक मिलन हे तात्कालिक कारण आहे, परंतू एका व्यापक दृश्य स्वरुपामध्ये, ज्यामध्ये पूर्ण ब्रम्हांड सामील आहे, अशा एका अंतहीन प्रक्रियेमुळे जन्म होतो. येथपर्यंत की मृत्यूच्या वेळेससुध्दा ही प्रक्रिया बंद होत नाहीः तरीदेखील चेतना दुसऱ्या वस्तुमानाच्या रचनेशी जोडलेली असते व शरीराचा ऱ्हास,विघटन सुरुच रहाते,आणि साजेशा भवकडे वाहत राहाणे सुरुच असते. आणि बनण्याची ही प्रक्रिया का होते? त्याना हे स्पष्ट झाले की ह्याला कारण प्रत्येकामध्ये निर्माण होणारीआसक्ति आहे आसक्तिमुळे एकजण जोरदार प्रतिक्रिया करत रहातो, saṅkhārā(संस्कार), जी मनावर खोलवर ठसा उमटवते. जीवनाच्या अंतीम क्षणी, ह्या मधील एक मनामध्ये उत्पन्न होते आणि चेतना पुढे सुरु राहण्यासाठी गती देते.
आता ह्या आसक्तिस कारण काय आहे? त्यांनी दिसले की आवड आणि नावड यांच्या क्षणिक प्रतिक्रियेमुळे त्या उत्पन्न होतात. आवड मोठ्या रागामध्ये(आसक्ति) परावर्तित होते; नावड मोठ्या द्वेषामध्ये,रागाची प्रतिमा, आणि दोन्ही आसक्तिमध्ये बदलून जातात. पसंती व नापसंतीच्या क्षणिक प्रतिक्रिया का होतात? जो कुणी स्वतःचे निरिक्षण करेल त्याला समजेल की त्या शारीरिक संवेदनेमुळे येतात. जेव्हा एक सुखद संवेदना उत्पन्न होते,तेव्हा एखाद्यास ती आवडते आणि तो ती सुरु ठेवून द्विगुणीत करु पहातो.जेव्हा एक दुःखद संवेदना उत्पन्न होते, एखादा ती नापसंत करतो आणि त्यापासून सुटका करु पहातो. मग ह्या संवेदना का आहेत? हे स्पष्ट आहे की त्या इंद्रिय आणि त्यांच्या विषयाच्या बाह्य वस्तूबरोबरील संपर्कामुळे उत्पन्न होतातः जसे दृष्टिशी डोळ्याचा संपर्क,ध्वनिचा कानाशी संपर्क,गंधाचा नाकाशी संपर्क,स्वादाचा जीभेशी संपर्क,शरीराशी स्पर्शाचा संपर्क,मनाचा विचाराशी किंवा कल्पनेशी संपर्क. संपर्क होता क्षणीच एक सुखद, दुःखद,किंवा तटस्थ संवेदना निर्माण होणारच.
आणि ह्या संपर्काचे कारण काय आहे? हे स्पष्ट आहे की पूर्ण ब्रम्हांड विषय वस्तुने भरलेले आहे. जोपर्यंत सहा इंद्रिय विषय – पांच शारीरिक, मनाबरोबरच – कार्य करीत आहेत, ते आपल्या संबंधित वस्तुविषयाला तोंड देण्यासाठी सज्ज असतात. आणी ही इंद्रिये कशासाठी आहेत? हे स्पष्ट आहे की ती मन व शरीर यांच्या मिळत्या-जुळत्या प्रवाहाचा अविभाज्य अंग आहेत; जसे जीवन सुरु होते त्या वेळी ती उत्पन्न होतात. आणी जीवन प्रवाह का सुरु होतो,मन आणि शरीर यांचा जीवन प्रवाह का उत्पन्न होतो? कारण चेतनेचा प्रवाह आहे,एका क्षणापासुन दुसऱ्या क्षणापर्यंत,एका जीवनापासून दुसऱ्यापर्यंत सुरुच असतो. चेतनेचा हा प्रवाह कशासाठी? त्यांनी पाहिले की ह्याचे कारण आहे sakhara(संस्कार) मानसिक प्रतिक्रिया आहेत. प्रत्येक प्रतिक्रिया चेतनेच्या प्रवाहाला धक्का देते; हा प्रवाह प्रतिक्रियेने दिलेल्या बळाच्या जोरावर सुरुच रहातो. आणि ह्या प्रतिक्रिया का होतात? त्यांनी पाहिले की त्या अविद्येमुळे((अज्ञान) उत्पन्न होतात. एकाद्यास समजतच नाही की तो काय करत आहे,कशा प्रतिक्रिया करत आहे हे त्याला समजतच नाही, आणि म्हणूनच एक जण sakhara(संस्कार) निर्माण करत रहातो. जोपर्यंत अविद्या(अज्ञान) असेल तोपर्यंत तेथे दुःख राहील.
दुःखाच्या प्रक्रियेचा मुख्य स्त्रोत,अतिशय खोलवरील कारण अज्ञान(अविद्या) हे आहे. अज्ञानामुळे घटनांची शृंखला सुरु होते ज्यामुळे एकजण आपल्यासाठी दुःखाचा डोंगर उत्पन्न करतो. जर अज्ञान दूर केले तर दुःख देखील दूर होईल.
