विपश्यना
सत्यनारायण गोएंका द्वारा जशी शिकविली जाते
साधना
आचार्य गोयन्काजी द्वारा शिकविली जाणारी विपश्यना साधना
विपश्यना साधना
सत्यनारायण गोएंका द्वारा जशी शिकविली जाते
आचार्य गोयन्काजी द्वारा शिकविली जाणारी विपश्यना साधना
दहाव्या दिवसाचे प्रवचन
Review of the technique (तंत्राचे पुनर्वलोकन)
दहा दिवस पूर्ण झाले. आपण पुनरावलोकन करु की ह्या दहा दिवसांत आपण काय केले.आपण तीन रत्नांना म्हणजेच बुध्द,धम्म,आणि संघाला शरण जाऊन आपले काम सुरु केले.असे करून तुम्ही एका संघटित धर्मामधून दुसऱ्या धर्मामध्ये रुपांतरित होत नाही. विपश्यनामध्ये रुपांतर केवळ दु:खापासून आनंद, अज्ञानापासून ज्ञान आणि बंधनापासून मुक्तीमध्ये होते. संपूर्ण शिकवण सार्वत्रिक आहे. आपण एक व्यक्तित्व, कठोर धार्मिकता,किंवा संप्रदाय यांचा आश्रय घेतला नाही तर ज्ञानाच्या गुणवत्तेला शरण गेलो.जो कोणी मुक्तीचा रस्ता शोधून काढतो तो बुध्द असतो.ह्या शोधलेल्या रस्त्याला धम्म म्हटले जाते. जे सर्व ह्या प्रकारचा अभ्यास करतात आणि संतपदावर पोहोचतात त्याला संघ म्हटले जाते. अशा व्यक्तिपासून प्रेरणा घेऊन, एक व्यक्ति मनाच्या पवित्रतेचे एकच लक्ष प्राप्त करण्यासाठी, बुध्द,धम्म आणि संघाला शरण जातो. हे शरण वास्तविकतः ज्ञानाची सार्वत्रिक गुणवत्ता जी आपल्यामध्ये विकसित करु पाहातो त्या गुणवत्तेपाशी आहे.
त्याच वेळेस,एखाद्या व्यक्तिने ह्या मार्गावर प्रगती केल्यास त्या व्यक्तिप्रती आदरभावाची भावना उत्पन्न होऊन कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता दुसऱ्यांची सेवा करण्याची इच्छा उत्पन्न होइल. हे दोन गुण सिद्धार्थ गौतम, ऐतिहासिक बुद्ध यामध्ये उल्लेखनीय होते. त्यांनी आपल्या स्वतःच्या प्रयत्नानी संपूर्ण ज्ञान प्राप्त केले होते. तरीसुध्दा, सर्व प्राणीमात्राप्रति असलेल्या करूणेमुळे, त्यांनी शोधून काढलेले हे तंत्र दुसऱ्याना शिकविले.
जे सर्व ह्या तंत्राचा अभ्यास आणि काही मर्यादेपर्यंत,अहंकाराच्या जुन्या सवयींचे निर्मूलन करतात त्यांच्यामध्ये सारखेच गुण दिसतात. वास्तवास शरण, खरी सुरक्षा, हाच धम्म आहे जो आपण आपल्यामध्ये विकसित करत आहात. तथापि धम्माच्या अनुभवाबरोबर तो शोधून काढणे आणि ह्या तंत्राला शिकविण्याबद्दल गौतम बुध्द यांच्यासाठी आणि ज्यांनी निःस्वार्थपणे पंचविसशे वर्षे आपल्या मूळ शिक्षणाची पवित्रता आतापर्यंत कायम ठेवून शिकवण चालू ठेवली त्यांच्या प्रती कृतज्ञतेची भावना वाढीस लागणे स्वाभाविक आहे.
ह्या समजाबरोबर तीन रत्नाला आपण शरण गेलात.
