विपश्यना
सत्यनारायण गोएंका द्वारा जशी शिकविली जाते
साधना
आचार्य गोयन्काजी द्वारा शिकविली जाणारी विपश्यना साधना
विपश्यना साधना
सत्यनारायण गोएंका द्वारा जशी शिकविली जाते
आचार्य गोयन्काजी द्वारा शिकविली जाणारी विपश्यना साधना
आचार्यांची श्रुंखला
आदरणीय लेडी सयाडॉ
1846-1923
आदरणीय लेडी सयाडॉ यांचा 1846 मध्ये सॅंग-पिन गाव,डिपेयीन टाउनशिप,उत्तर ब्रह्मदेश मधील श्वेबो जिल्ह्यामध्ये(वर्तमान काळातील मोनीवा जिल्हा) येथे जन्म झाला होता.बालपणातील नांव मौन्ग टेट खौन्ग होते.(मुलगा किंवा युवकांना मास्टर ह्याच्या बरोबरीची बर्मी संज्ञा आहे.वर चढणे हे टेट म्हणून सूचीत होते आणि खौन्ग सूचीत करते की छप्पर किंवा शिखर.)ह्यावरुन हे नांव योग्य असल्याचे सिध्द होते कारण युवा मौन्ग टेट खौन्ग आपल्या सर्वच प्रयत्नामध्ये शिखरावर चढले.
आपल्या गांवामधील पारंपारिक विहार शाळेमध्ये ते येत असत. जेथे bhikkhus(भिक्षु) मुलांना बर्मी भाषेत वाचणे,लिहिणे शिकवित असत, त्याबरोबरच पाली पाठ ऐकवित असत. ह्या सर्वव्यापी विहार शाळांमुळे, बर्माने पारंपारिक रुपात साक्षरतेचा ऊच्च स्तर राखून ठेवला आहे.
आठव्या वयांतच त्यांनी आपले पहिले शिक्षक, यू नंदा-धाजा सयाडॉ बरोबर अध्ययन चालू केले,आणि पंधराव्या वर्षीच त्याच सयाडॉकडून samanera ची दीक्षा घेतली.त्यांना नाना-धाजा ( ज्ञाना्ची पताका)नांव दिले गेले. त्यांच्या विहारातील शिक्षणामध्ये पाली व्याकरण आणि विभिन्न ग्रंथामधील पाली नियमांच्या विशेषतेबरोबरच Abhidhammattha-sangaha सामिल होते. हे एक भाष्य म्हणूनAbhidhamma च्या नियमांच्या विभागासाठी एक गाइड स्वरुप काम करते.
त्यांच्या जीवनाच्या उत्तरकाळात नंतर त्यांनी Abhidhammattha sangaha वर एक विवादास्पद टिप्पणी लिहिली,ज्याला Paramatttha-dipani (अंतिम सत्याचे मॅन्यूअल) म्हटले जाते, ज्यामध्ये त्यांनी ज्या चुका त्यांना पूर्वीच्या तसेच त्यावेळी प्रचलीत असलेल्या विवरणात्मक आवृत्तींमध्ये दिसल्या होत्या त्यांची सुधारणा अंततः भिक्खूनी स्विकारल्या आणि त्यांचे ते काम एक मानक संदर्भ बनले.
एकोणिविसव्या शतकाच्या मध्यामध्ये, आधुनिक प्रकाश निर्मितीच्याआधी samanera असताना ते नियमितपणे लिहिलेल्या ग्रंथाचे दिवसभर अध्ययन करीत आणि bhikkhus बरोबर रहात तसेच अंधार पडल्यानंतर इतर samaneras बरोबर स्मृतिनुसार सस्वर पाठामध्ये सामिल होत असत. ह्या प्रकारे त्यांनी Abhidhammaसंहितामध्ये नैपुण्य मिळविले.
जेव्हा ते 18 वर्षांचे झाले, Samanera नाना-धाजांनी संक्षेप वस्त्र सोडून दिले आणि एक सामान्य माणूस म्हणून राहू लागले. ते आपल्या शिक्षणाबद्दल असंतुष्ट होते, कारण त्यांना असे वाटत होते की हे शिक्षण Tipitaka.3 पर्यंतच सिमीत केले होते. सहा महिन्यांनंतर त्यांचे पहिले शिक्षक आणि एक अन्य प्रभावशाली शिक्षक म्यिन्हतिन सयाडॉ यांनी त्यांना विहारवासी जीवनात परत येण्यासाठी त्यांचे मन वळविण्याचे पुष्कळ प्रयत्न केले, परंतू त्यांनी त्याला नकार दिला.