कोणी हे कसे तडीस नेऊ शकतो? कोण कशी ही श्रृंखला तोडू शकतो? मनाचा आणि शरीराचा जीवनप्रवाह, आधीच सुरु झाला आहे. आत्महत्या काही ही समस्या सोडवू शकणार नाही; त्याने केवळ नवीन दुःख उत्पन्न होईल. आपण स्वतःस नष्ट केल्याशिवाय इंद्रियांना नष्ट करु शकत नाही. जोपर्यंत इंद्रियांचे अस्तित्व आहे, तोपर्यंत त्यांचा संबंधित विषयाबरोबर संपर्क होणारच, आणि जेव्हा संपर्क होईल तेव्हा शरीरामध्ये एक संवेदना उत्पन्न होणारच.
आता येथे,संवेदनेच्या कडीद्वारे एकादा श्रृंखला तोडू शकतो. ह्याआधी,प्रत्येक संवेदना पसंतीच्या किंवा नापसंतीच्या प्रतिक्रियेस जन्म देत होती, जी एका मोठ्या राग(आसक्ति) किंवा द्वेष म्हणजेच मोठ्या दुःखास जन्म देत होती. परंतू आता,“हे सुध्दा बदलणार आहे” हे समजून संवेदनेस प्रतिक्रिया करण्याऐवजी आपण फक्त समतेने निरिक्षण करणे शिकत आहात. ह्या प्रकारे संवेदनेस aniccā(अनिच्च) समजल्यामूळे, केवळ शहाणपणाचा(ज्ञान) उदय होतो. कुणी एकजण दुःखचक्राचे फिरणे थांबवितो आणि उलट्या दिशेने, मुक्तिच्या दिशेने त्यास फिरविणे सुरु करतो.
कोणत्याही क्षणी जेव्हा कोणताही नवीन sakhara(संस्कार) उत्पन्न केला नाही तर जुन्या संस्कारामधून एक मनाच्या वरच्या स्तरावर येईल आणि त्याच बरोबर एक संवेदना शरीरामध्ये सुरु होईल. कुणीही समतेमध्ये राहीला,तर त्या नष्ट होतात आणि त्या जागी एक जुनी प्रतिक्रिया उत्पन्न होते. कुणीही एक शारीरिक संवेदने प्रती समतेमध्ये रहातो तेव्हा जुना sakhara(संस्कार) वरच्या स्तरावर येतो आणि समता असल्यास एका पाठोपाठ एक नष्ट होत जातो. अज्ञानामुळे एकजण संवेदने प्रती प्रतिक्रिया करत असतो,तेव्हा तो sakhara(संस्कार) द्विगुणीत करतो,आपले दुःख वाढवत असतो. परंतू जेव्हा एकजण ज्ञान वाढवितो आणि त्यानंतर संवेदनेची प्रतिक्रिया करत नाही, तेव्हा एका पाठोपाठ एका sakhara(संस्कार) चे निर्मूलन होत रहाते,आणि दुःखापासुन मुक्ति मिळते.
संपूर्ण मार्ग दुःखातून बाहेर पडण्याचा एक रस्ता आहे. अभ्यास करुनच पहाल की आपण नव्या गांठी बांधणे बंद केले आहे आणि आपोआपच जुन्या गांठी उघडल्या जात आहेत. हळू हळू आपण अशा स्थिती पर्यंत प्रगती कराल जेथे नवीन जन्माकडे घेऊन जाणारे आणि म्हणूनच नवीन दुःख उत्पन्न करणारे सर्व संस्कार saṅkhārā नष्ट होतीलःपूर्ण मुक्तीची स्थिती,संपूर्ण ज्ञानाकडे जाल.
काम सुरु करण्यासाठी, पुर्वजन्म आणि भविष्यांतील जीवनामध्ये विश्वास ठेवला पाहिजे असे आवश्यक नाही. विपश्यनेच्या अभ्यासा मध्ये, वर्तमानकाळ सर्वांत महत्वपूर्ण आहे. येथे वर्तमान जिवनामध्ये आपण saṅkhārā(संस्कार) उत्पन्न करीत असतो व स्वतःस दुःखी करीत रहातो. येथे आणि आता आपल्यास ही संवय सोडून टाकणे आणि दुःखातून बाहेर येणे सुरु केले पाहिजे. जर आपण अभ्यास करीत राहिलात,तर निश्चितच एक दिवस असा येईल जेव्हा आपण सांगू शकाल की आपण सर्व जुने saṅkhārā(संस्कार) काढून टाकले आहेत आणि कोणतेही नवीन उत्पन्न करणे बंद केले आहे, आणि अशाप्रकारे आपल्यास सर्व दुःखापासून मुक्त करुन घेतले आहे.
हे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी,स्वतःलाच काम करावे लागेल. म्हणुनच उरलेल्या बाकी पांच दिवसामध्ये कडक मेहनतीने, आपल्या दुःखातून बाहेर येण्यासाठी,आणि मुक्तिचा आनंद घेण्यासाठी काम करा.
आपणा सर्वास खऱ्या सुखाचा आनंद मिळो.
सर्वांचे मंगल होवो