ह्या नंतर आपण पाच नियमांचा उपदेश घेतला. हे काही कोणते विधी किंवा कर्मकांड नव्हते. हे नियम स्विकारण्याने आणि पालन करण्याने आपण sīlaशील, नैतिकतेचा अभ्यास करत आहात,जो ह्या तंत्राचा पाया आहे. एका मजबूत पायाशिवाय ध्यानाची बांधणी कमजोर होईल.Sīla शीलसुद्धा सार्वजनीन आणि असांप्रदायिक आहेत. आपण अशा सर्व कामांपासून, शारीरिक किंवा मौखिक, जी दुसऱ्यांची शांती आणि सद्भाव यामध्ये बाधा आणतात त्यापासून दूर राहाण्याचे वचन दिले आहे. जो ह्या उपदेशाचा भंग करेल, त्याला प्रथम आपली शांती व सद्भाव नष्ट करुनच मनामध्ये पुष्कळ अशुद्धी विकसित करावी लागेल. अशुद्धी मनाच्या स्तरावर विकसित होते आणि शब्दातून किंवा शरीराद्वारे व्यक्त होते. विपश्यनेमध्ये आपण मन शुद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो, इतका की मन वास्तवामध्ये शांत आणि शांतिपूर्ण होऊन जाईल. आपण मनाला शुद्ध करण्याचे काम तोपर्यंत करू शकत नाही, जोपर्यंत आपण असे काम करत आहात ज्यामध्ये अशांती आणि अशुद्धतेचे प्रदर्शन चालू असेल.
परंतू आपण हे दुष्चक्र कसे तोडू शकाल, जर अशांत मन प्रतिकूल काम करीत असेल आणि पुढेदेखील अशांत करीत असेल? विपश्यना शिबीर आपल्याला एक संधी देते. व्यस्त कार्यक्रमामुळे, दृढ शिस्तीमुळे, मौनाचे पालन आणि प्रबळ साहाय्यक वातावरण, ह्यांच्यामुळे क्वचितच आपल्याकडून नियमांचा भंग होण्याची शक्यता असेल. ह्या प्रकारे दहा दिवसादरम्यान आपण sīla शीलाचा अभ्यास करण्यासाठी सक्षम होतो, आणि ह्याचा आधार घेऊन आपण samādhiसमाधि विकसित करू शकतो; आणि हीच पुढे आधार बनते अंतर्दृष्टिसाठी, ज्याच्या सोबतीने आपण मनात खोलवर उतरुन मनास शुद्ध करू शकतो.
हे तंत्र शिकण्यासाठी, शिबिरादरम्यान आपण पाच नियमांचे(शीलांचे) पालन करण्याचे वचन दिले. हे शिकल्यानंतर, धम्माचा स्विकार व अभ्यास करण्याचा निर्णय जो घेतो, त्याने जीवनभर नियमांचे(शीलांचे) पालन करणे आवश्यक आहे.
नंतर आपण शिबीराच्या दहा दिवसांसाठी बुध्द आणि वर्तमान आचार्यांप्रती आत्मसमर्पण केले. हे आत्मसमर्पण तंत्राला योग्य न्याय मिळण्याच्या उद्देशाने केले गेले होते.जो कुणी अशा प्रकारे आत्मसमर्पण करतो, तो पुढे पूर्ण प्रयासाने काम करतो. जर आपल्यास संदेह असेल आणि विश्वास नसेल तर आपण ठीक प्रकारे काम करु शकणार नाही. तथापि, आत्मसमर्पण म्हणजे आंधळा विश्वास निर्माण करणे नाही; ह्याचे धम्माशी काहीही देणे घेणे नाही. जर आपल्यास काही शंका उत्पन्न झाली असेल तर आपणास स्पष्टीकरणासाठी कितीही वेळा आचार्यांना भेटण्यास प्रोत्साहित केले जाते.