म्यिन्हतिन सयाडॉनी सुचविले की त्यानी कमीतकमी आपले शिक्षण चालू ठेवले पहिजे. युवा मौन्ग टेट खौन्ग पुष्कळच हुशार होते आणि शिकण्यासाठी उत्सुक होते, म्हणून त्यानी ह्या सूचनेचा त्वरित स्वीकार केला.
"आपल्याला Vedas (वेद), हिंदू धर्माच्या प्राचीन पवित्र लिखाण शिकण्यामध्ये रुचि आहे का?" म्यिन्हतिन सयाडॉनी विचारले.
"हो, आदरणीय महोदय," मौन्ग टेट खौन्ग यांनी उत्तर दिले.
"ठीक आहे, तर आपल्याला samanera व्हायला हवे," सयाडॉनी म्हटले, " अन्यथा येउ गांवातील सयाडॉ यु गंधमा विद्यार्थी म्हणून आपला स्वीकार करणार नाहीत."
"मी एक samanera होऊन जाईल." त्यांनी सहमती दर्शविली.
ह्या प्रकारे ते आपल्या नव्या जीवनात परत आले, परत एकदा भिक्खूचे चे वस्त्र कधीही न सोडण्यासाठी. नंतर त्यांनी आपल्या शिष्यामधील एकावर सर्व सोपविले.
"सर्वात प्रथम मला Vedas वेदांच्या ज्ञानाने लोकांचे भाग्य सांगून उपजीविकेचे साधन बनवण्याची इच्छा मी करत होतो. परंतु त्यातूनही मी अधिक भाग्यशाली ठरलो व मी पुन्हा एक samanera झालो. माझे शिक्षक अतिशय बुध्दिमान होते; त्यांच्या उत्कट प्रेमाने आणि करुणेने त्यांनी मला वाचविले."
प्रतिभाशाली Samanera नाना-धाजा नी,गंधमा सयाडॉ च्या देखरेखीखाली, आठ महीन्यामध्ये Vedas वेदांमध्ये नैपुण्य मिळवले आणि Tipitaka चे आपले अध्ययन चालू ठेवले. 20 व्या वर्षी 20 अप्रैल, 1866 मध्ये, bhikkhu भिक्खु बनण्यासाठी आपले जूने शिक्षक यू नंदा-धाजा सयाडॉ,बरोबर त्यानी उच्च समन्वय साधला, जे त्यांचे गुरू (जो उपदेश देतो) झाले.
1867 मध्ये, मान्सून संपण्यापूर्वी भिखू नाना-धाजानी, मंडालेमध्ये आपले प्रशिक्षण चालू ठेवण्यासाठी आपले गुरु आणि जेथे आपण वाढलो तो मोन्य्वा जिल्हा सोडून दिला.
त्या वेळेस, ज्यांचे शासनकाळ 1853-1878 होते त्या राजा मिन डॉन मिनच्या शासनादरम्यान, मंडाले ही शाही राजधानी होती आणि देशामध्ये शिक्षणाचे महत्वपूर्ण केंद्र होते. त्यानी पुष्कळशा प्रमुख सयाडॉकडे अध्ययन केले आणि त्या बरोबरच मोठी आध्यात्मिक विद्वत्ता मिळविली. ते प्रमुखतः महा-जोतिकरमा विहारामध्ये रहात होते आणि त्यांनी आदरणीय सान-क्यौन्ग सयाडॉ बरोबर अध्यापन केले, जे बर्माचे एक असे अध्यापक होते की जे Visuddhimagga Path of Purification (शुध्दता चा विशुद्धिमग्ग पथ)च्या ब्रह्मी अनुवादासाठी प्रसिध्द आहेत.
याच वेळेस आदरणीय सान-क्यौन्ग सयाडॉनी 2000 छात्रांसाठी 20 प्रश्नांसाठी एक परीक्षा घेतली. केवळ एकमेव भिक्खु नाना-धाजा ही संतोषजनक रुपात सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यात सक्षम ठरले. आदरणीय लेडी सयाडॉ यानी लिहिलेल्या पुष्कळशा पाली आणि बर्मी मध्ये लिहिलेल्या पुस्तकामध्ये प्रथम असे Parami-dipani (पूर्णता चे मॅन्युअल) > शीर्षका अंतर्गत ही उत्तरे नंतर 1880 मध्ये प्रकाशित केली गेली.
