विपश्यना
सत्यनारायण गोएंका द्वारा जशी शिकविली जाते

साधना
आचार्य गोयन्काजी द्वारा शिकविली जाणारी विपश्यना साधना
विपश्यना साधना
सत्यनारायण गोएंका द्वारा जशी शिकविली जाते
आचार्य गोयन्काजी द्वारा शिकविली जाणारी विपश्यना साधना
विशेष शिबीरांसाठी आवश्यक योग्यता
जुने साधक म्हणजे ते, ज्यांनी स. ना. गोयन्काजी अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर किमान एक १०-दिवसीय शिबीर पूर्ण केले आहे.
जुन्या साधकांना खाली दिलेल्या शिबीरांमध्ये धम्मसेवेची संधी प्राप्त होऊ शकते.
विपश्यना साधना परंपरेमध्ये जुन्या साधकांकरिता विशेष शिबीरांचे आयोजन केले जाते. ह्या शिबीरांसाठी काही आवश्यक गोष्टी आहेत की ज्यामध्ये प्रवेश मिळ्ण्याकरिता जुन्या साधकांनी काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्या मूलभूत पात्रता अटी खालील प्रमाणे आहेत:
एक दिवसाचे किंवा तीन दिवसांचे जुन्या साधकांकरिताचे शिबीर
श्री गोयेन्का अथवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर किमान एक दहा दिवसीय शिबीर पूर्ण केलेले असावे. दुसऱ्यांवर रेकी किंवा अन्य ऊर्जात्मक उपचार करणाऱ्यांनी हे शिबीर करू नये. सर्व शीलांचे यथाशक्ती पालन करीत असावे.
सतिपठ्ठान सुत्त (Satipaṭṭhāna Sutta)शिबीर
सतिपठ्ठान सुत्त जुन्या साधक शिबीरांसाठी आवश्यकता
- गोयंकाजी अथवा त्यांच्या सहाय्यक शिक्षकांबरोबर किमान तीन १० दिवसीय शिबीरे पूर्ण केली आहेत. ह्यांमधे ज्या शिबीरांमध्ये सेवा दिली आहे अशी शिबीरे समाविष्ट नाहीत.
- किमान एक वर्ष स. ना. गोयंकाद्वारे शिकवलेल्या विपश्यना ध्यानसाधनेचा अभ्यास केला आहे
- गोयंकाजी अथवा त्यांच्या सहाय्यक शिक्षकांबरोबर केलेल्या अंतिम शिबीरानंतर कुठल्याही अन्य कार्यप्रणालीचा अभ्यास केलेला नाही
- शिबीरासाठी आवेदन दिल्यानंतर किमान दैनिक अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आहे
- शिबीरासाठी आवेदन दिल्यानंतर किमान पंचशील पाळण्याचा प्रयत्न करत आहात
गंभीर अशा जुन्या साधकांसाठी स्वयं शिबीर
स्वयं-शिबीर हे किमान तीन दहा दिवसीय शिबीरे, ज्यांपैकी शेवटचे गेल्या दोन वर्षांत केलेले असेल, अशा जुन्या गंभीर साधकांसाठी सीमित आहे. ह्या शिबीरात आचार्यांची उपस्थिती नसते, साधकांसाठी व्यवस्थापक नसतात, दुपारचा संवाद नसतो, आणि दिवसाच्या शेवटी असणारे प्रश्नोत्तर सत्रही नसते. संध्याकाळसाठी प्रवचनाची ध्वनीफित असावी, आणि शिबीर करणाऱ्या साधकाची संध्याकाळी ७ वाजता ध्वनीफित लावण्याची जबाबदारी असेल.
ह्या शिबीराच्या साधकांनी देखील नेहमीच्या दहा दिवसीय शिबीराच्या समयसारिणीचेच पालन करणे अपेक्षित आहे. साधनाकेंद्रस्थळी असताना सर्व नियम तसेच अनुशासनाचे (जसे की आर्यमौन, अष्टशील) पालन करावे. आचार्य गोयन्काजी किंवा त्यांच्या साहाय्यक आचार्यांबरोबर शेवटील दहा दिवसांचे शिबीर केल्यानंतर कोणत्याही अन्य साधनेचा अभ्यास केलेला नसावा. शेवटील दहा दिवसांच्या शिबीरानंतर रोज दोन तासांच्या साधनेचा अभ्यासाचा प्रयत्न असावा. पंचशीलाचे यथाशक्ति पालन करीत असावे. शिबीराच्या हजेरीसाठी सहाय्यक आचार्यांची अनुमती असावी.