आत्मसमर्पण अनुशासन आणि शिबीराच्या वेळापत्रकासाठी सुध्दा होते. ह्याची रुपरेखा, पूर्वीच्या हजारो साधकांच्या अनुभवाच्या आधारावर,आपणास सतत काम करुन ह्या दहा दिवसांचा पूर्ण लाभ मिळावा यासाठी केली गेली आहे.
समर्पण केल्याने आपण जसे सांगितले जाते तसेच काम करण्याची ग्वाही देता. इतर कोणत्याही तंत्राचा आपण पूर्वी अभ्यास करत असाल तर तो ह्या अभ्यासक्रमाच्या कालावधी पर्यंत बाजूस ठेवायला सांगितले होते.आपणास मिळणारा लाभ तसेच ह्या तंत्राचे मूल्यमापन केवळ ह्या तंत्राचा विशेष प्रकारे अभ्यास,उचित प्रकारे केल्यानेच होतो. त्यांत इतर तंत्राचे मिश्रण केल्यामुळे गंभीर समस्या उत्पन्न होऊ शकतात.
त्यानंतर आपण मनावर स्वामित्व आणि एकाग्रता यांचा विकास करण्यासाठी आनापानचा अभ्यास चालू केला--- samādhi(समाधि). आपणास कोणताही शब्द,आकार किंवा आकृति जोडल्याशिवाय, केवळ स्वाभाविक(नैसर्गिक) श्वासाचे निरिक्षण करण्यास सांगितले गेले होते. ह्या प्रतिबंधाचे कारण म्हणजे ह्या तंत्राची सार्वजनिकता अबाधित ठेवणेः श्वास हा सर्वसाधारण आहे आणि सर्वांना स्विकारार्ह आहे, परंतू एक शब्द किंवा आकृति काही जणांना स्विकारार्ह असेल पण दुसऱ्यांना नाही.
परंतू शुध्द श्वासाच्या अवलोकनासाठी आणखी एक महत्वपूर्ण कारण आहे. स्वतः बद्दलचे सत्य,मानसिक--शारिरिक रचनेबद्दल जाणण्याची ही प्रक्रिया आहे. जसे आहे तसेच, आपल्याला हवे आहे तसे नव्हे,अशाचा हा एक शोध आहे. हा एक सत्याचा शोध आहे.आपण खाली बसा आणि आपले डोळे बंद करुन घ्या.त्या वेळी नसेल आवाज, नाही बाहेरचा गोंगाट,नाही शरीराची हालचाल. ह्या क्षणी आपल्यामध्ये सर्वात प्रमुख गतिविधी असते ती म्हणजे श्वास. आपण ह्या वास्तविकतेला पाहाणे सुरु करतोः सहज स्वाभाविक(नैसर्गिक) श्वास, जसा तो येतो आणि नाकपुडीमधून बाहेर जातो तसा. जर आपल्याला श्वास जाणवला नाही, तर फक्त आपले लक्ष नाकपुडीच्या द्वाराजवळील क्षेत्रामध्ये केंद्रित करुन जोराने श्वास घेउन तो श्वास जाणवल्यावर परत एकदा सहज स्वाभाविक(नैसर्गिक),साधारण,मृदु श्वासावर येण्याची परवानगी आहे.आपण एका स्थूल प्रकट सत्याद्वारे काम चालू केले. आणि ह्यानंतर आपण स्थूल, सूक्ष्म सत्याच्या दिशेने, परम सत्यासाठी पुढे गेलात.पूर्ण मार्गावर,प्रत्येक पावलागणिक, आपण वास्तविक अनुभवा बरोबर स्थूल पासून सूक्ष्मते पर्यंत सत्या बरोबरच राहिलात. आपण कल्पने द्वारे परम सत्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. आपण केवळ अधिक अधिक कल्पना शक्ति, स्व-धोक्यांत फसाल.
