विपश्यना
सत्यनारायण गोएंका द्वारा जशी शिकविली जाते
साधना
आचार्य गोयन्काजी द्वारा शिकविली जाणारी विपश्यना साधना
विपश्यना साधना
सत्यनारायण गोएंका द्वारा जशी शिकविली जाते
आचार्य गोयन्काजी द्वारा शिकविली जाणारी विपश्यना साधना
पहिल्या दिवसाचे प्रवचन
प्रारंभिक अडचणी—ह्या ध्यानाचा उद्देश- का श्वास हाच प्रारंभिक बिंदू म्हणून घेतला आहे—मनाचे स्वरुप—अडचणींचे कारण,आणि त्याच्याशी कसा व्यवहार करावा—टाळण्यासारखे धोके < / i>
पूर्ण दिवसभर बसणे आणि ध्यानाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करण्यामुळे आणि श्वास सोडून दुसरे काहीही न करता फक्त श्वासाबद्दल जागरुकता, आणि जास्त म्हणजे ध्यानाच्या ह्या प्रकारामुळे पहिला दिवस मोठ्या कठिण स्थितिचा व असुविधांनी भरलेला होता.
श्वासाच्या सजगते बरोबरच, एकादा शब्द पुन्हा पुन्हा जप करणे,एकादा मंत्र,भगवंताचे नांव, किंवा देवतेची आकृती किंवा रुपाची कल्पना सुरु केली असती तर ह्या सर्व कष्टाशिवाय मनावर ध्यान केंद्रित करणे सहजपणे आणि जलद झाले असते.परंतू आपल्यास फक्त नैसर्गिक श्वासाचे निरिक्षण करायचे आहे,कोणत्याही नियमना शिवाय; शब्दा शिवाय किंवा कल्पनेखेरीज.
ह्यासाठी परवानगी नाही,कारण ध्यानाचे अंतिम लक्ष मनाची एकाग्रता हे नाही. मनाची शुध्दता,सर्व मानसिक दूषितता, आतील नकारात्मकता,आणि ह्या प्रकारे सर्व दुःखापासून मुक्ति प्राप्त करण्यासाठी,संपूर्ण ज्ञान प्राप्त करण्यासाठी केवळ एक मदत, एका उच्च ध्येयासाठी एक पाऊल आहे.
प्रत्येक वेळेस अशुद्धता,जसे की क्रोध,घृणा,वासना,भय यांच्या स्वरुपात मनामध्ये उठते, तेव्हा एखादा दुःखी होऊन जातो.जेव्हा काहीही नको असलेले घडते तेव्हा तो तणावपूर्ण होऊन जातो आणि आतमध्ये गाठी बांधणे सुरू करतो. जेव्हा हवे असलेले घडत नाही,तेव्हा तो आतमध्ये तणाव उत्पन्न करतो.पूर्ण जीवनभर तो ही प्रक्रिया तोपर्यंत वारंवार करीत रहातो जोपर्यंत गॉरडीयन नॉटप्रमाणे तो पूर्ण मानसिक व शारिरीक स्तरावर क्लिष्ट गांठीचा गठ्ठा होऊन जात नाही. शिवाय तो ह्या तणावास आपल्यापर्यंत सीमित ठेवत नाही, तर जो कुणी त्याच्या संपर्कात येईल, त्याला वाटत रहातो. निश्चितच हा चांगले जीवन जगण्याचा मार्ग नाही.
ह्या ध्यान शिबीरा मध्ये जिवन जगण्याची कला शिकण्यासाठी आपण आला आहातः आपल्या मध्ये आंतील शांती व सौहार्दपूर्वक जिवन कसे राहील,आणि दुसऱ्यांप्रति शांति आणि सद्भाव कसा उत्पन्न होइल;एकात्मक प्रेमाने भरलेले मन,करुणे बरोबर,दुसऱ्यांच्या सफलतेचा आनंद,समतेसहित,शुध्द मनाची प्रगति करीत दिवसेंदिवस सुख चैनाने कसे जगावे ह्यासाठी आहे.
