विपश्यना
सत्यनारायण गोएंका द्वारा जशी शिकविली जाते
साधना
आचार्य गोयन्काजी द्वारा शिकविली जाणारी विपश्यना साधना
विपश्यना साधना
सत्यनारायण गोएंका द्वारा जशी शिकविली जाते
आचार्य गोयन्काजी द्वारा शिकविली जाणारी विपश्यना साधना
धम्म सेवा देण्याचा उद्देश्य
धम्म सेवेवर गोएंकाजीद्वारा ब्लैकहीथ येथील विपश्यना ध्यान केंद्र, न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया मध्ये दिले गेलेल्या निम्नलिखित भाषणातील काही उतारे दिले आहेत.
धम्म सेवा देण्याचा उद्देश काय आहे? निश्चीतच भोजन आणि निवासस्थान प्राप्त करण्यासाठी नाही, नाही आरामदायक वातावरणात वेळ घालविण्यासाठी, आणि नाही दैनिक जीवनाच्या जबाबदारी पासून दुर पळण्यासाठी. धम्म सेवकांना हे चांगल्या प्रकारे माहीत आहे.
अशा व्यक्ति ज्यांनी विपश्यनेचा अभ्यास केला आहे आणि जो लाभ प्राप्त झाला त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. त्यांनी आचार्यांची निःस्वार्थ सेवा, प्रबंधन व धम्म सेवकांची सेवा ह्यामुळे त्यांना धम्माचा अतुलनिय स्वाद कसा चाखता आला हे पाहिले आहे.त्यांनी आर्य मार्गावर पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे, आणि जे काही त्यांना प्राप्त झाले आहे त्याबद्दलचे कर्ज चुकविण्यासाठी दुर्लभ अशी कृतज्ञतेची भावना वाढीस लागण्यास सुरुवात झाली आहे.
अर्थात आचार्य, प्रबंधन अणि धम्म सेवक सेवा देण्याच्या बदल्यात काही मिळण्याची अपेक्षा न ठेवता सेवा देतात, इतकेच नाही तर कोणत्याही धनाचा स्वीकार करणार नाहीत. त्यांच्यासाठी धम्मचक्र प्रवर्तित ठेवणे, दुसऱ्यांना अशाप्रकारे निःस्वार्थी सेवा देणे हाच एक ऋण परत फेडण्याचा मार्ग आहे. ही एक सद्भावना आहे ज्यामुळे धम्म सेवा दिली जाते.
जस जसा विपश्यना साधक ह्या मार्गावर प्रगती करतो, तो स्वयंकेंद्रिततेच्या संवयी पासून बाहेर येतो अणि दुसऱ्याच्या बद्दल स्वतःचा विचार करु लागतो.युवा किंवा वृद्ध, पुरुष किंवा महिला, काळा किंवा गोरा, अमीर किंवा गरीब, सर्वच पीड़ित आहेत: हे सर्व लोक प्रत्येक बाबतीत कसे पीड़ित आहेत हे त्याना समजले. साधकाला जाणवले की धम्माची ओळख होइपर्यंत ते सर्व कसे दुःखी होते. त्यांना हे समजले की आपल्या सारखेच दुसऱ्यानी ह्या मार्गाचे अनुसरण केल्यामुळे खरे सुख आणि शांती याचा आनंद घेणे सुरु केले आहे. हा बदल पाहून विपश्यनेच्या सहाय्याने दुःखी लोकाना त्यांच्या दुःखातून बाहेर येण्यासाठी सहृदय खुशीची भावना आणि मदत करण्याच्या दृढ इच्छेस चालना देतो. करुणा उचंबळते, आणि त्याच बरोबर दुसऱ्याना आपल्या दुःखापासून मुक्तता मिळण्यासाठी मदत करण्याची इच्छा उत्पन्न होते.
निश्चितच परिपक्वता येण्यासाठी आणि धम्म शिकविण्याचे प्रशिक्षण प्राप्त करण्यासाठी काही वेळ लागू शकतो. परंतू तेथे काही अन्य प्रकारे शिबीरात सामिल झालेल्या साधकांची सेवा करु शकता, आणि ते सर्वच मुल्यवान आहेत. खरे म्हणजे एक धम्म सेवक-सरळ, विनम्र धम्म सेवक होण्याची ही मोठी आकांक्षा आहे.