आपण श्वासाबरोबर एखादा शब्द जोडला तर आपण कदाचित अधिक जलद ध्यान केंद्रित करु शकला असता. परंतू असे करण्यात धोका उत्पन्न झाला असता. प्रत्येक शब्दामध्ये एक विशिष्ट कंपन आहे. एकच शब्द किंवा वाक्यांश पुन्हा पुन्हा म्हणण्याने एक कृत्रिम कंपन उत्पन्न होते, ज्यामध्ये आपण घेरले जातो. मनाच्या पृष्ठभागावर शांती आणि सद्भाव निर्माण होतो ही कदाचित, परंतू खोलवर अशुद्धी राहातेच.केवळ ह्या खोल दडलेल्या दोषांपासून मुक्त होण्यासाठी त्यांचे निरिक्षण करणे,त्याना पृष्ठभागावर आणून काढून टाकण्यास शिकणे हाच एकमात्र मार्ग आहे. केवळ विशेष कृत्रिम कंपन पाहिले, तर दोषांशी संबंधित विभिन्न नैसर्गिक कंपनाचे निरिक्षण करु शकणार नाही. म्हणजेच, शरीराच्या आतील स्वाभाविकपणे उत्पन्न होणाऱ्या संवेदनांचे निरिक्षण करण्यास सक्षम राहाणार नाही. म्हणूनच, स्वतः बद्दलचे सत्य जाणणे आणि मनाला शुद्ध करणे हाच एक उद्देश असेल, तर एखाद्या काल्पनिक शब्दाचा उपयोग करण्याने बाधा उत्पन्न होईल.
तसेच काल्पनिक दृष्य--आकार किंवा आकृतीचे मानसिक चित्र--हे प्रगतीमध्ये बाधा आणू शकते. हे तंत्र परम सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी भासमान सत्यास वितळवून टाकण्याचा मार्ग दाखविते. भासमान,संकलित सत्य नेहमीच भ्रामक असते कारण की,ह्या स्तरावर saññā(संज्ञा) संचालित होते, अनुभुती, जी पूर्वीच्या प्रतिक्रियेमुळे विकृत आहे, ही पसंती आणि पूर्वग्रहांनी भरलेली स्थापित अनुभुती पक्षपात आणि भेदभाव करून नवीन प्रतिक्रियांना जन्म देते. परंतु ह्या भासमान सत्याचे तुकडे तुकडे करुन, साधक हळूहळू मानसिक-शारीरिक संरचनेच्या अंतिम वास्तविकतेचा अनुभव करतोः प्रत्येक क्षणी उत्पन्न आणि नष्ट होणाऱ्या संवेदनेशिवाय काहीही नाही. ह्या स्तरावर कोणताही भेदभाव संभव नाही आणि म्हणूनच इथे ना कोणती पसंती किंवा पूर्वग्रह उत्पन्न होते, न कोणतीही प्रतिक्रिया. हे तंत्र हळूहळू पूर्वस्थापित saññā संज्ञेला क्षीण करते आणि अनुभुती व संवेदना समाप्त करणाऱ्या स्थितीपर्यंत घेऊन जाते, म्हणजेच nibbāna निर्वाणिक अनुभव. परंतु जाणुनबुजून एखादा काही आकार,आकृती, किंवा दृष्टीकडे ध्यान देऊन भासमान,रचित स्पष्टतेपर्यंत थांबतो आणि त्या पुढे तो जाऊ शकत नाही. ह्यामुळेच इथे कल्पना आणि शब्दांची पुनरावृत्ती नको.
सहज स्वाभाविक(नैसर्गिक) श्वासाकडे मन केंद्रित केल्यावर,आपण paññā(पन्ना)--प्रज्ञा ला विकसित करण्यासाठी विपश्यना ध्यानाचा अभ्यास सुरु केला. ही आपलीच नैसर्गिक अंतर्दृष्टि आहे, जी मनाला शुद्ध करते. दोक्यापासून पायापर्यंत, आपण शरीराच्या आतील नैसर्गिक संवेदना पाहाणे चालू केले,बाहेरुन सुरु करुन आंत जाता जाता,शरीराच्या आतील आणि बाहेरील प्रत्येक भागाची संवेदना जाणणे शिकलात.