त्यांच्या शिक्षणाच्या वेळी मंडालेचे राजे मिन डॉननी पाचव्या बौद्ध परिषदेचे आयोजन करुन, bhikkhus ना Tipitaka चे पठण आणि शुध्द करण्यासाठी दुरदुरुन बोलावले.परिषद 1871 मध्ये मंडाले येथे आयोजित केली गेली आणि प्रमाणीकृत वचने 729 संगमरमर स्लैबमध्ये खोदली. प्रत्येक स्लॅब लहान पगोडाच्या खाली ठेउन मंडाले हिलच्या पायथ्याशी असलेल्या स्वर्ण कुथोडॉ पगोडाच्या चारही बाजुस आजही उभे आहेत. ह्या परिषदेमध्ये भिक्खु नाना-धाजानी Abhidhamma(अभिधम्म) परीक्षणाचे संपादन आणि अनुवादामध्ये मदत केली.
आठ वर्षानंतर bhikkhu(भिक्खु),होऊन सर्व परिक्षा पास होत आदरणीय नाना-धाजा Maha-Jotikarama (महा-जोतिकरमा) विहार जेथे त्यानी अध्ययन केले होते तेथे परिचयात्मक पालीचे अध्यापक म्हणून अर्हता प्राप्त करते झाले.
आठ वर्षांपेक्षा अधिक काळ ते तेथे राहिले. जेव्हा 1882 मध्ये ते मोन्य्वा येथे ज़ाईपर्यंत त्यांनी शिकविले आणि स्वतःचे शैक्षणिक प्रयत्न चालू ठेवले.आता त्यांचे वय ३६ झाले होते. त्या वेळी मोन्य्वा हे एक छिन्दविन नदीच्या पूर्व किनाऱ्यावरचे एक छोटेसे जिल्हा केंद्र होते, ती अशी जागा होती जी की जेथे केवळ Tipitaka च्या काही निवडक भागांच्या पठणाऐवजी पूर्ण त्रिपिटक शिक्षण पध्दतीच्या अध्ययनासाठी प्रसिध्द होते.
(bhikkhus) भिक्खुआणि सामनेरा(samaneras)ना पाली शिकविण्यासाठी ते दिवसा मोन्य्वा शहरामध्ये येत असत, परंतु संध्याकाळी ते छिन्दविनचा पश्चिम किनारा पार करून लाक-पन डोंगराच्या बाजूला असलेल्या एका छोट्याशा vihara(मठ) विहारामध्ये आपली रात्र ध्यानामध्ये घालवित असत. खरे तर आम्हाला निश्चित माहित नाही, परंतु संभव आहे की ह्या कालावधीत त्यांनी पारंपारिक बर्मी पध्दतीच्या ध्यानाबरोबरच Anapana (श्वसन) आणि Vedanā (संवेदना) चा अभ्यास सुरु केला असावा.
ब्रिटिशानी 1885 मध्ये वरील बर्मा वर विजय प्राप्त केला आणि शेवटचे राजे, थिबाव, जे 1878-1885 मध्ये शासन करत होते त्यांना अज्ञातवासात पाठविले.पुढील साली,1886 मध्ये, आदरणीय नाना-धाजा मोन्य्वाच्या उत्तर बाजूच्या लेडी वनामध्ये परत गेले. काही काळानंतर, पुष्कळ भिक्खु(bhikkhus) त्यांच्याकडे येऊन विनंती करु लागले की त्यांनी त्यांना शिकवावे. त्यांच्यासाठी एक विहार तयार केला गेला आणि त्याचे नांव लेडी-तव्या ठेवले गेले. ह्या विहारापासून त्यांनी लेडी सयाडॉ नांव धारण केले ज्या नांवाने ते चांगले ओळखले जातात. असे सांगितले जाते की मोन्य्वा एका मोठ्या शहरामध्ये रुपांतरित झाले, त्यांपैकी एक कारण हे होते की अनेक लोक लेडी सयाडॉच्या विहाराकडे आकर्षित होत होते. ते लेडी-तव्या मध्ये पुष्कळशा महत्वाकांक्षी विद्यार्थ्याना शिकवित असत, परंतु आपल्या ध्यानाचा अभ्यास सुरु ठेवण्यासाठी आपल्या छोट्या कुटीरामध्ये विहार नदी पार करुन परत येत असत.
