विपश्यना
सत्यनारायण गोएंका द्वारा जशी शिकविली जाते
साधना
आचार्य गोयन्काजी द्वारा शिकविली जाणारी विपश्यना साधना
विपश्यना साधना
सत्यनारायण गोएंका द्वारा जशी शिकविली जाते
आचार्य गोयन्काजी द्वारा शिकविली जाणारी विपश्यना साधना
दुसऱ्या दिवसाचे प्रवचन
पाप आणि पुण्य याची सार्वभौम परिभाषा - अष्टांग आर्य मार्गः शील आणि समाधी
दुसरा दिवस समाप्त झाला.जरी हा पहिल्या दिवसाच्या तुलनेत थोडा चांगला होता,तरी त्रास अद्याप चालू आहे.मन इतके बेचैन,अशांत,जंगली,एका जंगली सांड किंवा हत्ती जो मानव वस्ती मध्ये प्रवेश करुन जो अनर्थ करतो त्या प्रमाणे आहे. एक बुद्धिमान व्यक्ती जंगली पशुला पाळीव आणि प्रशिक्षित करतो,त्यानंतर आपली सारी शक्ती, जी विनाशासाठी वापरली जात होती,ती आता समाजाच्या रचनात्मक कार्यासाठी वापरु लागतो. ह्या प्रकारे मन जे एका जंगली हत्ती पेक्षा काहीसे अधिकच शक्तिशाली आणि धोकेबाज आहे,त्याला शांत आणि प्रशिक्षित केले पाहिजे; त्यानंतर आपली अतिविशाल शक्ती आपली सेवा करण्यास सूरुवात करतो.परंतू आपल्यास पुष्कळच धीराने,दृढतापुर्वक,आणि सतत काम केले पाहिजे. अभ्यासाची निरंतरताच सफलतेची किल्ली आहे.
आपल्याला स्वतःच हे काम करावे लागेल;दुसरा कुणीही आपल्यासाठी हे काम करु शकणार नाही.प्रेम आणि करुणेने प्रबुध्द व्यक्ति काम करण्याचा रस्ता दाखवून देतो,परंतू तो अंतीम लक्ष्यापर्यंत आपल्या खांद्यावर कुणालाही घेवून जाऊ शकत नाही. पाऊल आपल्यालाच उचलावे लागेल,आपली लढाई आपल्यालाच लढावी लागेल,स्वतःची मुक्ति स्वतःच साधा.अर्थातच एकदा आपण काम सुरु केले की आपल्यास सर्व धम्म तरंगांची मदत मिळु लागेल,परंतू तरी सुध्दा आपल्याला स्वतःच आपले काम करावे लागेल. पुर्ण रस्ता आपल्यालाच चालावा लागेल.
ज्या रस्त्यावर आपण चालणे सुरु केले आहे तो कोणता आहे ते समजून घ्या. बुध्दानी अगदी सरळ शब्दांमध्ये त्याचे वर्णन केले आहेः
सर्व पापकर्म, अहितकारक काम वर्ज करा
केवळ मंगल हितकारक काम करा
मनाला शुद्ध करा;
हीच प्रबुद्ध(ज्ञानी) लोकांची शिकवण आहे.
हा एक सार्वजनिक मार्ग,कोणत्याही पार्श्वभूमी, जाति किंवा देशांच्या लोकांसाठी स्वीकारार्ह आहे.परंतू पाप आणि पुण्याची परिभाषा करण्या मध्ये समस्या येतात.जेव्हा धर्माचा सार हरवतो,तेव्हा एक संप्रदाय बनून जातो,आणि तेव्हा प्रत्येक संप्रदाय धार्मिकतेस एक वेगळीच परिभाषा देतातजसे की एक प्रकारचा बाहेरील देखावा किंवा कर्मकांड करणे,किंवा विशेष दार्शनीक मान्यता. ह्या सर्व सांप्रदायिक परिभाषा आहेत,ज्या काही लोकांना स्वीकारार्ह असतील आणि दुसऱ्याना नसतील.तथापि धम्म पाप आणि पुण्याची एक सर्वमान्य परिभाषा देतो. कोणतेही कार्य ज्या मुळे दुसऱ्यांना हानि पोहोचते त्यांची सुख-शांती आणि एकतेचा भंग करते ते पाप,अहितकारक कार्य आहे. ज्या कामामुळे दुसऱ्यांना मदत होते,ज्यामुळे त्यांच्या सुख-शांती आणि एकतेसाठी योगदान देत असते,ते एक पवित्र, हितकारक कार्य आहे. ह्या अनुसार ते कोणत्याही सिध्दांतावर आधारित नाही,परंतू ती निसर्गाच्या नियमांची परिभाषा आहे.