आणि जे विपश्यनेचा अभ्यास करीत आहेत त्याना हे देखील समजते की निसर्गाच्या नियमानुसार शरीर आणि वाणीची कर्मे ज्यामुळे दुसऱ्यांची हानी होते ती करण्यामुळे ही कर्मे करणाऱ्याची सुध्दा हानी होते. तर दुसऱ्याना मदत होणाऱ्या कामामूळे ती करणाऱ्यास शांती व सुख मिळवून देते. म्हणजेच दुसऱ्याना मदत केल्यामुळे स्वतःस देखील मदत होते. म्हणूनच स्वतःच्या हितासाठी सेवा दिली पाहिजे. असे करण्याने एकाची पारमी विकसित होते आणि ह्या मार्गावर लवकरच आणि निश्चितपणे पुढे मार्गक्रमणा कराल. वास्तवात, दुसऱ्यांची सेवा म्हणजे आपली स्वतःची देखील सेवा आहे. ह्या सत्यास समजल्यावर दुसऱ्याना आपल्या दुःखातून बाहेर येण्यास मदत करणाऱ्या ह्या मोठ्या मिशन मध्ये सामील होण्याच्या इच्छेला प्रेरणा मिळते.
परंतू सेवा देण्याचा सर्वात चांगला प्रकार कोणता? हे समजल्याशिवाय सेवक दुसऱ्याना किंवा स्वतःस मदत करु शकत नाही; त्याऐवजी ते नुकसान देखील करु शकतात. जरी हे नोबल मिशन असले तरी, ते पुरे करण्यासाठी जर सेवकाची इच्छा निर्दोष नसेल तर मदत करण्यामुळे कोणताही खरा लाभ मिळणार नाही.सेवेमुळे काहिही फायदा होणार नाही जर त्यामुळे अहंकार वाढत असेल किंवा, त्याच्या बदल्यात काही प्राप्त करण्यासाठी – प्रशंसा किंवा गुणग्राहकतेचे शब्द सुध्दा.
हे समजून घ्या कि सेवा करीत असताना आपण कशा प्रकारे दैनिक जीवनामध्ये धम्माचा उपयोग करावा हे शिकत आहात. खरे तर, धम्म हा दैनिक जबाबदारी टाळण्यासाठी नाही. एका ध्यान शिबीर किंवा केंद्रामधील छोट्याशा दुनियेमध्ये येथे साधक व परिस्थितीला तोंड देताना धम्माच्या अनुसार कसे काम करावे हे शिकत असताना, आपण बाह्य जगात त्याच प्रकारचे काम करण्याचे प्रशिक्षण घेत असतो.कोणत्याही अन्य व्यक्तिने अवांछित व्यवहार करुन सुध्दा, आपण आपल्या मनाचे संतुलन ठेवण्याचा आणि त्या बदली प्रेम व करुणा उत्पन्न करण्याचा अभ्यास करीत आहात. आपल्यास येथे प्रभुत्व मिळविण्याचा प्रयत्न करण्याचा हा एक पाठ आहे. शिबीरामध्ये जे बसले आहेत त्यांच्या सारखेच आपण देखील एक विद्यार्थी आहात.
जेव्हा दुसऱ्याना विनम्रतापूर्वक सेवा देत असाल तेव्हा शिकत रहा. असा विचार करा, “ बदल्यात काहीही मिळण्याची अपेक्षा न ठेवता सेवा देण्याचा अभ्यास करण्यासाठी मी येथे प्रशिक्षण घेत आहे. दुसऱ्याना धम्माचा लाभ मिळावा ह्या उद्देशाने मी काम करीत आहे.एक चांगले उदाहरण स्थापित करणे आणि असे करण्याने स्वतः बरोबरच दुसऱ्याना मदत मिळावी.”
जे आपण सर्व धम्म सेवा देत आहेत ते धम्मा मध्ये बलवान होवोत. आपण आपला सद्भाव, प्रेम आणि करुणा यांचा विकास करणे शिकावे. आपण सर्व खरी शांती, खरा सद्भाव,आणि अस्सल सुखाचा आनंद घेण्यासाठी धम्मा मध्ये प्रगती करो.