सौहार्दपूर्ण जगण्याची कला शिकण्यासाठी प्रथम आपल्यास ह्या विसंवादाचे कारण शोधले पाहिजे. ह्याचे कारण आपल्यामध्येच दडलेले असते, आणि म्हणूनच आपल्यास आपल्यामधील सत्याचा शोध घेतला पाहिजे. ही विद्या आपल्या स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक रचनेचा शोध घेण्यास मदत करते, ज्याबद्दल पुष्कळच आसक्ती असल्याने त्याची परिणीती केवळ तणाव आणि दुःखामध्ये होत असते. प्रायोगिक स्तरावर एकाने स्वतःचा मानसिक आणि शारीरिक जातिस्वभाव समजला पाहिजे; त्यानंतरच मन व शरीराच्या पलीकडे जे काही आहे त्याचा अनुभव तो करू शकेल. म्हणूनच ही सत्याचा बोध, आत्मबोध, स्वतःबद्दलच्या सत्यतेचा शोध घेण्याची विद्या आहे. ह्याला ईश्वरप्राप्तीची एक विद्या असेही म्हणू शकतो, कारण की शेवटी परमेश्वर म्हणजे सत्य आहे, प्रेम आहे, पवित्रता आहे.
सत्याचा प्रत्यक्ष अनुभव आवश्यक आहे. वरवरचा,दिखावू,बाष्कळ सत्यापासून सूक्ष्म सत्या पर्यंत, मन आणि शरीराच्या सूक्ष्मतम सत्यापर्यंत स्वतःला ओळखा. हा सर्व अनुभव घेतल्या नंतर, मन आणि शरीर याच्या पलिकडे अंतिम सत्याचा अनुभव घेण्यासाठी कुणीही पुढे जातो.
श्वास एक योग्य बिंदू आहे, जेथून ही यात्रा सुरू होते. ध्यानासाठी स्वनिर्मित किंवा काल्पनिक शब्द वा आकृतीचा उपयोग करण्याने अधिकाधिक कल्पना, अधिकाधिक भ्रमाच्या दिशेने जाल; हे आपल्यातले सूक्ष्म सत्य शोधण्यास साहाय्यकारक होणार नाही. सूक्ष्म सत्याचे आकलन होण्यासाठी कुणालाही सत्यापासून सुरू करावे लागेल, एक स्थूल सत्य जसे की श्वास. जर एखादा शब्द किंवा एखाद्या देवतेचे रूप वापरले, तर तंत्र(विधी) सांप्रदायिक होऊन जाईल. शब्द किंवा आकृति एखाद्या संस्कृतीची , एका धर्माची किंवा दुसऱ्या कुणा धर्माची म्हणून ओळखली जाईल, आणि निराळी पार्श्वभूमी असणाऱ्या लोकांना हे अस्वीकारार्ह होऊ शकते. दुःख एक सार्वत्रिक रोग आहे. ह्या रोगाचा इलाज सांप्रदायिक होऊ शकत नाही; हा इलाजदेखील सार्वत्रिक हवा. श्वासाबद्दलची सजगता ह्या सर्व आवश्यकता पूर्ण करतात. श्वास सर्वांसाठी समान आहेः त्यामुळे ह्यास पाहणे सर्वांसाठी स्वीकारार्ह असेल. ह्या मार्गावरील प्रत्येक पाऊल सांप्रदायिकतेपासून पूर्ण मुक्त असले पाहिजे.
आपल्या बद्दलचे सत्य जाणण्यासाठी श्वास हे एक साधन आहे. वास्तविक,अनुभवाच्या स्तरावर,आपण आपल्या शरिराबद्दल खूपच कमी जाणतो. आपणास केवळ त्याचे बाह्य स्वरुप,त्याचे भाग व त्याचे कार्य ज्याच्यावर आपण जाणीवपुर्वक नियंत्रण ठेवू शकतो त्यबद्दलच माहिती असते. जे आपल्या नियंत्रणा बाहेर आहेत अशा अंतर्भागा कडे,ज्या पेशींनी आपले शरीर बनले आहे, आणि ज्या क्षणो क्षणी बदलत असतात त्या बद्दल आपल्यास काहिही माहिती नसते. असंख्य जैव रासायनिक आणि विद्युत चुम्बकीय प्रतिक्रिया पूर्ण शरीरभर सतत होत रहातात, परंतू आपणास त्याचे ज्ञान होत नाही.