आणि निसर्गाच्या नियमानुसार,कुणीही प्रथम आपल्या मनाला दुषित जसे की क्रोध,भय,घृणा इत्यादि केल्याशिवाय दुसऱ्यांची हानी करु शकत नाही; आणि जेव्हा कुणी मानसिक दुषितता उत्पन्न करतो,तेव्हा तो दुःखी होतो आणि आतल्या आत नरकाच्या दुःखाचा अनुभव करु लागतो. ह्या प्रकारे कुणीही आपल्या मनांत प्रथम प्रेम,करुणा,सद्भावना उत्पन्न केल्याखेरीज दुसऱ्यांच्या सहाय्यतेचे काम करु शकत नाही;आणि जसा एकाचा शुध्द मानसिक गुणांचा विकास सुरु होतो,आतल्या आत तो स्वर्गीय सुखाचा आनंद घेऊ लागतो.जेव्हा आपण दुसऱ्यास मदत करतो,त्याच वेळी आपल्याला देखील मदत होत असते;जेव्हा आपण दुसऱ्यांचे नुकसान करतो,त्याच वेळी त्या बरोबरच आपल्यास देखील नुकसान पोहोचते. निसर्गाचा हा सार्वत्रिक नियम---हा धम्म,सत्य आहे.
आर्य अष्टांगिक मार्गाला धम्माचा मार्ग असे म्हटले जाते, आर्य(नोबल) याचा अर्थ त्यावर चालणारी कुणीही व्यक्ति उमद्या स्वभावाची, संत व्यक्ती बनते. मार्ग तीन हिश्यामध्ये विभागलेला आहे: शील, समाधी, आणि प्रज्ञा. शील नैतिकता/सदाचार आहे - शरीर आणि वाणी यांच्या अपायकारक कृती पासून दूर राहणे. समाधी स्वतःच्या मनावर स्वामीत्व मिळविण्याची हितकारक कृती आहे. दोन्हीचा सराव करणे उपयोगी आहे, परंतु न शील नाही समाधी मनामध्ये संचित असलेल्या सर्व मलिनता नष्ट करू शकत नाहीत. या कारणासाठी मार्गाच्या तिसऱ्या भागाचा अभ्यास केला पाहिजे: पन्ना (प्रज्ञा), ज्ञानाचा विकास, अंतर्दृष्टीचा, जे मनाला पुर्ण शुद्ध करते. शील विभागा अंतर्गत आर्यअष्टांगिक मार्गाचे(नोबल) तीन भाग आहेत:
1) सम्मा-वाचा - सत्य बोलणे, मौखिक कार्याची पवित्रता. वाणीची पवित्रता काय आहे हे समजण्यासाठी कुणालाही हे समजले पाहिजे की वाणीची अशुध्दता काय आहे. दुसऱ्यांना फसविण्या साठी खोटे बोलणे,दुसऱ्यांना दुखवणारे कठोर शब्द बोलणे,चुगली आणि निंदनीय बोलणे,निरर्थक आणि कारणाशिवाय बडबड हे सर्व वाणी कर्माची अशुध्दता आहे. जेव्हा कुणी ह्या सर्वांपासुन दुर रहातो तेव्हा बाकी सर्व बोलणे योग्य असते.
(2) सम्मा-कम्मन्ता(कर्म) - योग्य कर्म, शारीरिक कर्म ची पवित्रता. धम्माच्या मार्गावर कामाची शुध्दता किंवा अशुध्दता मोजण्यासाठी केवळ एकच मापदंड आहे, तो कायिक,वाचिक,किंवा मानसिक असो,आणि त्या कामामुळे दुसऱ्याना मदत होते की त्यांची हानी होते. अशा प्रकारे हत्या, चोरी, बलात्कार किंवा व्यभिचार, नशेच्या आधिन होऊन दुसऱ्याना आणि आपले स्वतःचे नुकसान करुन घेतो ह्याचा आपण काय करीत आहोत हे न समजणे, हे सर्व दूशित कर्म आहेत.जेव्हा कुणीही ह्या सर्व दुषित कायिक कर्मापासुन दूर रहातो तेव्हा बाकी सर्व काम चांगले आहे.