जुन्या साधकांसाठी विशेष गंभीर दहा दिवसांचे शिबीर
14-Day Gratitude Course
14-Day Gratitude Course Requirements are:
- Must be a serious old student who is active in giving Dhamma Service.
- Must be practicing Vipassana exclusively (not practicing any other meditation techniques).
- Must have sat at least one Satipaṭṭhāna Sutta course and three 10-Day courses.
- Must be trying to maintain the five precepts to the best of one’s ability.
- Must be trying to maintain two-hour daily practice since last 10-Day course.
- Must have local Teacher’s recommendation.
वीस दिवसीय शिबीर
तीस दिवशीय शिबीर
पंचेचाळीस दिवशीय शिबीर
- ह्या साधना प्रणालीशी कटिबद्ध असा जुना गंभीर साधक असला पाहिजे.
- सहाय्यक आचार्य आणि धम्मसेवेत असलेल्यांसाठी सीमित.
- श्री गोयन्काजी किंवा त्यांच्या सहाय्यक आचार्यांबरोबर किमान सात १० दिवसीय शिबीर केलेले असले पाहिजे.
- केवळ हीच साधनाप्रणाली गेल्या किमान ३ वर्षांपासून करीत असली पाहिजे.
- किमान दोन ३० दिवसीय शिबीर पूर्ण केले असले पाहिजेत.
- किमान दोन वर्षे प्रतिदिन २ तास साधना करीत असली पाहिजे.
- किमान एक वर्ष हत्या, लैंगिक दुराचार, मादक पदार्थांचे सेवन ह्यांपासून दूर असले पाहिजे तसेच यथाशक्ति इतर शीलांचे पालन केलेले असले पाहिजे.
- गेल्या दीर्घ शिबीरानंतर किमान सहा महिन्यांचे कालांतर असले पाहिजे.
- दीर्घ शिबीर आणि इतर कोणत्याही शिबीरामध्ये दहा दिवसांचे अंतर पाहिजे.
- दीर्घ शिबीरासाठी पति अथवा पत्नीचे अनुमोदन(संमती) पाहिजे.
- पहिल्या ४५ दिवसीय शिबीरासाठी, पहिल्या ३० दिवसीय शिबीरानंतर किमान एक १० दिवसीय शिबीर केलेले असले पाहिजे..
- सर्व पुष्टी ३० दिवसांपर्यंत तात्पुरत्या.
साठ दिवशीय शिबीर
- ह्या साधना पद्धतीशी कटिबद्ध असलेला जुना आणि गंभीर साधक असला पाहिजे.
- सहाय्यक आचार्य तसेच धम्मसेवेमध्ये दृढ असलेल्यांपर्यंत सीमित.
- केवळ ह्या साधनप्रणालीचा गेल्या किमान ५ वर्षे अभ्यास असला पाहिजे.
- किमान दोन वर्षे प्रतिदिन २ तास साधना केलेली असली पाहिजे.
- किमान एक वर्ष हत्या, लैंगिक दुराचार, मादक पदार्थांचे सेवन ह्यांपासून दूर असले पाहिजे तसेच यथाशक्ति इतर शीलांचे पालन केलेले असले पाहिजे.
- गेल्या दीर्घ शिबीरानंतर किमान सहा महिन्यांचे कालांतर असले पाहिजे.
- दीर्घ शिबीर आणि इतर शिबीर यांमध्ये दहा दिवसांचे अंतर असले पाहिजे.
- पती किंवा पत्नीचे दीर्घ शिबीरासाठी अनुमोदन आवश्यक आहे.
उपरोक्त अर्हता अटी ह्या किमान आवश्यकता आहेत, त्यांची पूर्तता म्हणजे प्रवेशाची निश्चिती असे नाही. १० दिवसीय विशेष शिबीर, २० दिवसीय शिबीर, ३० दिवसीय शिबीर, ४५ दिवसीय शिबीर, ६० दिवसीय शिबीर आणि आचार्यांचे स्वयं शिबीर या शिबीरांसाठीच्या आवेदन पत्रात आपणास चांगल्या प्रकारे ओळखत असलेल्या सहाय्यक आचार्यांची तसेच साधक रहात असलेल्या विभागांतील स्थानिक आचार्यांची शिफारस आवश्यक आहे.