जेव्हा ते दहा वर्षांसाठी लेडी वन विहारामध्ये होते, तेव्हा त्यांच्या मुख्य शैक्षिक कामाचे प्रकाशन सुरु झाले.पहिले होते ते त्यांचे वर उल्लेख केलेले परमथ्था-दिपानी{Paramattha-dipani) (अंतिम सत्याचे मॅन्युअल) जे 1897 मध्ये प्रकाशित झाले.ह्या अवधितले त्यांचे दुसरे पुस्तक होते निरुत्ता-दिपानी(Nirutta-dipani)जे पाली व्याकरणावर होते. ह्या पुस्तकांमुळेच ते बर्मामध्ये सर्वात जास्त शिक्षित भिक्खु(bhikkhus)च्या रुपात ओळखले जाऊ लागले.
जेव्हा लेडी सयाडॉ लेडी-तव्या विहारामध्ये रहात होते,तेव्हासुध्दा ते पुष्कळवेळा बर्माभर यात्रा करताना दोन्ही ध्यान आणि शास्र शिकवित असत. ते म्हणजे वास्तविक एक (bhikkhu) भिक्खु म्हणून दुर्लभ उदाहरण आहे, जे pariyatti (धम्माचे सिद्धांत) याबरोबरच patipatti ( धम्माचा अभ्यास) यामध्ये उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी सक्षम होते. त्यांचे प्रकाशित झालेले लिखाण त्यांच्या बर्मामधील यात्रेदरम्यानच झाले होते. उदाहरणादाखल, त्यांनी पटिक्क-समुप्पाद-दिपानी(Paticca-samuppada-dipani)दोन दिवसांत, प्रोमेसेपासुन मंडालेपर्यंतच्या नावेमधील यात्रा करतेवेळी लिहिले होते. त्यावेळेस त्यांच्याबरोबर कोणतीही संदर्भ पुस्तके नव्हती,तरीसुध्दा तिपिटका(Tipiitaka)चे संपूर्ण ज्ञान असल्यामुळे त्यांना दुसरी कसलीही आवश्यकता पडली नाही. (Manuals of Buddhism)बौद्ध धर्माची नियमावली चे 76 मॅन्युअल, टिप्पणि,निबंध, आणि पुष्कळशा इतर. त्यांच्या लेखकिय ग्रन्थकारिता मध्ये सूचीबद्ध आहेत,वस्तुतः ही देखील त्यांच्या लेखन कार्याची अपूर्ण यादी आहे.
त्यानंतर, त्यांनी बर्मी भाषेमध्ये पुष्कळ पुस्तके लिहिली.ते म्हणत की अशा प्रकारे लिहावे की साधारण शेतकरी सुध्दा समजू शकेल.त्यांच्या आधी, सर्वसाधारण लोकांच्या हाती लागू नये म्हणून धम्म विषयी पुस्तके लिहिणे दुर्मिळ होते. इतके की तोंडी शिकवित असताना देखील, भिक्खु(bhikkhus) सर्वसामान्यपणे (Pali)पालीमध्ये लांबलचक परिच्छेद ऐकवित असत आणि परत त्यांचा शब्दशः अनुवाद करीत असत,जो समजणे सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर होते.लेडी सयाडॉंची व्यावहारिक समज आणि त्यातून उगम पावलेली mettā(मैत्री) समाजाच्या सर्व स्तरांमध्ये धम्माचा प्रसार करण्याच्या त्यांच्या आंतरिक इच्छेत दिसते. त्यांच्या परमाथ्था-संखेपा(Paramattha-sankhepa)जे (Abhidhammattha-sangaha)अभिधम्मथ्था-संगहच्या 2,000 बर्मी छंदाच्या अनुवादाचे एक पुस्तक आहे, जे युवकांसाठी लिहिले गेले होते, ते आजदेखील पुष्कळ लोकप्रिय आहे.त्यांच्या अनुयायांनी पुष्कळशा संगठना चालू करुन ह्या पुस्तकाचा उपयोग करुन अभिधम्म(Abhidhamma)च्या शिकवणीचा प्रचार केला.
बर्मांतील आपल्या चौफेर यात्रेदरम्यान, लेडी सयाडॉनी लोकांना गाईच्या मांसाच्या खपापासून परावृत्त केले. त्यांनी एक पुस्तक Go-mamsa-matika लिहिले होते, ज्या मध्ये त्यांनी भोजनासाठी लोकांना गायींना न मारण्याचा आग्रह केला आणि एक शाकाहारी भोजनासाठी प्रोत्साहित केले.