भासमान सत्याला विघटित करणे आणि परम सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय वास्तविकतेचे अवलोकन- हीच विपश्यना आहे. भासमान सत्याला विघटित करण्याचा उद्देश्य “ मी ” च्या भ्रमातून बाहेर पडण्यासाठी ध्यान करणाऱ्याला सक्षम करतो. हाच भ्रम आमच्या राग(आसक्ति) आणि द्वेष ह्यांचे मूळ आहे,आणि हाच आम्हाला महान दुःखाकडे घेऊन जातो. कोणीही बौध्दिक विचार करु शकतो की हा एक भ्रम आहे, परंतू ही स्विकृती प्रत्यक्ष दुःख दूर करण्यासाठी पुरेशी नाही. धार्मिक किंवा दार्शनिक मान्यतेकडे दुर्लक्ष करुन सुध्दा, पुष्कळ वेळ अहंकार असल्यामुळे एखादा दुःखीच राहातो. ही संवय काढून टाकण्यासाठी आपण सरळपणे, कुणाच्याही नियंत्रणाबाहेर सतत बदलणाऱ्या मानसिक-शारीरिक घटनेच्या अवास्तविक प्रकृतिचा अनुभव घेतला पाहिजे.हाच एकमात्र अनुभव अहंकाराचा भंग करु शकतो ज्यामुळे दुःखापासून मुक्त होण्यासाठी आणि राग(आसक्ति) व द्वेष या पासून सुटकेचा रस्ता दिसतो.
प्रत्यक्ष अनुभवाने, " मी,माझे" च्या वास्तविक प्रकृतीचा प्रपंच दाखविणे हेच ह्या तंत्राचे शोधन आहे. ह्या घटनेच्या दोन बाजू आहेतः एक शारीरिक व मानसिक, दुसरी शरीर आणि मन. शरीराच्या वास्तविकतेला पाहात ध्यान करणारा आपले कार्य सुरू करतो. ह्या वास्तविकतेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी, त्याला शरीर जाणवले पाहिजे,म्हणजेच शरीरामध्ये होणाऱ्या संवेदनेबद्दल त्याला सचेत राहिले पाहिजे. ह्या प्रकारे शरीराचे अवलोकन-- kāyānupassanā कायानुपश्यना- मध्ये संवेदनेचे अवलोकन समाविष्ट आहे vedanānupassanāवेदनानुपश्यना .ह्या प्रकारेच आपल्या मनामध्ये काय उत्पन्न होते हे पाहिल्याशिवाय आपण मनाच्या सत्यतेचा अनुभव करु शकत नाही. ह्या प्रकारे,मनाचे अवलोकन--cittānupassanāचित्तानुपश्यना- -ह्या मध्ये मानसिक अंतर्भागाचे अवलोकन करणे आवश्यक आहे --dhammānupassanāधम्मानुपश्यना.
ह्याचा अर्थ हा नाही की एखाद्या व्यक्तिने विचारांकडे लक्ष दिले पाहिजे. जर आपण असे करण्याचा प्रयत्न केला, तर आपण विचारांतच गुरफटत जाऊ. आपल्याला ह्या क्षणी फक्त मनाच्या स्वाभाविक स्वरुपाबद्दल जाणीव राहिली पाहिजे; येथे तृष्णा, द्वेष, अज्ञान, आणि अशांतिचा उद्भव आहे किंवा नाही. बुध्दाने शोधले की, जे काही मनामध्ये उत्पन्न होते, ते शारीरिक संवेदनेबरोबरच जोडलेले असते. ह्यामुळे जेव्हा ध्यानस्थ “मी” च्या शारीरिक आणि मानसिक अवस्थेचा शोध घेत असेल,त्यावेळी त्याला संवदनेची जाणीव असणे आवश्यक आहे.