(3) सम्मा-आजिवा -योग्य उपजीविका.प्रत्येकालाच स्वतःसाठी आणि अवलंबून असणाऱ्यांसाठी धन कमवायला पाहिजे, परंतू जर असे धन कमावण्यामुळे दुसऱ्यांची हानी होत असेल तर ती योग्य उपजीविका नाही.कदाचित कुणी आपली उपजीविका चुकीच्या पध्दतीने करीत नसेल, पण असे करण्याने दुसऱ्यांना प्रोत्साहन मिळत असेल तर ती उपजीवीविका योग्य नाही. उदाहरणार्थ दारु विकणे,जुगाराचा अड्डा चालविणे,हत्यारांची विक्री करणे,जिवंत जनावरे किंवा जनावराच्या मांसाची विक्री ह्या पैकी कोणतिही उपजीविका योग्य नाही. येथपर्यंत की उच्चतम व्यवसाय जर दुसऱ्यांचे शोषण करण्याची प्रेरणा देत असेल तर ती उपजीविका योग्य नाही.जर समाजाचा घटक ह्या नात्याने प्रेरणा देत असाल,आपले कौशल्य व परिश्रम दुसऱ्यांच्या चांगल्या साठी योगदान देत असाल आणि त्याच्या मोबदल्यात आपल्या साठी व आपल्यावर अवलंबून असणाऱ्यांसाठी काही धन घेत असाल तर ही उपजीविका योग्य आहे.
एक गृहस्थ, एका सामान्य व्यक्तीला, आपल्या स्वतःच्या चरीरार्थासाठी पैशाची आवश्यकता असते.तथापि, पैसे कमावणे हे एक अहंकार वाढण्याचे साधन बनून जाण्याचा धोका आहेःएखादा आपल्यास जितके संभव आहे तितके जमा करु पहातो,आणि जे लोक कमी कमावतात त्यांची अवमानता वाटते. ह्या प्रकारचा दृष्टिकोन दुसऱ्यांना हानी पोहोचवतो आणि आपल्यास देखील हानी पोहोचवतो,कारण जितका प्रबळ अहंकार,तितकाच कुणीही मुक्ती पासून दूर जातो.म्हणुनच योग्य उपजिविकेचे एक महत्वाचे अंग दान, जे काही कमावतो त्याचा हिस्सा दुसऱ्यांना देणे आहे. तेव्हाच एक जण फक्त आपल्या लाभासाठीच नाही तर दुसऱ्यांच्या लाभासाठीही कमावित असतो.
धम्म हा जर दुसऱ्यांना जे काम नुकसान करते त्यापासून वाचवण्याचा मात्र उपदेश असता, तर तो काही प्रभावशाली झाला नसता. कुणीही बौद्धिक स्तरावर अयुक्तिसंगत काम करण्यामधील धोके आणि युक्तिसंगत काम करण्याचे फायदे समजू शकतो, किंवा कुणीही उपदेश देणाऱ्याच्या भक्तीपोटी शीलाच्या महत्त्वाचा स्वीकार करू शकतो. तरीसुद्धा तो चुकीचे काम चालूच ठेवतो, कारण त्याचे मनावर कुठलेही नियंत्रण नसते. म्हणूनच धम्माचा दुसरा भाग समाधि—आपल्या मनावर स्वामित्व प्रस्थापित करणे. ह्या विभागाच्या अंतर्गत प्रभावशाली अष्टांग मार्गाचे तीन हिस्से आहेतः
(4) सम्मा-व्यायाम – योग्य प्रयत्न, योग्य व्यायाम. आपण अभ्यास करताना पाहिले की मन कसे कमजोर आणि किती दुर्बल आहे, जे नेहमीच एका विषयापासून दुसऱ्या विषयाकडे हेलकावे खात असते. अशा प्रकारच्या मनाला मजबूत बनवण्यासाठी व्यायामाची आवश्यकता आहे. येथे मनाला मजबूत करण्यासाठी अभ्यासाचे चार प्रकार आहेतः जर अयुक्तिसंगत गुण असतील तर ते काढून टाकणे, अयुक्तिसंगत गुण नसतील तर त्यांना मनात कधीच थारा न देणे ,मनामध्ये असलेल्या युक्तिसंगत गुणांना सुरक्षित ठेवणे आणि त्यांचे संवर्धन करणे, आणि आपल्यात नसलेले हितकारक गुण अंगी बाणवणे. अप्रत्यक्ष रूपाने, श्वासाच्या सजगतेच्या अभ्यासाद्वारा (Anapana) आपण हे कार्य करणे सुरू केले आहे.