ह्या मार्गामुळे, जे स्वतः बद्दल अज्ञात आहे ते ज्ञात व्हायला हवे. ह्याच उद्देशासाठी श्वासाची मदत होइल. कारण की श्वसन हेच शरीराचे एक असे कार्य आहे जे जागरुकता किंवा बेशुध्दी, जाणुनबुजून किंवा स्वाभाविक होऊ शकत असल्यामुळे अज्ञातापासून ज्ञाताकडे जाण्यासाठी एक सेतु म्हणून काम करते.कुणीही सचेत,जाणूनबूजून श्वासाने काम सुरु करतो,आणि प्राकृतिक,सामान्य श्वासाच्या सजगतेपर्यंत पुढे जातो. तेथून स्वतःच्या बद्दलचे सूक्ष्म सत्य जाणुन घेण्यासाठी आणखी पुढे जाल. प्रत्येक पाऊल हे सत्याचे पाऊल असेल;प्रत्येक दिवशी स्वतःबद्दलचे सूक्ष्म सत्य जाणण्यासाठी आणि आपल्या शरीर व मनाचा शोध घेण्यासाठी आपल्याला असेच पुढे विंधीत जावे लागेल.
आज आपल्याला केवळ श्वासाचे निरिक्षण करण्यास सांगितले होते, परंतू त्याच वेळी,आपल्या पैकी प्रत्येकजण मनास देखील पाहात होता, कारण की श्वास निसर्गतःच मानसिक स्थिति बरोबर घट्ट जोडला गेला आहे. जेव्हा मनामध्ये कोणतीही अशुध्दी, विकार उठतो, तेव्हा श्वास अनियमित होतो- कुणीही थोडासा जलद,भारी श्वास घेणे सुरु करतो.जेव्हा विकार निघून जातो,श्वास पुन्हा सौम्य होऊन जातो. ह्या प्रकारे श्वास न केवळ शरीराचा,तरच मनाच्या सत्यतेचा ही शोध घेतो.
मनाची एक सत्यता आहे ज्याचा आपण आजपासून अनुभव घेऊ लागलो, की एकीकडून दुसरी कडे भटकण्याची त्याला संवय आहे. ह्याला श्वासावर किंवा एखाद्या वस्तुवर टिकण्याची संवय नाहीः त्या ऐवजी ते इतस्ततः पळत असते.
आणि जेव्हा ते भटकते,तेव्हा मन कुठे कुठे जाते? अभ्यासानंतर आपण पहाल की ते एकतर भूतकाळामध्ये किंवा भविष्यामध्ये भटकत असते. हा एक मनाच्या संवयीचा नमूना आहे; की ते वर्तमान काळात राहू इच्छित नाही. खरे तर,कुणालाही वर्तमानातच राहिले पाहिजे. जो भूतकाळ आहे तो तर बोलावण्यापलिकडे गेला;जे काही भविष्य आहे ते तर आवाक्याबाहेर आहे, जोपर्यंत ते वर्तमाना मध्ये बदलत नाही. भूतकाळाची आठवण करणे आणि भविष्याचा विचार करणे महत्वाचे आहे, परंतू येथपर्यंतच की त्याचा वर्तमानावर परिणाम होण्यास मदत होइल.तरीसुध्दा त्याच्या अंगभूत स्वभावामुळे मन वर्तमान स्थितीपासून पळ काढण्यासाठी सतत एकतर अप्राप्य अशा भूतकाळामध्ये किंवा भविष्यामध्ये धावते, ह्यामुळेच हे जंगली मन अशांत,दुःखी राहाते. जो साधनाविधी आपण येथे शिकत आहात त्याला जीवन जगण्याची कला असे म्हणतात,आणि असे जीवन वास्तवामध्ये केवळ वर्तमानातच जगायचे असते. म्हणूनच,वर्तमान स्थिति मध्ये कसे जगावे हे शिकण्यासाठी, श्वास जो नाकपूडीतून आंत येतो आणि बाहेर जातो त्यावर मन केंद्रित करणे हे पहिले पाऊल आहे,जरी ते वरवरचे आहे. जेव्हा मन दूर भटकते, तेव्हा कोणत्याही तणावाशिवाय स्मितहास्य करा, हे सत्य समजून की ते आपल्या जुन्या संवयीनुसार भटकत आहे, याचा स्वीकार करा. जेव्हा हे समजेल की मन भटकत आहे,तेव्हा स्वाभाविकपणे आपोआप श्वसनाप्रती सजगता परत येईल.