हा शोध म्हणजे बुध्दाचे अद्वितीय योगदान आहे, ज्याचे त्यांच्या शिकवणीमध्ये मध्यवर्ती महत्त्व आहे. त्यांच्या पूर्वी भारतामध्ये आणि त्यांचे समकालीन पुष्कळजण होते जे sīlaआणि samādhi (शील आणि समाधि) शिकवित आणि त्याचा अभ्यास करवीत. paññā(प्रज्ञा) चे अस्तित्वदेखील होते, किमान भक्ति व बौद्धिक ज्ञानामध्येः हे साधारणतः सर्वांनी स्विकारले होते की मानसिक दोष हा दुःखाचा मुख्य स्रोत आहे, आणि मन शुद्ध करण्यासाठी आणि मुक्ती मिळवण्यासाठी राग(आसक्ति) आणि द्वेष समाप्त केले पाहिजेत. बस, बुद्धाने हेच करण्याचा रस्ता शोधून काढला.
ह्यामध्ये एक त्रुटी होती, ती म्हणजे संवेदनेच्या महत्त्वाची जाणीव. तोपर्यंत सर्वसाधारणतः हा समज होता की प्रतिक्रिया ही बाह्य वस्तूमुळे होते--- दृष्टी, ध्वनी, गंध, स्वाद, स्पर्श, विचार इत्यादि. परंतु, आपल्या आत सत्याचे अवलोकन केल्यावर समजते की वस्तू आणि प्रतिक्रिया ह्या दरम्यानची एक कडी सुटली आहेः संवेदना. एक वस्तू आणि त्याच्याशी संबंधित इंद्रिय ह्यांचा संपर्क होतो तेव्हा संवेदना उत्पन्न होते; saññā(संज्ञा) संवेदना सुखद किंवा दुःखद वाटते. त्या अनुसार त्या वस्तूचे सकारात्मक किंवा नकारात्मक मुल्यांकन केले जाते, त्याच बरोबर राग(आसक्ती) किंवा द्वेष ह्यांची प्रतिक्रिया निर्माण होते. ही प्रक्रिया इतकी जलद होते की प्रतिक्रिया परत परत होत राहिल्यानंतर आणि मनाला ताब्यात आणावे लागण्याइतकी भयंकर शक्ती संगठीत झाल्यानंतरच त्या बाबतीत जागरुकता उत्पन्न होते. प्रतिक्रियांबरोबर व्यवहार करण्यासाठी जेथे ह्या प्रतिक्रियेस कुठे सुरुवात होते हे अवगत झाले पाहिजे; ह्या प्रतिक्रिया संवेदनेबरोबर सुरू होतात, आणि म्हणूनच संवेदनेबद्दल जाणीव हवी. ह्या तथ्याचा शोध त्यांच्या पूर्वी अज्ञात होता. सिध्दार्थ गौतम ह्यांनी त्याचे संपूर्ण ज्ञान प्राप्त केले, आणि त्या कारणामुळे त्यांनी नेहमीच संवेदनेच्या महत्त्वावर भर दिला. संवेदना राग(आसक्ति) आणि द्वेष ह्यांच्या प्रतिक्रिया आणि त्यातून दुःखापर्यंत घेऊन जाऊ शकतात , परंतु संवेदना ह्या ज्ञानापर्यंतही घेऊन जातात ज्यामुळे प्रतिक्रिया होणे थांबून दुःखमुक्ती सुरू होते.