या अवधी दरम्यान,म्हणजे शतकाच्या अंतानंतर, आदरणीय लेडी सयाडॉच्या जवळ प्रथम यू पो थेट विपश्यना शिकण्यासाठी आले, जे नंतर बर्मामधील सुप्रसिध्द ध्यान शिक्षकांमध्ये एक गणले जाऊ लागले, आणि तेच सयाजी यु बा खिन ह्यांचे आचार्य होते जे गोयन्काजीचे आचार्य झले.
1911 मध्ये त्यांची प्रसिध्दी एक विद्वान आणि ध्यान गुरु ह्या दोन्ही क्षेत्रामध्ये इतकी झाली की भारताच्या ब्रिटिश सरकारने, जे ब्रह्मदेशावरदेखील शासन करीत होते, त्यांना Aggamaha-pandita (अग्रणी महान विद्वान) ह्या उपाधिने सन्मानित केले गेले.त्यांना रंगून विश्वविद्यालयाने साहित्यातील डॉक्टरेट देऊन सन्मानित केले होते.वर्ष 1913-1917 च्या दरम्यान त्यांनी लंडन येथील पाली पाठ सोसायटीच्या श्रीमती रिज़-डेविड,यांच्या बरोबर पत्रव्यवहार केला होता,आणि Abhidhammaवरील पुष्कळशा बाबतींतील त्यांच्या विचार-विनिमयाचा अनुवाद Journal of the Pali Text Society.(पाली पाठाचे जर्नल) यामध्ये प्रकाशित केला गेला होता.
आपल्या जीवनाच्या अंतिम वर्षोंमध्ये आदरणिय लेडी सयाडॉ यांची दृष्टि अधू होऊ लागली कारण पुष्कळ वर्षे त्यांनी नेहमीच कमी प्रकाशामध्ये वाचन,अभ्यास आणि लेखन यामध्ये घालविली होती. 73 व्या वयामध्ये त्यांना अंधत्व आले आणि मग त्यांनी आपले उर्वरित आयुष्य संपूर्णतः ध्यान आणि शिकविण्यासाठी समर्पित केले. 77 व्या वयादरम्यान,1923 मध्ये मंडाले आणि रंगून यामधील प्यिन्माना येथे त्यांचा मृत्यु झाला.ही एक अनेक विहारांमधील अशी एक जागा आहे, जी त्यांच्या संपूर्ण बर्मांतील भ्रमणयात्रा आणि सर्वांना शिकविण्याच्या एक परीणामस्वरुप त्यांच्या नावांने स्थापित केले गेले होते.
आदरणीय लेडी सयाडॉ कदाचित त्यांच्या जीवनकाळातील सर्वांत उत्कृष्ट बौद्ध व्यक्ति होती. जे धम्मपथाच्या संपर्कात आले आहेत ते सर्व लोक ज्यांनी विपश्यनेच्या पारंपारिक प्रथेला पुनर्जिवीत करुन सामान्य लोकांना अधिक प्रमाणात उपलब्ध करुन समान रुपात सफल बनवण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावली अशा ह्या विद्वान, संत भिख्खूप्रति,लोक ऋणी आहेत.त्यांच्या अध्यापन ह्या महत्वपूर्ण पैलूशिवाय,त्यांच्या,संक्षिप्त,स्पष्ट आणि व्यापक विद्वत्तापूर्ण कार्य धम्माच्या अनुभवात्मक पैलूला स्पष्ट करण्यासाठी सहाय्यकारक झाले.
1 पदवी सयाडॉ (Sayadaw) ह्याचा अर्थ आदरणीय शिक्षक मूलतः महत्वपूर्ण मोठ्या भिक्षूंना दिला होता, थेरा(Theras) जे राजाला धम्म मध्ये निर्देश देत होते. नंतर मात्र, ही सामान्य रूपात उच्च सम्मानित भिक्षुसाठी एक पदवी बनली.
2 अभिधम्म(Abhidhamma) पालीचे तिसरे खंडनियम आहेत ज्यामध्ये बुद्धानी मन आणि शरीराच्या वास्तविकतेचे खोलवर, विस्तृत आणि तांत्रिक विवरण दिले आहे.
3 तिपिटक(Tipitaka) हे एक पाली(Pali)मध्ये पूऱ्या बौद्ध नियमांसाठी नांव आहे.ह्याचा अर्थ तीन करंड्या, म्हणजे एक करंडी विनयVinaya) (भिक्षुसाठी नियम)ची; दुसरी करंडी सुत्त(Suttas) (प्रवचन)चीआणि तिसरी करंडी (Abhidhamma) अभिधम्म ची (वरील फुटनोट 2 पहा).