एकतर भूतकाळ किंवा भविष्यामध्ये रमण्याच्या मनाच्या प्रवृत्तीला आपण सहजगत्या ओळखले आहे. आता हे विचार कोणत्या प्रकारचे आहेत? आज आपण स्वतःच पाहिले की कित्येक वेळा विचार कोणत्याही क्रमाशिवाय, कोणत्याही आगापिछाशिवाय उत्पन्न होतात. ह्या प्रकारचा मानसिक व्यवहार खरेतर वेडेपणाचे लक्षण मानले जाते. आता,तथापि,आपल्या सगळ्यांना समजलेच असेल की आपण वेडेपणाच करत आहोत,अज्ञान,भ्रम भ्रम-मोह,यातच हरवले आहोत. येथपर्यंत की जेव्हा विचारांचा क्रम चालू असतो, तेव्हा त्याचा विषय सुखद किंवा अप्रिय असाच आहे. जर सुखद असेल तर चांगले वाटण्याची प्रतिक्रिया चालू होते ज्याचा विकास आसक्ति,संलग्न-रागामध्ये होतो. जर दुःखद असेल तर अप्रियतेची प्रतिक्रिया होते,ज्याचा विकास द्वेष, घृणा-द्वेष यामध्ये होतो. मन सतत अज्ञान,तॄष्णा, आणि घृणा यानी भरुन जाते. बाकीची सर्व अशुद्धता ह्या तीन प्रारंभिक मूळापासून उत्पन्न होतात आणि प्रत्येक अशुद्धता दुःखाचे कारण बनते.
ह्या तंत्रज्ञानाचे लक्ष्य मनाला शुध्द करुन हळूहळू आतील नकारात्मकता काढून टाकून त्याला दुःखमुक्त करणे आहे. ही स्वतःच्या अचेतन मनाला उघडे पाडून आणि लपून असलेल्या गुंतागुंतीला काढून टाकण्यासाठी एक खोलवरील शस्त्रक्रिया आहे. तंत्राच्या पहिल्या पाऊलाने मनाला शुध्द करायला पाहिजे,आणि ही वस्तुस्थिती आहेःश्वासाकडे पाहून,फक्त मनावरच आपण ध्यान केंद्रित नाही केले, तर त्याला शुध्द करणे सुरु केले. कदाचित काही क्षणच आपले मन श्वासावर पूर्ण केंद्रित झाले असेल, परंतू हा प्रत्येक क्षण मनाच्या सवयीची तऱ्हा बदलण्यासाठी शक्तिशाली आहे. ह्या क्षणी आपल्याला आताच्या सत्याची जाणीव झाली, कोणत्याही भ्रमाशिवाय श्वास नाकपुडीतून येणे किंवा बाहेर जाणे. आणि शिवाय आपल्याला अधिक श्वासाची आसक्ति नसते,किंवा आपल्या श्वासाप्रती द्वेष वाटत नाहीः आपण फक्त कोणत्याही प्रतिक्रियेशिवाय श्वासाचे निरिक्षण करतो. ह्या प्रकारच्या क्षणांमध्ये मन तीन मूलभूत विकारापासून मुक्त आहे,म्हणजेच शुध्द आहे.सचेत स्तरावरील हा शुध्द क्षण जुन्या बेसावधीमूळे जमा झालेल्या विकारांना मोठा धक्का देतो. ह्या सकारात्मक आणि नकारात्मक शक्ती एकमेकांच्या संपर्कात आल्यास स्फोट होतो. ह्यांतील बेहोशीमध्ये लपून राहिलेले विकार/दोष सचेत स्तरावर येतात,आणि विभिन्न मानसिक किंवा शारिरीक अस्वस्थतेच्या रुपात प्रकट होतात.