विपश्यनेमध्ये, संवदनेला जाणण्यामध्ये हस्तक्षेप करणारी कोणतीही दुसरी प्रथा हानिकारक आहे, जसे की एखादा शब्द किंवा एखाद्या आकृतिवर ध्यान केंद्रित करणे, शारिरीक हालचालीवर ध्यान देणे किंवा मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या विचारांकडे लक्ष देणे. जोपर्यंत दुःखाचा स्त्रोत,म्हणजे संवेदनेपर्यंत आपण जाणार नाही तो पर्यंत त्या दुःखाचे निर्मूलन होणार नाही.
विपश्यनेचे तंत्र Satipaṭṭhāna Suttaसतिपठ्ठानसुत्त , "जागरूकताच्या सिद्धतेवर प्रवचन" मध्ये बुद्धाने समजावून सांगितले आहे. ह्या प्रवचनामध्ये तंत्राच्या विभिन्न अवस्थेची विभागणी विविध भागामध्ये केली आहे;शरीर,संवेदना,मन,आणि मानसिक संतुष्टतेचे अवलोकन. तरीसुद्धा प्रवचनाचा प्रत्येक भाग किंवा उपविभाग एकाच शब्दाने समाप्त होतो. अभ्यास सुरू तर विविध बिंदूपासून होऊ शकतो,परंतु प्रारंभिक बिंदू कोणताही असला तरी ध्यानस्थाला अंतिम लक्ष्याच्या मार्गावर काही स्टेशनावरून,काही अनुभव घेऊन पुढे जावे लागते. हे अनुभव विपश्यनेच्या अभ्यासासाठी आवश्यक आहेत,आणि प्रत्येक विभागाच्या समाप्तीनंतर ह्याच वाक्याची पुनरुक्ती आहे.
पहिले असे स्टेशन आहे की ध्यान करणाऱ्यास (samudaya) समुदय उत्पन्न होणारी आणि नष्ट होणाऱ्या (vaya)व्यय अनुभवाला सामोरे जावे लागते.ह्या अवस्थेमध्ये शरीरांतील एकत्रित,संकलित सत्याचा स्थूल संवदनांच्या रुपात ध्यानस्थाला अनुभव घ्यावा लागतो.एकास संवदनेची अनुभूती होते,कदाचित उत्पन्न होणारी शारिरीक पीडा. काही वेळ ती राहाते आणि अखेरीस ती निघून जाते.
ह्या स्टेशनापासून पुढे जात, साधक samudaya-vaya समुदय-व्यय ह्या स्थितीत प्रवेश करतो, ज्यामध्ये कोणत्याही अंतराशिवाय उत्पन्न होणाऱ्या आणि नष्ट होणाऱ्या संवदनांना तो एकाच वेळेस अनुभवतो. स्थूल,एकत्रित संवेदना सूक्ष्म कंपनांमध्ये बदलून जाते,उत्पन्न होते आणि जलद गतीने संपते, आणि मानसिक-शारीरिक रचनेची दृढता गायब होते. स्थूल, तीव्र भावना आणि स्थूल तीव्र संवेदना ह्या दोन्ही फक्त तरंगामध्येच बदलतात. ही स्थिति आहे bhanga(भंग) विघटन ची- ज्या मध्ये कुणालाही मन आणि शरीराच्या परम सत्याचा अनुभव सतत उत्पन्न होणाऱ्या आणि नष्ट होणाऱ्या कोणत्याही घनतेशिवाय येतो.