(5) सम्मा-सति --खरी सजगता, वर्तमान क्षणाच्या सत्याची जाणकारी. भूतकाळाच्या फक्त आठवणी रहातात; भविष्याच्या केवळ महत्वाकांक्षा, भय, कल्पना होऊ शकतात.नाकपुडीच्या सीमित क्षेत्राच्या आंत जे सत्य वर्तमान स्थितीमध्ये प्रकट होत आहे ते जाणण्यासाठी आपण आपले प्रशिक्षण सम्मा-सति च्या अभ्यासाने सुरु केले.आपल्यास स्थूल सत्यापासून सूक्ष्म तक सत्याची पूर्ण माहिती ओळखण्याची क्षमता विकसित करावी लागेल.सुरवातीला, आपण सचेत,सहेतुक श्वासावर ध्यान दिले,नंतर नैसर्गिक,शांत श्वास,नंतर श्वासाच्या स्पर्शावर ध्यान दिले, आता तुम्ही अधिक सूक्ष्म आलंबनाचा वापर कराल - ह्या छोट्या स्थानावरील नैसर्गिक,शारिरीक सवेदने साठी क्षेत्र सिमीत करावे लागेल.आपल्यास श्वासाचे तापमान आंत येताना थोडे थंड,आणि शरीराबाहेर जाताना थोडे उष्ण असल्याचे जाणवेल. ह्याशिवाय श्वासाशी संबंधीत नसलेल्या अशा असंख्य संवेदना होतात जसे की गर्मी, सर्दी, खुजली, कंपन, दबाव, तणाव, दुःख, इत्यादि. आपण संवेदना उत्पन्न करु शकत नाही म्हणूनच कोणती संवेदना जाणवावी याची निवड करु शकत नाही.फक्त निरिक्षण करा,सजग रहा. संवेदना कोणती आहे हे महत्वाचे नाही तर कोणतीही प्रतिक्रिया न करता त्याच्या सत्याबद्दल माहित होणे महत्वपूर्ण आहे.
मनाच्या संवयी,जसे आपण पाहिले आहे की, राग(आसक्ति),द्वेष निर्माण करीतच भविष्यामध्ये किंवा भूतकाळातच रमण होणे हा आहे.खऱ्या सत्याच्या अभ्यासाने आपण ह्या संवयीचा भंग करणे चालू केले. असे नाही की ह्या शिबीरानंतर आपण पूर्णपणे भूतकाळ विसरुन जाल,आणि भविष्याचा विचार अजिबात येणारच नाही.परंतू प्रत्यक्षात आपली ऊर्जा भविष्य वा भूतकाळ यामध्ये रममाण होऊन अशा प्रकारे व्यर्थ करतो की जेव्हा आठवण ठेवणे किंवा योजना आखणे आवश्यक असते तेव्हा आपण असे करु शकत नाही. सम्मा-सति विकसित करुन आपण वर्तमान सत्यावर अधिक मजबुतीने आपले मन स्थिर करण्यास शिकाल,आणि जेव्हा पाहिजे असेल तेव्हा आपण सहजगत्या भूतकाळाची आठवण करु शकाल,आणि भविष्यासाठी उचित तरतूद करु शकाल. आपण एक आनंदमय,निरोगी जीवन जगण्यासाठी सक्षम व्हाल.
(6) सम्मा-समाधि - योग्य एकाग्रता. फक्त एकाग्रता हाच ह्या विद्येचा उद्देश नाही;आपण जी एकाग्रता विकसित करीत आहात तिला पवित्रतेचा आधार असला पाहिजे. आसक्ति,द्वेष, किंवा भ्रम याचा आधार घेऊन मन केंद्रित करु शकतो, परंतू ही सम्मा-समाधि नाही. कुणालाही आपल्या आंतील वर्तमान सत्याची कोणत्याही आसक्ति किंवा द्वेषा शिवाय माहिती असली पाहिजे.ह्या सजगतेला सतत क्षणोक्षणी कायम ठेवली पाहिजे. – ही आहे सम्मा-समाधि .
पाच नियमांचे पालन करीत आपण शीलाचा अभ्यास सुरु केला.आपल्या मनास एका जागेवर केंद्रित करुन कोणत्याही आसक्ति किंवा द्वेषाशिवाय ह्या क्षणाच्या सत्यापासून आपण समाधी विकसित करणे चालू केले.आपल्या मनाला तीक्ष्ण करण्यासाठी,अशासाठी की अचेतन मनाच्या खोलवर जाण्यासाठी, जेव्हा आपण प्रज्ञेचा अभ्यास सुरु कराल, तेथे लपून असलेल्या विकाराना काढून टाकण्यासाठी, आणि खऱ्या आनंदाला मिळवण्यासाठी आता मन लावून काम करा —मुक्तिचा आनंद.
आपणा सर्वांना खरा आनंद.
सर्व प्राणी सुखी होवोत!