जेव्हा कुणी अशा परिस्थितीला सामोरा जातो, तेव्हा विक्षुब्ध होणे आणि आपल्या संकटामध्ये वाढ होण्याचा धोका असतो. तथापि,जी एक समस्या आहे असे वाटत होते हा समज वास्तवा मध्ये ध्यानाच्या सफलतेचा संकेत आहे,ही एक गोष्ट दर्शविते की वास्तवामध्ये तंत्राने(विधी) आपले काम सुरु केले आहे.अचेतन मध्ये शस्त्रक्रिया चालू झाली आहे, आणि तेथे लपून बसलेला पू जखमेमधून बाहेर येणे चालू झाले आहे.जरी ही प्रक्रिया अप्रिय आहे,तरी हा एकच रस्ता पू पासून सुटकारा मिळण्यासाठी, अशुध्दि दूर करण्यासाठी आहे.कुणीही जर योग्य प्रकारे काम करणे चालू ठेवेल,ह्या सर्व प्रकारची संकटे हळू हळू कमी होतील. उद्या थोडे सोपे जाइल,पुढल्या दिवसांपासून अधिक अधिक सोपे होत जाइल.हळू हळू, जर आपण काम करीत राहिलात तर सर्व समस्या समाप्त होतील.
कुणीही आपल्यासाठी काम करु शकत नाही;आपण स्वतःच हे काम केले पाहिजे. आपल्या मध्ये आंत असलेल्या सत्याचा शोध करायला हवा. आपणाला स्वतःच मुक्त व्हायला हवे.
कसे काम करावे ह्या बद्दल काही सल्ला:
ध्यानाच्या तासादरम्यान, चार भिंतीआडच ध्यान करावे.जर आपण बाहेर उघड्यावर प्रकाश आणि हवेच्या संपर्कात ध्यान करण्याचा प्रयत्न कराल, तर आपण आपल्या मनाच्या खोलवर शिरकाव करु शकणार नाही.विश्रांतीच्या वेळी आपण बाहेर जाऊ शकाल.
आपल्यास शिबीर स्थानाच्या सीमेच्या आंतच रहायला हवे.आपण आपल्या मनावर शस्त्रक्रिया करत आहात;ह्या मुळे शस्त्रक्रियेच्या खोलीतच रहायला हवे.
शिबीराच्या पूर्ण कालावधी पर्यंत,कितीही कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला तरीही रहाण्याचा संकल्प करावा.जेव्हा शस्त्रक्रिया चालू असताना संकटे उत्पन्न होतील तेव्हा ह्या संकल्पाची आठवण करावी.शिबीर मध्येच सोडून जाणे हानिकारक आहे.
ह्या प्रकारे,सर्व अनुशासन आणि नियम,ज्या मध्ये सर्वांत महत्वपूर्ण नियम मौनाचा आहे त्यांचे पालन करण्याचा मजबूत दृढ संकल्प करा. ह्या शिवाय वेळापत्रकाचे पालन,विशेषतः प्रत्येक दिवसांतील तीन तासाच्या समूहिक ध्यानाची बैठक हॉल मध्ये करण्याचा संकल्प करा.
अती खाण्याच्या धोक्या पासून वाचवा,आपण पेंगण्याची शिकार बनू नका,आणि अनावश्यक बोलू नका.
जसे सांगितले जाते त्याप्रकारेच काम करावे.कोणत्याही निंदेशिवाय,ह्या शिबीराच्या कालावधीपर्यंत काहीही आपण वाचले असल्यास किंवा शिकले असाल तर त्यास एकाबाजूस ठेवा. तंत्राची सरमिसळ करणे अतिशय घातक आहे.जर एखादा मुद्दा आपल्यास स्पष्ट समजत नसेल तर स्पष्टिकरणासाठी मार्गदर्शकाना भेटावे. परंतू ह्या विद्येला एक निःष्पक्ष न्याय द्यावा;जर आपण असे केले तर आपल्यास अद्भुत परिणाम प्राप्त होतील.
तृष्णा,घृणा,भ्रमाच्या बंधनापासून सुटका मिळण्यासाठी,आणि खरी शांती,खरा सद्भाव,खरा आनंद मिळण्यासाठी वेळेचा,संधीचा व तंत्राचा सर्वांत चांगला उपयोग करा.
आपणा सर्वास खरी सुख-शांती मिळो.
सर्व प्राणी सुखी होवोत.