ह्या मार्गावर bhanga(भंग) एक महत्त्वपूर्ण स्टेशन आहे, कारण की जेव्हा कुणीही मानसिक-शारीरिक संरचनेच्या विघटनेचा अनुभव करतो तेव्हाच त्याप्रती असणारी त्याची आसक्ती तुटते. त्या नंतर तो कोणत्याही स्थितीमध्ये अनासक्त राहातो. म्हणजेच saṅkhārā-upekkhā संस्कार-उपेख्खाच्या- टप्प्यावर प्रवेश करतो. खोलवर पडून असलेले दोष-- saṅkhārāसंस्कार--सुप्त दबून असलेले आता मनाच्या वरील स्तरावर प्रदर्शित होऊ लागतात. हे एक प्रतिगमन नाही; जोपर्यंत ते वर येत नाहीत तोपर्यंत दोष निघणार नाहीत म्हणजेच ही प्रगती आहे. ते उत्पन्न होतात, त्याकडे समतेने पाहिल्यास ते एका पाठोपाठ समाप्त होतात. कुणीही ह्या स्थूल अप्रिय अनुभूतीचा उपयोग एक हत्यार म्हणून करुन आपल्या जुन्या द्वेषाचा साठा saṅkhārā(संस्कार) काढण्यासाठी करतो, कुणी एक सूक्ष्म सुखद अनुभूतीचा उपयोग एक हत्यार म्हणून करुन आपल्या जुन्या राग(आसक्ति) चा साठाsaṅkhārā(संस्कार) काढण्यासाठी करतो, ह्या प्रकारे प्रत्येक अनुभवाप्रती जागरुकता आणि समता ठेवत, एखादा मनाला शुद्ध करीत nibbāna (निब्बाण) म्हणजे मुक्तिच्या लक्ष्याकडे जवळ आणि अधिक जवळ पोहोचतो.
प्रारंभिक स्थान कोणतेही असले तरी, कुणालाही nibbāna(निब्बाण) पर्यंत पोहोचण्यासाठी ह्या सर्व स्टेशनामधून जावे लागते. कुणीही ह्या लक्ष्यापर्यंत किती लवकर पोहोचू शकतो हे तो किती काम करतो आणि किती मोठा जुन्या saṅkhārā(संखारा) संग्रहाचे निर्मूलन करायचे आहे ह्यावर अवलंबून आहे.
प्रत्येक बाबतीत, तथापि, प्रत्येक स्थितीमध्ये, संवेदनेकडे पाहात राहून समता ठेवणे आवश्यक आहे. Saṅkhārā(सखारा) संस्कार शारीरिक संवेदनेच्या रुपात उत्पन्न होतात, आणि संवेदनेप्रती समता ठेवूनच आपण नव्या Saṅkhārā संस्काराना उत्पन्न होण्यापासून थांबवितो, आणि आपण जूने संस्कार समाप्त करतो. ह्याप्रकारे संवेदने कडे समतेने पाहात, आपण दुःखापासून हळू-ह्ळू मुक्तिच्या अंतिम लक्ष्याच्या दिशेने प्रगती करतो.
गंभीरता पूर्वक काम करा. ध्यान म्हणजे खेळ बनवू नका.कोणत्याही तंत्राच्या दृढ अनुसरणाशिवाय एका पाठोपाठ एक तंत्राचा उपयोग करु नका. जर आपण असे केले, तर आपण कोणत्याही तंत्राच्या प्रारंभिक अवस्थेच्या पलिकडे जाऊ शकणार नाही,आणि म्हणूनच आपण अंतिम लक्ष्याकडे कधीही पोहोचू शकणार नाही. निश्चितच आपण आपल्यास योग्य असलेल्या तंत्राच्या शोधासाठी विभिन्न तंत्रांचे परिक्षण करु शकता. आवश्यकता असल्यास, ह्या तंत्रास आपण दोन किंवा तीन वेळा पारखू शकता.परंतू एकदा योग्यता पारखल्यानंतर,केवळ त्यातच आपले आयुष्य व्यर्थ घालवू नका. एकदा एखादे तंत्र आपल्यास योग्य वाटले तर, त्यावर गंभीरतापूर्ण इतके काम करा की आपण अंतीम लक्ष्याकडे प्रगती करू शकाल.
प्रत्येक ठिकाणच्या दुःखी लोकांना आपल्या दुःखातून बाहेर येण्याचा मार्ग मिळो.
सर्वांचे मंगल होवो!(सर्व प्राणी सुखी होवोत)